
Uddhav Thackeray meets Rahul Narvekar Ram Shinde to appoint Leader of Opposition in Legislative Assembly
Uddhav Thackeray Live : नागपूर : सध्या राज्याचे नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशन (Winter Session) सुरु आहे. मात्र यंदा राज्याच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच विधीमंडळाच्या दोन्ही सभागृहामध्ये विरोधी पक्षनेता नाही अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. विधान परिषदेमध्ये अंबादास दानवे (Ambadas Danve) यांचा कार्यकाळ संपला आहे. तर विधान सभेमध्ये विरोधकांनी आवश्यक संख्याबळ न मिळाल्यामुळे विधान सभेमध्ये देखील विरोधी पक्षनेते नाहीत. याबाबत आता माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची भेट घेतली.
माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विरोधी पक्षनेते पदासाठी विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर आणि विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांची भे घेतली. यावेळी त्यांनी दोन्ही सभागृहांमध्ये विरोधी पक्षनेता नेमण्याबाबत विनंती केली. या भेटीनंतर उद्धव ठाकरेंनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले की, दोघांनीही सांगितले की आमच्या मनात याबाबत विचार सुरू आहे. लवकरात लवकर याबाबत निर्णय घेऊ. गेल्या अधिवेशनातही त्यांनी असच म्हटलं होतं. त्यामुळे आता किती लवकर याबाबत निर्णय होतो ते पाहूयात. सभागृहात जनतेच्या प्रश्नांची मांडणी करण्यासाठी विरोधी पक्षनेता हवा असतो, त्यामुळे हे पद असणे आवश्यक आहे, अशी भूमिका उद्धव ठाकरे यांनी घेतली.
हे देखील वाचा : राजकारण ते क्रिकेटमधील किंगमेकर! शरद पवारांचे हे नऊ निर्णय राहिले नेहमीच चर्चेत
काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी काही दिवसांपूर्वी वेगळ्या विदर्भाची मागणी केली होती. , वेगळा विदर्भ झाल्याशिवाय विदर्भाचा विकासाचा अनुशेष भरुन काढणे शक्य नाही. विदर्भात ओबीसी, दलित, आदिवासी आणि अल्पसंख्याकांचं प्राबल्य राहिले आहे. या समाजांच्या दृष्टीकोनातून आपण पाहिलं तर या लोकांना सत्तेत फार कमी संधी मिळाली आहे. त्यामुळे या भागाला न्याय मिळालेला नाही. यासाठी वेगळा विदर्भ झाला पाहिजे, अशी भूमिका त्यांनी मांडली होती. याबाबत उद्धव ठाकरे म्हणाले की, , ‘वेगळा विदर्भ होऊ शकत नाही. वेगळ्या विदर्भाची मागणी पूर्ण होऊ शकत नाही कारण महाराष्ट्र हा विदर्भाचा आहे आणि विदर्भ महाराष्ट्राचा आहे.” अशी भूमिका उद्धव ठाकरेंनी घेतली.
पक्षप्रमुख मा. श्री. उद्धवसाहेब ठाकरे ह्यांनी विधिमंडळ पक्ष कार्यालय, नागपूर येथील प्रसारमाध्यमांशी संवाद साधला! pic.twitter.com/0BFI3jYcQ7 — ShivSena – शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray (@ShivSenaUBT_) December 12, 2025
हे देखील वाचा : गिरीश महाजनांना मस्ती आलीये..; सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानियांनी घेतला खरपूस समाचार
पुढे उद्धव ठाकरे म्हणाले की, “संपूर्ण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री हे विदर्भातील आहेत. सरकारने आता जाहीर केलं पाहिजे की तुम्ही महाराष्ट्र अखंड ठेवू इच्छिता की महाराष्ट्राचे तुकडे पाडू इच्छिता. कारण हा महाराष्ट्राच्या मुळावरती आघात करण्याचा विषय आहे. जो कोणी महाराष्ट्र तोडायचा प्रयत्न करेल, तो महाराष्ट्राचा नाही. त्यांनी आतापर्यंतच्या अधिवेशनात विदर्भासाठी कोणते प्रश्न मांडले हे वेगळा विदर्भ मागणाऱ्यांना सांगावे.” असे मत उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केले.