Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पाटणबोरीत डासांचा प्रादुर्भाव वाढला! नालेसफाई अभावी ठिकठिकाणी साचले पाणी; स्वच्छतेचा अभाव

पावसाळ्यात साचलेल्या पाण्यामुळे डासांची पैदास वाढण्याची शक्यता अधिक असते. त्यामुळे भविष्यात आरोग्याच्या समस्या निर्माण होण्यापूर्वीच ग्रामपंचायतीने प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे आवश्यक आहे.

  • By सुरुची कदम
Updated On: Aug 09, 2026 | 11:20 AM
पाटणबोरीत डासांचा प्रादुर्भाव वाढला! नालेसफाई अभावी ठिकठिकाणी साचले पाणी; स्वच्छतेचा अभाव

पाटणबोरीत डासांचा प्रादुर्भाव वाढला! नालेसफाई अभावी ठिकठिकाणी साचले पाणी; स्वच्छतेचा अभाव

Follow Us
Follow Us:

मागील काही दिवसांपासून परिसरात पावसाचा जोर वाढल्याने पाटणबोरी गावात डासांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला आहे. गावातील नाले व गटारींची नियमित साफसफाई होत नसल्याने अनेक ठिकाणी पाणी साचले असून, त्यात घाण व कचरा जमा झाल्यामुळे डासांची पैदास वाढत असल्याचे चित्र दिसून येत आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये आरोग्याबाबत चिंता निर्माण झाली आहे.(फोटो सौजन्य – istock)

Yavatmal New: थकबाकीच्या बोझ्यात शहराचा विकास! नगर परिषद-एमजेपीच्या आर्थिक कोंडीत शहराचे रस्त्यांची दुरवस्था

पाटणबोरी हे जिल्ह्यातील मोठ्या ग्रामपंचायतींपैकी एक मानले जाते. मात्र, सध्या गावातील अनेक भागांमध्ये स्वच्छतेचा अभाव जाणवत आहे. गल्लोगल्ली नाल्यांमध्ये साचलेले पाणी, ठिकठिकाणी पडलेला कचरा तसेच वाढलेली लहान-मोठी झुडपे यामुळे अस्वच्छतेचे प्रमाण वाढले आहे. पावसामुळे या परिस्थितीत आणखी भर पडली असून, डासांसाठी पोषक वातावरण निर्माण झाले आहे. एकीकडे डासांचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत असताना स्थानिक प्रशासनाकडून अद्याप अपेक्षित उपाययोजना झालेल्या दिसत नाहीत, अशी नागरिकांची तक्रार आहे. विशेषतः मुख्य रस्त्यांसह गावातील अंतर्गत गल्लीबोळांमध्ये नियमित स्वच्छता करणे, नाल्यांची साफसफाई करणे आणि डास प्रतिबंधक औषधांची फवारणी करणे गरजेचे आहे.

पाटणबोरीच्या शेजारील काही गावांमध्ये स्थानिक प्रशासनाकडून स्वच्छतेसह नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने विविध उपाययोजना केल्या जात आहे. पिण्याच्या पाण्याची स्वच्छता, घरगुती पाणी निर्जंतुक करण्यासाठी औषधांचे वाटप तसेच परिसरात स्वच्छता राखण्यासाठी प्रयत्न केले जात असल्याने त्याचे कौतुक होत आहे. मात्र, पाटणबोरीसारख्या मोठ्या ग्रामपंचायतीत अशा उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी केव्हा होणार, असा सवाल नागरिक उपस्थित करीत उपलब्ध आहेत. ग्रामपंचायतीकडे असलेल्या निधीचा उपयोग नागरिकांच्या मूलभूत सुविधा आणि आरोग्याच्या प्रश्नांसाठी प्रभावीपणे करण्यात यावा, अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करीत आहेत.

पावसाळ्यात साचलेल्या पाण्यामुळे डासांची पैदास वाढण्याची शक्यता अधिक असते. त्यामुळे भविष्यात आरोग्याच्या समस्या निर्माण होण्यापूर्वीच ग्रामपंचायतीने प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे आवश्यक आहे. गावातील नाले व गटारींची साफसफाई, साचलेल्या पाण्याचा निचरा, कचरा उचलणे, वाढलेली झुडपे हटविणे आणि मुख्य रस्त्यांसह सर्व गल्लीबोळांत डास प्रतिबंधक फवारणी करणे गरजेचे आहे.

Yavatmal News: २६ हजार हेक्टर पिकांना तडाखा! तब्बल २३,९५२ शेतकरी बाधित; अतिवृष्टीने शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी

प्रतिबंधक औषधांची मदत होऊ शकते डासांचा त्रास वाढल्याने नागरिक स्वतःच्या पातळीवर अगरबत्ती, डास प्रतिबंधक साधने आणि इतर साहित्य खरेदी करून बचाव करण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्यामुळे नागरिकांच्या खिशावर अतिरिक्त आर्थिक भार पडत आहे. मात्र, ग्रामपंचायतीकडून संपूर्ण गावात सामूहिक पद्धतीने डास फवारणी केल्यास डासांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात कमी होण्यास मदत होऊ शकते.

डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.

💡

Frequently Asked Questions

  • Que: पाटणबोरीत डासांचा प्रादुर्भाव वाढण्याचे कारण काय आहे?

    Ans: नालेसफाईचा अभाव आणि ठिकठिकाणी साचलेले पाणी यामुळे डासांची पैदास वाढण्याची शक्यता आहे.

  • Que: साचलेल्या पाण्यामुळे डासांचा धोका का वाढतो?

    Ans: साचलेले पाणी डासांच्या प्रजननासाठी अनुकूल ठरू शकते. त्यामुळे अशा ठिकाणी डासांची संख्या वाढू शकते.

  • Que: डासांपासून बचाव करण्यासाठी नागरिकांनी काय काळजी घ्यावी?

    Ans: घराभोवती पाणी साचू देऊ नये, पाण्याची भांडी झाकून ठेवावीत, परिसर स्वच्छ ठेवावा आणि आवश्यकतेनुसार डास प्रतिबंधक उपायांचा वापर करावा.

Web Title: Mosquito menace on the rise in patanbori water stagnating in various places due to lack of drain cleaning poor sanitation

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 09, 2026 | 11:20 AM

Topics:  

  • Dengue Virus
  • health issue
  • Yavatmal

संबंधित बातम्या

Health Update: शस्त्रक्रियेत मज्जातंतूंवर नजर; इजा होताच इशारा! पालिका रुग्णालयांत अत्याधुनिक ‘नर्व्ह मॉनिटरिंग’ प्रणाली
1

Health Update: शस्त्रक्रियेत मज्जातंतूंवर नजर; इजा होताच इशारा! पालिका रुग्णालयांत अत्याधुनिक ‘नर्व्ह मॉनिटरिंग’ प्रणाली

Health Update: Ovarian Cyst म्हणजे कॅन्सर नाही? रजोनिवृत्तीपूर्वी अंडाशयातील गाठींबाबत जाणून घ्या सविस्तर माहिती
2

Health Update: Ovarian Cyst म्हणजे कॅन्सर नाही? रजोनिवृत्तीपूर्वी अंडाशयातील गाठींबाबत जाणून घ्या सविस्तर माहिती

Yavatmal News: पावसाअभावी सोयाबीन करपला! ढगाळ वातावरणात किडींचा हल्ला; शेंगा भरण्याच्या अवस्थेत पिकाची कोंडी
3

Yavatmal News: पावसाअभावी सोयाबीन करपला! ढगाळ वातावरणात किडींचा हल्ला; शेंगा भरण्याच्या अवस्थेत पिकाची कोंडी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.