Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Election 2025 |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

मुंबई विद्यापीठाच्या उपकेंद्राला टाळे ठोकू मनसेचा इशारा, कल्याणमधील उपकेंद्रात शिकतात फक्त ११ विद्यार्थी

मनसेचे माजी आमदार, प्रदेश सरचिटणीस तथा कल्याण शहर, अध्यक्ष प्रकाश भोईर यांच्या नेतृत्वाखाली मनसेच्या शिष्टमंडळाने या उपकेंद्राला भेट देत उपकेंद्राचा आढावा घेतला.

  • By शुभांगी मेरे
Updated On: Mar 15, 2024 | 11:29 AM
मुंबई विद्यापीठाच्या उपकेंद्राला टाळे ठोकू मनसेचा इशारा, कल्याणमधील उपकेंद्रात शिकतात फक्त ११ विद्यार्थी
Follow Us
Close
Follow Us:

कल्याण : मुंबई विद्यापीठाच्या कल्याणमधील उपकेंद्रात केवळ ११ विद्यार्थीच शिकत असून याठिकाणी पूर्ण क्षमतेने अभ्यासक्रम सुरू करावा. अन्यथा मुंबई विद्यापीठाच्या या उपकेंद्राला टाळे ठोकू असा इशारा कल्याणच्या मनसेने दिला आहे. हे विद्यापीठ उपकेंद्र आहे की निवडणूक कार्यालय असा सवाल देखील यावेळी मनसेने केला आहे. मनसेचे माजी आमदार, प्रदेश सरचिटणीस तथा कल्याण शहर, अध्यक्ष प्रकाश भोईर यांच्या नेतृत्वाखाली मनसेच्या शिष्टमंडळाने या उपकेंद्राला भेट देत उपकेंद्राचा आढावा घेतला.

उच्च शिक्षणासाठी कल्याणसह आसपासच्या शहरातील विद्यार्थ्यांना मुंबईतील विद्यापीठ गाठावे लागते. यासाठी तत्कालीन मनसेचे आमदार प्रकाश भोईर यांनी मोठा संघर्ष करून कल्याणमध्ये मुंबई विद्यापीठाचे उपकेंद्र मंजूर करून घेतले. कल्याण पश्चिमेतील वसंत व्हॅली परिसरात भव्य स्वरूपात या उपकेंद्रांची इमारत उभारण्यात आली असून याठिकाणी काही अभ्यासक्रम देखील सुरू करण्यात आले आहेत. मात्र हे अभ्यासक्रम पूर्ण क्षमतेने सुरू नसून या अभ्यासक्रमांची माहितीच विद्यार्थ्याना होत नसल्याने केवळ ११ विद्यार्थीच याठिकाणी शिक्षण घेत आहेत.

तर याठिकाणी नेहमीच निवडणूक विभाग निवडणुकीच्या वेळी आपले कार्यालय थाटत असल्याने हे विद्यापीठ उपकेंद्र आहे की निवडणूक कार्यालय असा सवाल मनसेने उपस्थित केला आहे. तर याठिकाणी गणेशोत्सव काळात कृत्रिम तलाव देखील उभारत गणेश विसर्जन केले जाते. त्यामुळे या उपकेंद्रात शिक्षणाऐवजी इतर सर्व घडामोडी घडत असल्याचा आरोप मनसेने केला आहे. सध्या याठिकाणी विद्यार्थ्यांच्या परीक्षा सुरू असल्याने केवळ मनसेने निवेदन देत याठिकाणी सर्व अभ्यासक्रम सुरू करण्याची मागणी केली.

हे उपकेंद्र सुरू होऊन ५ वर्षे झाली असून फक्त ११ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. तर ठाण्यातील उपकेंद्रात तब्बल ५०० विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.या उपकेंद्रांची कुठलीही जाहिरात नसून केवळ निवडणूक कार्यालय आणि अधिकाऱ्यांना बसण्याचे ठिकाण म्हणून याचा वापर होत आहे. कल्याणच्या आसपास शेकडो खेडी असून येथील विद्यार्थ्याना याचा उपयोग व्हायला हवा. जर कल्याणमधील विद्यार्थ्यांना याचा उपयोग होत नसेल तर कल्याणकरांनी उपकेंद्राला दिलेली जागा परत घेण्याची वेळ आली असल्याची प्रतिक्रिया प्रकाश भोईर यांनी दिली. तर याठिकाणी सर्व अभ्यासक्रम सुरू न केल्यास उपकेंद्राला टाळे ठोकण्याचा इशारा देखील मनसेच्या वतीने यावेळी देण्यात आला.

यावेळी माजी आमदार प्रकाश भोईर यांच्यासह मनसे जिल्हाध्यक्ष उल्हास भोईर, मुरबाड शहापूर विधानसभा जिल्हाध्यक्षा नयना भोईर, मनसे विद्यार्थी सेना शहर अध्यक्ष विनोद केणे, महिला शहर अध्यक्षा कस्तूरी देसाई, उपशहर अध्यक्ष गणेश चौधरी, राजन शितोळे, सचिन शिंदे, रोहन पोवार, सुनील घेगडे, कपिल पवार, महेश बनकर, गणेश लांडगे, संदीप पंडित, अभिजीत मालुंजकर, विराज चौधरी आदी पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

Web Title: Mns warns to block mumbai universitys sub centre only 11 students study in sub centre in kalyan thane maharashtra maharashtra political party

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 15, 2024 | 11:29 AM

Topics:  

  • kalyan
  • maharashtra
  • Maharashtra Government
  • Mumbai University
  • thane

संबंधित बातम्या

Thane Pollution Control: ठाणे शहराच्या पर्यावरणाचा ‘ॲक्शन प्लॅन’! महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून सविस्तर आढावा
1

Thane Pollution Control: ठाणे शहराच्या पर्यावरणाचा ‘ॲक्शन प्लॅन’! महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून सविस्तर आढावा

Devendra Fadnavis : बिबट्याचे मानवावरील हल्ले ‘राज्य आपत्ती’, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निर्देश
2

Devendra Fadnavis : बिबट्याचे मानवावरील हल्ले ‘राज्य आपत्ती’, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निर्देश

Supreme Court: चेक बाउन्स प्रकरणांवर सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल! व्यापारी कर्मचारींसह सामान्य नागरिकांनी दिलासा
3

Supreme Court: चेक बाउन्स प्रकरणांवर सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल! व्यापारी कर्मचारींसह सामान्य नागरिकांनी दिलासा

Maharashtra Clean Energy Mission : महाराष्ट्र स्वच्छ ऊर्जेत देशाचे नेतृत्व करणार—अणुऊर्जेत ऐतिहासिक पाऊल!
4

Maharashtra Clean Energy Mission : महाराष्ट्र स्वच्छ ऊर्जेत देशाचे नेतृत्व करणार—अणुऊर्जेत ऐतिहासिक पाऊल!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.