Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Mumbai Crime |
  • Lifestyles |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Manerajuri Tasgaon Drowning: लेकरासाठी आईने तलावात टाकली उडी; पण नियतीचा क्रूर खेळ, माय-लेकीचा पाण्यात बुडून दुर्दैवी अंत

Manerajuri Tasgaon Drowning: सांगली जिल्ह्यातील तासगाव तालुक्यातील मणेराजुरी येथे पाझर तलावात बुडणाऱ्या ७ वर्षांच्या मुलीला वाचवताना २८ वर्षीय आईचाही बुडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या हृदयद्रावक घटनेमुळे संपूर्ण जिल्हा शोकाकुल आहे.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Jun 10, 2026 | 08:08 PM
लेकरासाठी आईने तलावात टाकली उडी; पण नियतीचा क्रूर खेळ

लेकरासाठी आईने तलावात टाकली उडी; पण नियतीचा क्रूर खेळ

Follow Us
Follow Us:
  • लेकरासाठी आईने तलावात टाकली उडी
  • पण नियतीचा क्रूर खेळ
  • माय-लेकीचा पाण्यात बुडून दुर्दैवी अंत
तासगाव, (वा): मुलगी पाण्यात बुडत असल्याचे पाहताच तिच्या जीवासाठी एका आईने क्षणाचाही विलंब न लावता तलावात उडी घेतली. आपल्या लेकराला वाचविण्यासाठी तिने जीवाची पर्वा केली नाही. मात्र नियतीने घात केला आणि आई-मुलगी दोघींचाही पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. या हृदयद्रावक घटनेमुळे मणेराजुरी परिसरात शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. ही दुर्दैवी घटना बुधवारी दुपारच्या सुमारास मणेराजुरी (ता. तासगाव) येथील मणेराजुरी-वज्रचौंडे मार्गावरील भोसलेनगरजवळ असलेल्या चिमणखोरा पाझर तलावात घडली. मंजू संतोष जाधव (वय ७) आणि तिची आई सत्वाला संतोष जाधव (वय २८) अशी मृत माय-लेकींची नावे आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, सत्वाला जाधव या आपल्या दोन मुलींना घेऊन तलावावर धुणी धुण्यासाठी गेल्या होत्या. तलावाच्या काठावर त्या मोठ्या मुलीसह धुण्याच्या कामात व्यस्त होत्या. दरम्यान, सात वर्षांची मंजू तलावाच्या काठावर खेळत होती. खेळता खेळता ती नकळत पुढे गेली आणि अचानक खोल पाण्यात पडून बुडू लागली.

आपली मुलगी पाण्यात तडफडत असल्याचे दिसताच सत्वाला जाधव यांनी कोणताही विचार न करता तिच्या मदतीसाठी तलावात उडी घेतली. मात्र तलावातील पाण्याची खोली आणि परिस्थितीचा अंदाज न आल्याने त्या स्वतःही पाण्यात अडकल्या. काही क्षणांतच आई आणि मुलगी दोघीही पाण्याच्या गर्तेत गेल्या.

Khed News: उन्हाळी सुट्टी ठरली शेवटची! जगबुडी नदीत ३ तरुणांचा बुडून दुर्दैवी मृत्यू, कुटुंबावर दुःखाचा डोंगर

हा सर्व प्रकार पाहून त्यांच्यासोबत असलेल्या मोठ्या मुलीचा थरकाप उडाला. आई आणि लहान बहीण पाण्यात बुडत असल्याचे पाहून तिने मोठ्याने आरडाओरडा केला. त्याचबरोबर तिने तातडीने दूरध्वनीद्वारे आजी-आजोबांना घटनेची माहिती दिली. माहिती मिळताच कुटुंबीय आणि ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली.

स्थानिक नागरिकांनी अथक प्रयत्न करून माय-लेकींना तलावातून बाहेर काढले. त्यांना तातडीने मदत करण्याचा प्रयत्न झाला. मात्र तोपर्यंत खूप उशीर झाला होता. दोघींचाही मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले. एका क्षणात कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक विशाल टकले यांनी सहकाऱ्यांसह घटनास्थळी भेट दिली. पोलिसांनी पंचनामा करून पुढील कार्यवाही सुरू केली आहे.

दरम्यान, मुलीच्या जीवासाठी स्वतःचा जीव धोक्यात घालणाऱ्या आईच्या या ममतेने संपूर्ण परिसर भावुक झाला आहे. सकाळपर्यंत हसत-खेळत असलेले कुटुंब दुपारपर्यंत उद्ध्वस्त झाले. या दुर्दैवी घटनेने मणेराजुरीसह संपूर्ण तासगाव तालुका शोकमग्न झाला असून माय-लेकींच्या अकाली निधनाबद्दल सर्व स्तरांतून हळहळ व्यक्त होत आहे.

क्षणात होत्याचे नव्हते…

धुणी धुण्यासाठी गेलेल्या आईला कल्पनाही नव्हती की हा दिवस तिच्या आयुष्यातील अखेरचा ठरेल. मुलगी पाण्यात बुडत असल्याचे पाहून तिने मायेपोटी तलावात उडी घेतली, मात्र दोघींनाही जीव गमवावा लागला. या घटनेने मातृत्वाची सर्वोच्च भावना आणि नियतीचा क्रूर खेळ एकाच वेळी समोर आला आहे.

खेड तालुक्यात भेसळयुक्त मँगो पल्पवर मोठी कारवाई; लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त

Web Title: Mother and seven year old daughter drowned in pazhar talav at manerajuri tasgaon sangli

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 10, 2026 | 08:06 PM

Topics:  

  • sangli news
  • Tasgaon News

संबंधित बातम्या

‘कारखान्याला घुस लागल्याने ‘महांकाली’ बंद पडला’, जयसिंगराव शेंडगेंचा घणाघात; कारखाना वाचवण्यासाठी संदीप आबांचे आवाहन
1

‘कारखान्याला घुस लागल्याने ‘महांकाली’ बंद पडला’, जयसिंगराव शेंडगेंचा घणाघात; कारखाना वाचवण्यासाठी संदीप आबांचे आवाहन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.