
युतीमध्ये भांडण होण्याचा प्रश्नच नाही – नरेश म्हस्के
उद्धव ठाकरे यांच्या दौऱ्यावर म्हस्के यांची टीका
मनोज जरांगे पाटील यांच्या प्रकरणात केले भाष्य
Naresh Mhaske: राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत. निवडणुका जाहीर झाल्यामुळे राज्यातील राजकारण देखील तापले आहे. आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या आहेत. दरम्यान शिवसेनेचे खासदार नरेश म्हस्के यांनी आज पत्रकार परिषद घेऊन अनेक विषयांवर भाष्य केले आहे. यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर देखील टीका केली आहे.
पार्थ पवार यांच्यावर होत असलेल्या जमीन प्रकरणातील आरोपावर बोलताना खासदार नरेश म्हस्के म्हणाले, “या प्रकरणात मुख्यमंत्र्यांनी यांनी योग्य खुलासा केला आहे. या प्रकरणाची चौकशी होणार आहे. विजय वडेट्टीवार स्वतःचं अस्तित्व दाखवण्यासाठी आणि मंत्री होण्यासाठी आरोप करत आहेत. याचा महायुतीवर याचा काही परिणाम होणार नाही.”
पुढे बोलताना खासदार नरेश म्हस्के म्हणाले, “स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत. महायुती म्हणून आमची लढण्याची पूर्ण तयारी आहे. ठाणे, अंबरनाथ, बदलापूर, शहापूर, भिवंडी, पालघर तसेच सर्वच ठिकाणी युतीतून निवडणूक होणार. ठाण्याचा महापौर भगव्या विचारसरणीचा होणार.”
उद्धव ठाकरे यांच्यावर बोलताना नरेश म्हस्के म्हणाले, “त्यांच्या दौऱ्यात लोक येत नाहीत. कार्यकर्त्यांना जबरदस्तीने बसवले जात आहे. माझा पक्ष चोरला अशी एकच कॅसेट उद्धव ठाकरे गेल्या चार दिवसांपासून वाजवत आहेत. संजय राऊताची सकाळी उठून भुंकायची जबाबदारी उद्धव ठाकरेंनी घेतली आहे.”
मोहोळमध्ये ठाकरेंची शिवसेना स्वतंत्र लढणार
मोहोळ तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका शिवसेना ठाकरे गटाच्या माध्यमातून मशाल चिन्हावर स्वतंत्र लढविणार असल्याचे उपनेते शरद कोळी यांनी सांगितले. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कार्यकर्त्यांना बळ देण्यासाठी असतात. गावच्या शाखा प्रमुखाला मान सन्मान मिळाला पाहिजे. यासाठी आजपर्यंत पक्षासाठी त्याग केलेल्यांना उमेदवारी देऊन त्यांना निवडून आणण्याचे काम करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
मोहोळमध्ये ठाकरेंची शिवसेना स्वतंत्र लढणार; कार्यकर्ता मेळाव्यात बड्या नेत्याचा निर्धार
नेत्यांचे शिवसैनिकांच्या समस्येकडे दुर्लक्ष
दरम्यान तालुक्यातील नेत्यांनी व पदाधिकाऱ्यांनी सामान्य शिवसैनिकांच्या समस्या ऐकून घेतल्या नाहीत व पक्ष वाढीसाठी कोणतेही कार्यक्रम राबविले नसल्याचे मत शिवसैनिकांनी मांडले. तालुक्यात पुन्हा शिवसेनेचा झंझावात निर्माण करण्यासाठी शिवसैनिकांमध्ये उत्साह तयार करण्यासाठी प्रत्येक जिल्हा परिषद गटात कार्यकर्ता मेळावा आयोजित करावा, अशी मागणी शिवसैनिकांनी केली.