Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

भीमाशंकर फिरण्याचा प्लॅन बनवताय? मंदिरातील गर्दीचे व्‍यवस्‍थापन करण्यासाठी ‘या’ प्रकल्पाची सुरुवात

मोहित कंबोज भारतीय फाउंडेशनने ३० दिवसांच्या श्रावण यात्रेदरम्यान सुरक्षितता वाढवण्यासाठी आणि दर्शन सहजसाध्‍य करण्यासाठी आगळ्यावेगळ्या गर्दी व्यवस्थापन पायलट प्रकल्पाची सुरुवात केली आहे.

  • By मयुर नवले
Updated On: Jul 31, 2025 | 08:35 PM
भीमाशंकर फिरण्याचा प्लॅन बनवताय? मंदिरातील गर्दीचे व्‍यवस्‍थापन करण्यासाठी 'या' प्रकल्पाची सुरुवात

भीमाशंकर फिरण्याचा प्लॅन बनवताय? मंदिरातील गर्दीचे व्‍यवस्‍थापन करण्यासाठी 'या' प्रकल्पाची सुरुवात

Follow Us
Close
Follow Us:

महाराष्ट्रात प्रमुख तीर्थस्थळांवर विशेषतः श्रावणासारख्या सणासुदीच्या महिन्यांत भाविक मोठ्या संख्‍येने येतात, परिणामत: गर्दी वाढते. ज्यामुळे सुरक्षितता, गर्दी नियंत्रण आणि एकूण तीर्थयात्रेच्या अनुभवाबाबत चिंता निर्माण होते. महाराष्ट्रातील सह्याद्री पर्वतरांगांमध्ये वसलेले आणि बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक म्हणून पूजनीय असलेले भीमाशंकर मंदिर येथे भाविक मोठ्या प्रमाणात येतात. मर्यादित प्रवेश असलेल्या डोंगराळ प्रदेशात वसलेले हे मंदिर श्रावणात लाखो भाविकांचे लक्ष वेधून घेते, ज्यामुळे अनेकदा लांब रांगा आणि गर्दी पाहायला मिळते.

Ganeshotsav 2025 : गणेश मंडळांना मोठा दिलासा! गणेशोत्सवातील मंडपाच्या खड्ड्यावरील वाढीव दंड रद्द

श्रावण महिन्यात भाविकांची मोठी गर्दी उसळत असल्याचे लक्षात घेऊन मोहित कंबोज भारतीय फाउंडेशनने भीमाशंकर मंदिरात एक आगळावेगळा गर्दी व्यवस्थापन पायलट प्रकल्प सुरू केला आहे. यशस्वी ठरल्यास हा प्रकल्प देशभरातील अन्य तीर्थस्थळांवर राबवता येईल, अशी अपेक्षा आहे.

भाविकांच्या वाढत्या पार्श्वभूमीवर, मोहित कंबोज भारतीय फाउंडेशनने केअरटेन या संस्थेच्या सहयोगाने ‘समुदाय-संचालित’ गर्दी व्यवस्थापन प्रणाली विकसित केली आहे. या यंत्रणेमध्ये स्थानिक तरुण स्वयंसेवकांना गर्दी नियंत्रण, संवाद, आपत्कालीन प्रतिसाद आणि प्राथमिक उपचारांचे प्रशिक्षण देण्यात आले आहे. केअरटेनच्या तज्ञ मार्गदर्शनात बॅरिकेडिंग, रांगांचे व्यवस्थापन, सीसीटीव्ही देखरेख आणि वॉकी-टॉकीसह सुसज्ज पोशाखात स्वयंसेवक तैनात करण्यात आले आहेत.

या यंत्रणेमध्ये स्पष्ट चिन्हांकन असलेले व्हीआयपी मार्ग, शौचालय सुविधा, प्रथमोपचार केंद्रे आणि जेष्ठ नागरिकांसाठी स्वतंत्र रांगा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. मंदिर प्रशासनाच्या समन्वयातून दररोज १५ दिवस सातत्याने सूचना दिल्या जात आहेत, ज्यामुळे भाविकांना दर्शनाच्या मार्गांची, पाण्याच्या सुविधा आणि बाहेर पडण्याच्या वाटांची माहिती मिळते. रुग्णवाहिका, वैद्यकीय पथक आणि पार्किंग/वाहतूक यंत्रणेसह संपूर्ण परिसराचे नियंत्रण ठेवले जात आहे.

कोल्हापुरात काँग्रेसला मोठा धक्का? ‘हा’ बडा नेता राष्ट्रवादीच्या वाटेवर; पक्षप्रवेशाची तारीख…

फाउंडेशनचे संस्थापक मोहित कंबोज म्हणाले, “हे फक्‍त गर्दीवर नियंत्रण ठेवण्‍यासाठी नाही. यामधून वृद्ध असो किंवा तरूण प्रत्‍येक भक्‍ताला सुरक्षित, आदरणीय व आध्‍यात्मिकरित्‍या समाधनकारक अनुभव मिळण्‍याची खात्री घेतली जाते. आजच्या काळात, धार्मिक स्थळांवर गर्दी व्यवस्थापन हा पर्याय नसून जबाबदारी आहे. इतक्या मोठ्या मेळाव्यांसह आपल्याला जीवनाचे रक्षण करण्‍यासोबत पावित्र्य जपणाऱ्या यंत्रणांची गरज आहे.'”

भीमाशंकर मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष सुरेश कौदरे यांनी यावर समाधान व्यक्त करत सांगितले की, “श्रावण महिन्यातील भाविक व्यवस्थापन हे आमच्यासाठी नेहमीच कठीण राहिले आहे. फाउंडेशनचा समुदाय-केंद्रित आणि शिस्तबद्ध दृष्टिकोन कौतुकास्पद आहे.”

हा प्रकल्प भारतातील इतर गर्दीग्रस्त तीर्थस्थळांवर अंमलात आणता येईल. मंदिर व्यवस्थापन, आध्यात्मिकता, सुरक्षा आणि स्थानिक समुदायाचा समावेश एकत्र करून भविष्यातील तीर्थयात्रेचा नवा आदर्श घालून देणारा हा उपक्रम ठरू शकतो.

Web Title: Mohit kamboj foundation has developed a community driven crowd management system for bhimashankar

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 31, 2025 | 08:35 PM

Topics:  

  • Marathi News
  • pune news

संबंधित बातम्या

Maharashtra Politics: “आमचा आवाज दाबण्यासाठी…”; रोहित पवारांचा सरकारवर घणाघात
1

Maharashtra Politics: “आमचा आवाज दाबण्यासाठी…”; रोहित पवारांचा सरकारवर घणाघात

Jain Boarding चा व्यवहार संगमताने असून हा घोटाळा उघड करा Ravindra Dhangekar ची पोलिसात तक्रार
2

Jain Boarding चा व्यवहार संगमताने असून हा घोटाळा उघड करा Ravindra Dhangekar ची पोलिसात तक्रार

Mira Road : मीरारोडच्या इंडियन ऑईल पेट्रोल पंपावर पेट्रोल चोरीचा आरोप
3

Mira Road : मीरारोडच्या इंडियन ऑईल पेट्रोल पंपावर पेट्रोल चोरीचा आरोप

Buldhana : मतदार यादी दुरुस्त करा, शिवसेना ठाकरे पक्षाच्या प्रवक्त्या Jayshree Shelke यांची मागणी
4

Buldhana : मतदार यादी दुरुस्त करा, शिवसेना ठाकरे पक्षाच्या प्रवक्त्या Jayshree Shelke यांची मागणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.