उन्हाळी सुट्टी ठरली शेवटची! जगबुडी नदीत ३ तरुणांचा बुडून दुर्दैवी मृत्यू
आकाश, नरेश आणि कैलास अशी मृतांची नावे असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. हे तिघेही मूळचे सांगली जिल्ह्यातील असून गेल्या अनेक वर्षांपासून मुंबईतील कुर्ला येथे वास्तव्यास होते. उन्हाळी सुट्टीसाठी ते खेड येथे आपल्या नातेवाईकांकडे आले होते.
कोरेगाव खुर्दमध्ये दोन गटांत मारहाण, 4 जणांविरुद्ध गुन्हा दाखल; नेमकं काय घडलं?
बुधवारी दुपारच्या सुमारास ते आपल्या आणखी एका नातेवाईकासोबत जगबुडी नदीत पोहण्यासाठी गेले होते. पोहत असताना नदीतील पाण्याची खोली आणि प्रवाहाचा अंदाज न आल्याने चौघेही खोल पाण्यात अडकले. यावेळी मदतीसाठी आरडाओरड होताच स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली आणि बचावकार्य सुरू केले.
बचावकार्यादरम्यान एका युवकाला सुरक्षित बाहेर काढण्यात यश आले. मात्र आकाश, नरेश आणि कैलास यांना वाचविण्याचे सर्व प्रयत्न निष्फळ ठरले. यामुळे तिघांचाही पाण्यात बुडून मृत्यू झाला.
या घटनेची माहिती मिळताच परिसरात मोठी खळबळ उडाली.
सुट्टीचा आनंद घेण्यासाठी आलेल्या तिघांचा एकाच वेळी मृत्यू झाल्याने नातेवाईकांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या दुर्दैवी घटनेमुळे खेड शहरासह परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून संबंधित यंत्रणांकडून पुढील तपास सुरू आहे.
खेड तालुक्यात भेसळयुक्त मँगो पल्पवर मोठी कारवाई; लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त






