Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

पुणे रेल्वे विभागात दरवर्षी 16 लाखांहून अधिक युनिट वीजनिर्मिती; सुमारे 1 कोटी 66 लाख रुपयांची बचत

पुणे रेल्वे विभागातील रेल्वेस्थानके आणि कोचिंग डेपोच्या इमारतींवर सौरपॅनल बसवून वीजनिर्मिती सुरू केली आहे. या प्रकल्पांमधून दर महिन्याला साधारण पावणेदोन लाख युनिट वीज तयार होत आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: Mar 13, 2026 | 01:17 PM
पुणे रेल्वे विभागात दरवर्षी 16 लाखांहून अधिक युनिट वीजनिर्मिती; सुमारे 1 कोटी 66 लाख रुपयांची बचत

पुणे रेल्वे विभागात दरवर्षी 16 लाखांहून अधिक युनिट वीजनिर्मिती; सुमारे 1 कोटी 66 लाख रुपयांची बचत

Follow Us
Close
Follow Us:

पुणे : पर्यावरणपूरक ऊर्जा वापर वाढवण्याच्या उद्देशाने पुणे रेल्वे विभागाने सौरऊर्जा प्रकल्पांचा व्यापक वापर सुरू केला आहे. विभागातील प्रमुख रेल्वे इमारती व पायाभूत सुविधांवर उभारलेल्या सौरऊर्जा प्रकल्पांमधून दरवर्षी सुमारे 16 लाखांहून अधिक युनिट वीजनिर्मिती होत असून, त्यामुळे रेल्वेला अंदाजे 1 कोटी 66 लाख रुपयांची बचत होत आहे.

पुणे रेल्वे विभागातील रेल्वेस्थानके आणि कोचिंग डेपोच्या इमारतींवर सौरपॅनल बसवून वीजनिर्मिती सुरू केली आहे. या प्रकल्पांमधून दर महिन्याला साधारण पावणेदोन लाख युनिट वीज तयार होत असून, रेल्वे प्रशासनाच्या वीज खर्चात मोठी बचत होत आहे. त्याचबरोबर पर्यावरण संरक्षणालाही हातभार लागत आहे. पुणे रेल्वे विभागाने २०१६ मध्ये पुणे रेल्वेस्थानकाच्या इमारतीवर १६० किलोवॉट क्षमतेचा सोलर पीव्ही रूफटॉप पॉवर प्लांट बसवून सौरऊर्जेचा वापर सुरू केला.

त्यानंतर विभागाने पुणे, दौंड, सातारा, कोल्हापूर, शिवाजीनगर, खडकी, पिंपरी, डिझेल लोकोशेड, डीआरएम कार्यालय इमारत आणि इतर महत्त्वाच्या रेल्वेच्या ४२ ठिकाणी २.७४ मेगावॉट क्षमतेचे सोलर रूफटॉप पॉवर प्लांट बसवले आहेत. या प्रकल्पांमुळे रेल्वेच्या कामकाजासाठी लागणारी वीज स्थानिक पातळीवरच निर्माण होत असल्याने ऊर्जा वापर अधिक कार्यक्षम झाला आहे. तसेच पारंपरिक ऊर्जेवरील अवलंबित्व कमी होण्यास मदत होत असून, कार्बन उत्सर्जनातही घट झाली आहे.

अनेक सौरऊर्जा प्रकल्प बसवण्यात आले

पुणे रेल्वे विभागात आतापर्यंत २ हजार ९१९ किलोवॉट क्षमतेचे सौरऊर्जा प्रकल्प बसविण्यात आले असून, भविष्यात रेल्वेच्या विस्तृत पायाभूत सुविधांचा उपयोग करून सौरऊर्जेचा वापर आणखी वाढवण्याचा प्रयत्न सुरू आहे.

– हेमंत कुमार बेहेरा, जनसंपर्क अधिकारी, पुणे विभाग.

रत्नागिरी परिमंडळात थकबाकीदारांचा आकडा मोठा

दुसरीकडे, विजेचा वापर केल्यानंतरही बिलांचा मासिक भरणा नियमित होत नसल्याने रत्नागिरी परिमंडल अंतर्गत प्रामुख्याने घरगुती, व्यावसायिक, औद्योगिक, सार्वजनिक सेवा व इतर वर्गवारीतील १ लाख ६७ हजार ८२५ ग्राहकांकडे २५ कोटी ९१ लाख रुपयांची थकबाकी झाली आहे. यामुळे गेल्या दोन महिन्यांत परिमंडल अंतर्गत १ हजार १८२ ग्राहकांचा वीजपुरवठा तात्पुरत्या स्वरुपात खंडित करण्यात आला आहे. त्यामुळे थकबाकीदार वीजग्राहकांनी बिलांचा भरणा देय दिनांकापूर्वी करावा व वीजपुरवठा खंडित करण्याची कटू कारवाई टाळावी, असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.

Web Title: More than 16 lakh units of electricity are generated annually in pune railway division

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 13, 2026 | 01:17 PM

Topics:  

  • Indian Railway
  • pune news

संबंधित बातम्या

सीमा शुल्क विभागाची मोठी कारवाई; सणसवाडीत तब्बल 1.79 कोटींचे मेफेड्रॉन जप्त
1

सीमा शुल्क विभागाची मोठी कारवाई; सणसवाडीत तब्बल 1.79 कोटींचे मेफेड्रॉन जप्त

बालगंधर्व रंगमंदिरांचा पुनर्विकास होणार; महापालिका तब्बल 185 काेटी रुपये खर्च करणार
2

बालगंधर्व रंगमंदिरांचा पुनर्विकास होणार; महापालिका तब्बल 185 काेटी रुपये खर्च करणार

सीटच्या वादातून जनरल कोचमध्ये गोंधळ; पत्नीला शिवी देताच व्यक्तीने महिलेला केली जबर मारहाण, घटनेचा Video Viral
3

सीटच्या वादातून जनरल कोचमध्ये गोंधळ; पत्नीला शिवी देताच व्यक्तीने महिलेला केली जबर मारहाण, घटनेचा Video Viral

Pune शहरात कमर्शियल गॅसचा पुरवठा बंद; केवळ रूग्णालये अन्…; कोणाला होणार पुरवठा?
4

Pune शहरात कमर्शियल गॅसचा पुरवठा बंद; केवळ रूग्णालये अन्…; कोणाला होणार पुरवठा?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.