
Maharashtra Breaking News LIVE Updates Today:
18 Aug 2026 09:30 AM (IST)
Nashik Live-in Partner Murder: नाशिकमध्ये प्रेमसंबंधातून झालेल्या हत्येचा एक अत्यंत धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. गेल्या १५ वर्षांपासून 'लिव्ह-इन रिलेशनशिप'मध्ये (Live-in Relationship) राहणाऱ्या एका महिलेने आपल्या मित्राच्या मदतीने प्रियकराचा गळा चिरून निघृण खून केला.
हत्येनंतर पुरावा नष्ट करण्यासाठी आरोपींनी मृतदेह तब्बल १८ तास घरातच लपवून ठेवला होता. त्यानंतर मध्यरात्रीच्या सुमारास कारमधून नेऊन तो कसारा घाटात फेकून दिला. नाशिक पोलिसांच्या गुन्हे शाखा युनिट-१ च्या (Crime Branch Unit-1) पथकाने कसारा घाटातून हा मृतदेह शोधून काढला आहे.
वसंत गोरखनाथ सातपुते (वय ४०, रा. स्वराज्यनगर, पाथर्डी फाटा, नाशिक) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. वसंत सातपुते आणि संशयित महिला हसीना शेख हे दोघे गेल्या १५ वर्षांपासून एकत्र राहत होते.
18 Aug 2026 09:24 AM (IST)
Mira Road Hit and Run: मिरा-भाईंदर शहरात बेदरकार आणि भरधाव वाहनचालकांचा धुमाकूळ सुरूच असल्याचे अत्यंत धक्कादायक चित्र पुन्हा एकदा समोर आले आहे. मिरा रोड येथील जे.पी. रोडच्या पाठीमागील रस्त्यावर १७ ऑगस्ट रोजी रात्री सुमारे ८:३० वाजता एका भरधाव वाहनाने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या नागरिकांना जोरदार धडक दिली. धडक दिल्यानंतर अपघातग्रस्त चालकाने मदत करण्याऐवजी वाहनासह घटनास्थळावरून थेट पलायन केले. या थरारक अपघाताचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे.
18 Aug 2026 09:18 AM (IST)
Maharashtra Rules of Business 2026: राज्य शासनाकडून महाराष्ट्र शासन कार्यपद्धती नियम, २०२६ (Maharashtra Government Rules of Business, 2026) अधिसूचित करण्यात आले असून, प्रशासकीय पातळीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अधिकारात मोठी वाढ झाली आहे. या नव्या नियमांनुसार, सार्वजनिक हिताच्या दृष्टीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना महायुती सरकारमधील कोणत्याही मंत्र्याने घेतलेला निर्णय फिरवण्याचा किंवा बदलण्याचा थेट कायदेशीर अधिकार मिळाला आहे.
18 Aug 2026 09:12 AM (IST)
Thane Eknath Shinde Event Controversy: ठाण्यात राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत आयोजित एका अधिकृत कार्यक्रमात मोठा protocol घोळ झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. कार्यक्रमाच्या सुरुवातीला अधिकृत राष्ट्रगीत किंवा राष्ट्रीय गीत 'वंदे मातरम्' ऐवजी बॉलिवूड चित्रपटातील 'वंदे मातरम्' हे गाणे वाजवण्यात आले. विशेष म्हणजे, या प्रसंगी मंचावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह अनेक प्रमुख मंत्री आणि प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते. गाणे चुकीचे वाजूनही एकनाथ शिंदे यांच्यासह सर्व उपस्थितांनी अत्यंत स्तब्ध राहून त्या गाण्याला सन्मान दिला.
18 Aug 2026 09:06 AM (IST)
Prajakta Mali Flat Purchase: मराठी मनोरंजनसृष्टीतील प्रसिद्ध आणि लोकप्रिय अभिनेत्री प्राजक्ता माळी हिने मुंबईत स्वतःचे आलिशान घर खरेदी केले आहे. मुंबईतील उच्चभ्रू मानल्या जाणाऱ्या गोरेगाव पूर्व परिसरातील 'ओबेरॉय एक्स्विझिट' (Oberoi Exquisite) या भव्य गृहप्रकल्पात प्राजक्ताने हा नवा फ्लॅट घेतला आहे.
प्राजक्ताने खरेदी केलेला हा फ्लॅट 'ओबेरॉय एक्स्विझिट' टॉवर 'सी'च्या २८ व्या मजल्यावर स्थित आहे.या फ्लॅटचा कार्पेट एरिया ९९६ चौरस फूट इतका आहे.या घरासोबत सुमारे २४० चौरस फुटांची टँडम कार पार्किंग (Tandem Car Parking) सुविधा देखील तिला मिळाली आहे. या नव्या घराची अधिकृत व्यवहार नोंदणी १२ ऑगस्ट २०२६ रोजी पूर्ण झाली आहे.
18 Aug 2026 09:00 AM (IST)
Petrol Diesel Price Today: कच्च्या तेलाच्या आंतरराष्ट्रीय दरांमध्ये वाढ झाली असली तरी भारतीय बाजारात पेट्रोल आणि डिझेलच्या किरकोळ किमतींमध्ये आज कोणतीही वाढ झालेली नाही. केंद्र सरकारने पेट्रोलवरील विशेष अतिरिक्त उत्पादन शुल्क (SAED) पूर्णपणे शून्य केले असून, डिझेल व विमान इंधनावरील (ATF) निर्यात शुल्कातही मोठी कपात केली आहे.सरकारी तेल कंपन्यांनी (OMCs) १८ ऑगस्ट २०२६ साठी जाहीर केलेल्या नव्या दरपत्रकानुसार देशातील प्रमुख शहरांमध्ये इंधनाचे दर स्थिर आहेत.
आजच्या ताज्या दरानुसार, मुंबईत पेट्रोलचा भाव १११.३१ रुपये प्रति लिटर आणि डिझेलचा भाव ९७.८३ रुपये प्रति लिटर आहे. पुण्यात पेट्रोल ११२.०२ रुपये प्रति लिटर आणि डिझेल ९८.६६ रुपये प्रति लिटर दराने विकले जात आहे. देशाची राजधानी नवी दिल्लीत पेट्रोलचा भाव १०२.१२ रुपये प्रति लिटर आणि डिझेलचा भाव ९५.२० रुपये प्रति लिटर आहे. याशिवाय, बंगळूरमध्ये पेट्रोल १११.६८ रुपये प्रति लिटर आणि डिझेल ९९.५६ रुपये प्रति लिटर दराने उपलब्ध आहे.
18 Aug 2026 08:48 AM (IST)
Dimagi Naksal News:१५ ऑगस्ट रोजी लाल किल्ल्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या भाषणातील एका वाक्यांशाने सोशल मीडियावर खळबळ उडवून दिली. पंतप्रधानांनी म्हटले की, जंगलात शस्त्र उचलणाऱ्या नक्षलवाद्यांविरुद्ध देशाला मोठे यश मिळाले आहे, परंतु अजूनही असे 'दिमागी नक्सल' आहेत जे विचारधारेच्या माध्यमातून देशात अशांतता पसरवण्याची संधी शोधत असतात. त्यांनी अशा व्यक्तींना ओळखून त्यांना वेगळे करण्याचे आवाहन केले. पण आता त्यांच्या या वक्तव्याचे बुमरँग झाल्याचे दिसत आहे. सोशल मीडियावर दिमागी नक्सल पार्टी नावाने नवी मोहिम सुरू झाली आहे.
Shivsena Politics : शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हावर आज सर्वोच्च न्यायालयात पुन्हा सुनावणी
मुंबई : शिवसेनेचे नाव आणि ‘धनुष्यबाण’ या निवडणूक चिन्हावरून उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे गटांमध्ये सर्वोच्च न्यायालयात कायदेशीर लढाई सुरू आहे. या प्रकरणाची न्यायालयात सतत सुनावणी सुरू आहे. सर्वोच्च न्यायालय आज या प्रकरणाची पुन्हा सुनावणी घेणार आहे. ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल हे ठाकरे गटाचे प्रतिनिधित्व करत आहेत. वाचा सविस्तर-