Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 18 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Mumbai News: जुहू चौपाटीवर कचऱ्याचा डोंगर! ६ तासांत ८६ टन कचरा हटवला

Mumbai News: पावसाळ्यात समुद्रातून मोठ्या प्रमाणात कचरा किनाऱ्यावर वाहून येत असल्याने मुंबईतील समुद्रकिनाऱ्यांची स्वच्छता राखणे आव्हानात्मक ठरते. याच पार्श्वभूमीवर जुहू चौपाटीवर सहा तासांची विशेष स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेत तब्बल ८६ टन कचरा हटविण्यात आला.

  • By Riddhi Vanne
Updated On: Aug 18, 2026 | 06:31 PM
Mumbai News: जुहू चौपाटीवर कचऱ्याचा डोंगर! (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

Mumbai News: जुहू चौपाटीवर कचऱ्याचा डोंगर! (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

Follow Us
Follow Us:
  • जुहू चौपाटीवर ६ तासांची विशेष स्वच्छता मोहीम
  • तब्बल ८६ टन कचरा हटविण्यात आला
  • २२० कर्मचारी आणि स्वयंसेवकांचा सहभाग
Juhu Beach Clean-Up Drive : पावसाळ्यात समुद्रातून मोठ्या प्रमाणात कचरा किनाऱ्यावर येत असल्याने मुंबईच्या समुद्रकिनाऱ्यांची स्वच्छता राखणे आव्हानात्मक ठरते. या पार्श्वभूमीवर ‘सुमीत ग्रुप एंटरप्रायझेस’च्या ‘सुमीत फॅसिलिटीज’तर्फे जुहू चौपाटीवर सहा तासांची विशेष स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेदरम्यान सुमारे ८६ टन कचरा हटविण्यात आला. कचरा संकलन आणि हटविण्याचे काम वेगाने पूर्ण करण्यासाठी २२० कर्मचारी, स्थानिक स्वयंसेवक, स्वच्छता यंत्रे आणि ट्रॅक्टर्स तैनात करण्यात आले होते.

या स्वच्छता मोहिमेची पाहणी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे (एमपीसीबी) अध्यक्ष सिद्धेश रामदास कदम यांनी केली. त्यांनी जुहू चौपाटीला भेट देऊन मोहिमेसाठी तैनात करण्यात आलेले मनुष्यबळ आणि यंत्रसामग्रीची पाहणी केली. Mumbai News:

मुंबईचे समुद्रकिनारे स्वच्छ ठेवण्यासाठी नागरिक, प्रशासन आणि जबाबदार

यावेळी सिद्धेश कदम म्हणाले, “नागरिक म्हणून आपण पर्यावरणासाठी काय करीत आहोत, हा प्रश्न स्वतःला विचारण्याची गरज आहे. समुद्रकिनाऱ्यावर दिसणारा कचरा हा अनेकदा आपण वापरलेल्या वस्तूंची योग्य विल्हेवाट न लावल्यामुळे निर्माण होतो. पावसाळ्यात मुंबईच्या समुद्रकिनाऱ्यावर येणाऱ्या कचऱ्याचे प्रमाण मोठे असते. त्यामुळे अतिरिक्त मनुष्यबळ आणि नियोजनबद्ध प्रयत्नांची गरज आहे. मुंबईचे समुद्रकिनारे स्वच्छ ठेवण्यासाठी नागरिक, प्रशासन आणि जबाबदार संस्थांनी एकत्रितपणे काम करणे आवश्यक आहे.”

या उपक्रमाबाबत सुमीत ग्रुप एंटरप्रायझेसचे कार्यकारी अध्यक्ष सुमित साळुंके म्हणाले, “आमच्यासाठी कॉर्पोरेट जबाबदारी म्हणजे आमच्या क्षमता आणि संसाधनांचा समाजाच्या हितासाठी योग्य वेळी उपयोग करणे. मुंबईची किनारपट्टी ही शहराच्या पर्यावरणीय आणि नागरी वारशाचा महत्त्वाचा भाग आहे. जुहू चौपाटीवर साचलेला जवळपास ८६ टन कचरा पावसाळ्यात शहरासमोरील आव्हानाची व्याप्ती दर्शवितो. आमच्या २२० कर्मचाऱ्यांनी यंत्रसामग्री आणि स्वयंसेवकांच्या मदतीने या उपक्रमात योगदान दिल्याचा मला अभिमान आहे.

या उपक्रमासाठी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष सिद्धेश रामदास कदम यांच्या नेतृत्वाबद्दल आणि प्रोत्साहनाबद्दल मी मनःपूर्वक आभार मानतो. पर्यावरणाच्या प्रश्नांवर मात करण्यासाठी सरकार, नागरिक आणि जबाबदार संस्थांनी एकत्रितपणे काम करणे आवश्यक आहे.”

“व्यवसायापलीकडेही उद्योगांची सामाजिक जबाबदारी असते, असा आमचा विश्वास आहे. संस्था ज्या समाजात आणि पर्यावरणात कार्यरत आहेत, त्यांच्याप्रती त्यांनी जबाबदार राहणे आवश्यक आहे. आपल्या मनुष्यबळाचा, संसाधनांचा आणि क्षमतांचा शक्य तिथे जनहितासाठी उपयोग करणे ही आमची भूमिका आहे. स्वच्छ शहरे, सक्षम समाज आणि शाश्वत भविष्यासाठी अर्थपूर्ण योगदान देणे, हीच आमची बांधिलकी आहे,” असेही त्यांनी स्पष्ट केले.

Navi Mumbai Crane Accident: ऐरोली माईंडस्पेसमध्ये क्रेनचा हुक तुटला; एकाचा जागीच मृत्यू, दुसऱ्याने उपचारादरम्यान जीव गमावला

(बीएमसी) दीर्घकालीन व्यावसायिक संबंधांच्या पार्श्वभूमीवर हा उपक्रम

जुहू चौपाटी ही ‘सुमीत फॅसिलिटीज’च्या नियमित कार्यक्षेत्रात येत नसतानाही शहराच्या स्वच्छता प्रयत्नांना हातभार लावण्यासाठी कंपनीने आपले मनुष्यबळ आणि संसाधने उपलब्ध करून दिली. बृहन्मुंबई महानगरपालिकेसोबतच्या (बीएमसी) दीर्घकालीन व्यावसायिक संबंधांच्या पार्श्वभूमीवर हा उपक्रम राबविण्यात आला. मुंबईच्या किनारपट्टीवरील सागरी कचऱ्याची समस्या दूर करण्यासाठी महापालिका प्रशासन, खासगी संस्था आणि नागरिकांचा सातत्यपूर्ण व समन्वयित सहभाग आवश्यक असून, पर्यावरण संवर्धन आणि स्वच्छ सार्वजनिक जागांसाठी कॉर्पोरेट सामाजिक उत्तरदायित्वाच्या माध्यमातून योगदान देण्याची बांधिलकी ‘सुमीत फॅसिलिटीज’ने व्यक्त केली आहे.

स्वीकृत नगरसेवक नियुक्तीचा रखडलेला प्रस्ताव पुन्हा पटलावर; गुरुवारी होणाऱ्या महासभेकडे लक्ष

सुमीत ग्रुप एंटरप्रायझेसविषयी

‘सुमीत ग्रुप एंटरप्रायझेस’ ही भारतातील व्यवसाय सेवा क्षेत्रातील आघाडीची कंपनी असून देशातील २० हून अधिक राज्यांमध्ये तिचे कार्य सुरू आहे. समूहात ५० हजारांहून अधिक कर्मचारी कार्यरत आहेत. सुविधा व्यवस्थापन, कचरा व्यवस्थापन, सुरक्षा सेवा आणि आपत्कालीन वैद्यकीय सेवा अशा विविध क्षेत्रांमध्ये सुमीत ग्रुप सेवा पुरवितो.

Web Title: Mountain of garbage at juhu chowpatty 86 tonnes of waste removed in 6 hours

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 18, 2026 | 06:31 PM

Topics:  

  • maharashtra news
  • Mumbai News

संबंधित बातम्या

Jalgaon News: ग्रामसभेत प्रश्नांचा भडिमार अन् अचानक घडला अनर्थ! ग्रामसेवकाला जीव गमवावा लागला, नेमकं काय घडलं?
1

Jalgaon News: ग्रामसभेत प्रश्नांचा भडिमार अन् अचानक घडला अनर्थ! ग्रामसेवकाला जीव गमवावा लागला, नेमकं काय घडलं?

जेलमधील गर्दी कमी करण्यासाठी मोठा निर्णय; जामीन, जेल कोर्ट आणि नव्या कारागृहांवर भर… सरकारचा नवा प्लॅन
2

जेलमधील गर्दी कमी करण्यासाठी मोठा निर्णय; जामीन, जेल कोर्ट आणि नव्या कारागृहांवर भर… सरकारचा नवा प्लॅन

समुद्रात ‘मरीन नेव्हिगेशन बॉईज’ची सोय!ओहोटी रेषेच्या चिन्हांकनासाठी पालिकेचा २.७७ कोटींचा प्रस्ताव
3

समुद्रात ‘मरीन नेव्हिगेशन बॉईज’ची सोय!ओहोटी रेषेच्या चिन्हांकनासाठी पालिकेचा २.७७ कोटींचा प्रस्ताव

Maharashtra Breaking News Today 2026: शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हावर आज सर्वोच्च न्यायालयात पुन्हा सुनावणी
4

Maharashtra Breaking News Today 2026: शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हावर आज सर्वोच्च न्यायालयात पुन्हा सुनावणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.