Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

“… असं सरकारला वाटत नाही?” लहान मुलांच्या बेपत्ता प्रकरणावर राज ठाकरे संतापले ; CM फडणवीसांना लिहिले पत्र 

एका अत्यंत महत्वाच्या आणि गंभीर विषयाकडे तुमचं लक्ष वेधून घेण्यासाठी हे लिहीत आहे. महाराष्ट्रात लहान मुलं पळवण्याचं, ती बेपत्ता होण्याचं प्रमाण वाढतं आहे, असे म्हणत राज ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Dec 13, 2025 | 06:28 PM
"... असं सरकारला वाटत नाही?" लहान मुलांच्या बेपत्ता प्रकरणावर राज ठाकरे संतापले ; CM फडणवीसांना लिहिले पत्र 

"... असं सरकारला वाटत नाही?" लहान मुलांच्या बेपत्ता प्रकरणावर राज ठाकरे संतापले ; CM फडणवीसांना लिहिले पत्र 

Follow Us
Close
Follow Us:

महाराष्ट्रात लहान मुलं पळवण्याचं, बेपत्ता होण्याचे प्रमाण वाढले – राज ठाकरे 
राज ठाकरे यांचे मुख्यमंत्री फडणवीस यांना पत्र 
२०२१ ते २०२४ या काळात जवळपास ३०% नी वाढले प्रमाण

Maharashtra Politics: सध्या राज्याचे संपूर्ण मंत्रीमंडळ नागपूरमध्ये आहे. राज्याचे हिवाळी अधिवेशन सध्या नागपूरमध्ये सुरू आहे. याच दरम्यान मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना एक पत्र लिहिले आहे. यातून त्यांनी राज्यातील एका महत्वाच्या विषयाकडे त्यांचे लक्ष वेढण्याचा प्रयत्न केला आहे. राज ठाकरे यांनी आपल्या पत्रातून लहान मुलं पळवण्याचं, ती बेपत्ता होण्याचं प्रमाण वाढत चालले आहे. त्यावर त्यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले आहे.

राज ठाकरे यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

प्रति, श्री. देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य,
सस्नेह जय महाराष्ट्र

एका अत्यंत महत्वाच्या आणि गंभीर विषयाकडे तुमचं लक्ष वेधून घेण्यासाठी हे लिहीत आहे. महाराष्ट्रात लहान मुलं पळवण्याचं, ती बेपत्ता होण्याचं प्रमाण वाढतं आहे. एनसीआरबीच्या आकडेवारीनुसार जरी गेलं तरी हे प्रमाण २०२१ ते २०२४ या काळात जवळपास ३०% नी वाढलं आहे. लहान मुलांना पळवून, नंतर त्यांना कामाला जुंपणाऱ्या, त्यांना भीक मागायला लावणाऱ्या आंतरराज्य टोळ्या तयार झाल्या आहेत. आणि या टोळ्या सर्रास लहान मुलं पळवत आहेत आणि यावर सरकार नक्की काय कारवाई करत आहे हेच समजत नाही… लहान मुलं पळवण्याच्या अमुक केसेस दाखल होतात आणि त्यातली इतकी टक्के मुलं परत शोधली जातात आणि त्यांच्या कुटुंबीयांकडे सुखरूप परत पाठवली जातात अशा आशयाचं सरकारी उत्तर यावर महाराष्ट्राला नको आहे.

Maharashtra Politics: फडणवीस सरकारची अडचण वाढणार? अण्णा हजारे आमरण उपोषण करणार, कारण काय?

मुळात एनसीआरबी जे आकडे सांगत आहे ते आकडे म्हणजे किती पालकांनी पोलिसांकडे तक्रारी नोंदवल्या आहेत त्याचा तपशील सांगितला जातो, पण अशा काही हजार तक्रारी पोलिसांपर्यंत पोहचत तरी असतील का ? आणि समजा मुलं पुन्हा सोडवून आणली तरी त्या काळात लहान मुलांच्या मनावर जो आघात होतो, त्याचं काय ? मुळात मुलं पळवून नेणारी टोळी कार्यरतच कशी होते आणि ती इतक्या राजेरोसपणे काम कशी करते ? यावर काहीतरी जबरदस्त कृती करावी असं सरकारला वाटत नाही ? आज आपण रस्त्यावर, स्टेशनवर, बसस्टँडवर लहान मुलं भीक मागताना बघतो, ती कोण आहेत ? त्यांच्या सोबतचे जी माणसं भीक मागत असतात ते खरंच त्यांचे आई-वडील असतात का ? याचा तपास किंवा वेळ पडल्यास अगदी डीएनए टेस्ट करावी असे आदेश सरकारला द्यावेसे का वाटत नाही ? आज या राज्यात लहान मुलं पळवली जात आहेत, तरुण मुली पळवल्या जात आहेत, महाराष्ट्रातल्या जमिनी पळवल्या जात आहेत , यावर विधिमंडळात चर्चा व्हावी, त्यावर एकमुखाने काही पाऊलं उचलायला प्रशासनाला भाग पाडावं असं सत्ताधारी आणि विरोधी पक्षांना वाटत नाही का?

प्रति,
श्री. देवेंद्र फडणवीस,
मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य,
सस्नेह जय महाराष्ट्र,
एका अत्यंत महत्वाच्या आणि गंभीर विषयाकडे तुमचं लक्ष वेधून घेण्यासाठी हे लिहीत आहे. महाराष्ट्रात लहान मुलं पळवण्याचं, ती बेपत्ता होण्याचं प्रमाण वाढतं आहे. एनसीआरबीच्या आकडेवारीनुसार जरी गेलं…
— Raj Thackeray (@RajThackeray) December 13, 2025

हिवाळी अधिवेशन म्हणजे सरकारच्या चुकलेल्या अंदाजपत्रकाला ठिगळ लावण्यासाठी पुरवणी मागण्या मंजूर करून घेण्याची सोय इतकंच प्रयोजन आहे का ? अधिवेशनात अनेकदा उत्तरं द्यायला मंत्री सभागृहात नाही अशी परिस्थिती आहे. त्यामुळे लहान मुलं असोत की गायब होणाऱ्या मुली अशा विषयावर विधिमंडळात चर्चा होईल अशी अपेक्षा करणं पण अवाजवी वाटेल अशी परिस्थिती आहे. पण महाराष्ट्राची ही अपेक्षा आहे. खरंतर केंद्र सरकारने हा विषय सगळ्या राज्यांशी बोलून या विषयात कृतिगट तयार करायला हवा, पण सध्या वंदे मातरम वर तावातावाने चर्चा करणाऱ्या केंद्र सरकारला मातांचा आक्रोश ऐकू येत असेल असं वाटत नाही ! असो. आज राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री या नात्याने तुम्ही लक्ष घालून, फक्त अधिवेशनात यावर चर्चा घडवून आणून नव्हे तर काहीतरी ठोस कृती करावी ही महाराष्ट्राची तुमच्याकडून अपेक्षा आहे.

Web Title: Raj thackeray writes to cm devendra fadnavis regarding cases of missing and abducted children crime news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 13, 2025 | 06:28 PM

Topics:  

  • child trafficking
  • CM Devendra Fadnavis
  • crime news
  • raj thackeray

संबंधित बातम्या

“मालवणी परिसरातील झोपडपट्ट्यांचा…”; मुख्यमंत्री Devendra Fadnavis यांचे प्रशासनाला स्पष्ट निर्देश
1

“मालवणी परिसरातील झोपडपट्ट्यांचा…”; मुख्यमंत्री Devendra Fadnavis यांचे प्रशासनाला स्पष्ट निर्देश

एक चुकीचे क्लिक अन् खेळ खल्लास! वाहनधारकांची आर्थिक फसवणूक वाढली; RTO ने केली ‘हे’ आवाहन
2

एक चुकीचे क्लिक अन् खेळ खल्लास! वाहनधारकांची आर्थिक फसवणूक वाढली; RTO ने केली ‘हे’ आवाहन

महसूलमंत्री बावनकुळे गरजले! थेट विधानसभेतच ‘या’ प्रकरणात 4 तहसीलदार 10 अधिकाऱ्यांचा लावला निकाल अन्…
3

महसूलमंत्री बावनकुळे गरजले! थेट विधानसभेतच ‘या’ प्रकरणात 4 तहसीलदार 10 अधिकाऱ्यांचा लावला निकाल अन्…

विरोधात प्रचार केल्याचा राग अनावर; भाजप कार्यकर्त्यांकडून शिवसेनेच्या कार्यकर्त्याला बेदम मारहाण
4

विरोधात प्रचार केल्याचा राग अनावर; भाजप कार्यकर्त्यांकडून शिवसेनेच्या कार्यकर्त्याला बेदम मारहाण

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.