Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 31 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Purandar Airport : पुरंदर विमानतळाबाबत खासदार संजय राऊतांचे गंभीर सवाल; अहवाल सार्वजनिक करण्याची मागणी

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी सोशल मीडिया पोस्टद्वारे पुरंदर विमानतळाच्या प्रस्तावित जागेवरून तसेच हवाई क्षेत्राशी संबंधित तांत्रिक बाबींवर गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. 

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Aug 31, 2026 | 02:47 PM
पुरंदर विमानतळाबाबत खासदार संजय राऊतांचे गंभीर सवाल; अहवाल सार्वजनिक करण्याची मागणी

पुरंदर विमानतळाबाबत खासदार संजय राऊतांचे गंभीर सवाल; अहवाल सार्वजनिक करण्याची मागणी

Follow Us
Follow Us:
  • पुरंदर विमानतळाबाबत खासदार संजय राऊतांचे गंभीर सवाल
  •  अहवाल सार्वजनिक करण्याची मागणी
  • जमीन ताब्यात घेण्याची प्रक्रिया थांबवण्याचीही मागणी
मुंबई : पुरंदर विमानतळाच्या प्रस्तावित प्रकल्पावरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते संजय राऊत यांनी गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. पुरंदर विमानतळासाठी सात गावांतील शेतकऱ्यांच्या जमिनी घेतल्या जात असताना मोबदला, पुनर्वसन आणि जमीन संपादनाच्या प्रक्रियेबाबत शेतकऱ्यांवर दबाव आणला जात असल्याचा आरोप राऊत यांनी केला आहे. मात्र, आता केवळ जमीन संपादनाचा नाही तर विमानतळाच्या तांत्रिक व्यवहार्यता आणि प्रवासी सुरक्षेचाही प्रश्न महत्त्वाचा असल्याचे संजय राऊत यांनी म्हटले आहे.

राऊत यांनी सोशल मीडिया पोस्टद्वारे विमानतळाच्या प्रस्तावित जागेवरून तसेच हवाई क्षेत्राशी संबंधित तांत्रिक बाबींवर गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. पुरंदर तालुक्यातील सासवड आणि जेजुरी परिसरातील सात गावांच्या हद्दीत या विमानतळाचा प्रकल्प प्रस्तावित आहे. विमानतळासाठी आवश्यक असलेल्या एकूण 1,216 हेक्टर जमिनीपैकी 92 टक्क्यांहून अधिक जमिनीचे भूसंपादन पूर्ण झाल्याचे सांगितले जात आहे. मात्र, याच पार्श्वभूमीवर प्रकल्पाची तांत्रिक व्यवहार्यता आणि सुरक्षा निकषांची पूर्तता झाली आहे का, असा सवाल राऊत यांनी उपस्थित केला आहे.

पुरंदर विमानतळासाठी सात गावांतील शेतकऱ्यांच्या सुपीक जमिनी घेतल्या जात असल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला आहे. मोबदला, पुनर्वसन आणि संमतीच्या प्रक्रियेबाबतही त्यांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. राऊतांच्या मते, या प्रक्रियेदरम्यान शेतकऱ्यांवर दबाव आणला जात असल्याचा दावा केला जात आहे. 29 ऑगस्टच्या अहवालाचा संदर्भ देत राऊत यांनी विमानतळाच्या प्रस्तावित ठिकाणाबाबत काही तांत्रिक बाबी स्पष्ट होणे आवश्यक असल्याचे म्हटले आहे. यामध्ये फनेल झोन, NDA-लोहगाव हवाई क्षेत्र, ATS Route W28, Obstacle Limitation Surface (OLS), डोंगराळ भूभाग, रनवेची दिशा तसेच विमानांच्या उड्डाण आणि अवतरणाचा प्रोफाइल यांचा समावेश आहे. या पार्श्वभूमीवर जवळच्या लष्करी हवाई क्षेत्राशी विमानतळाच्या हवाई वाहतुकीचा संघर्ष होण्याची शक्यता आहे का? विमानांना दोन्ही दिशांनी सुरक्षितपणे उड्डाण आणि अवतरण करता येईल का? या प्रश्नांची स्पष्ट उत्तरे अद्याप सार्वजनिक झालेली नसल्याचा दावा राऊत यांनी केला आहे.

 अपघात झाल्यास जबाबदारी कोणाची

प्रवासी सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य दिले पाहिजे, असे सांगत राऊत यांनी भविष्यात विमानतळावर अपघात झाल्यास जबाबदारी कोणाची असेल, असा सवाल केला आहे. विमानतळाची जागा निश्चित करणारे अधिकारी, हवाई क्षेत्राची मंजुरी देणारे संबंधित प्राधिकरण, तांत्रिक अहवाल तयार करणारे सल्लागार किंवा प्रकल्पाला मंजुरी देणारे सरकार, यापैकी जबाबदारी कोणाची असेल, हे प्रकल्प पुढे नेण्यापूर्वीच स्पष्ट झाले पाहिजे, अशी भूमिका संजय राऊत यांनी मांडली आहे.

तांत्रिक अहवाल सार्वजनिक करण्याची मागणी

पुरंदर विमानतळाशी संबंधित सर्व महत्त्वाचे तांत्रिक अहवाल सार्वजनिक करण्याची मागणी संजय राऊत यांनी केली आहे. यामध्ये फनेल झोन स्टडी, एअरसपेस कोऑर्डिनेशन रिपोर्ट, OLS सर्वे, टेरन-ऑब्स्टॅकल स्टडी, रनवे ओरिएंटेशन जस्टिफिकेशन आणि स्वतंत्र सुरक्षा ऑडिट हे सर्व अहवाल तातडीने सार्वजनिक करावेत, अशी मागणी केली आहे. हे अहवाल सार्वजनिक झाल्यानंतरच विमानतळाच्या प्रस्तावित जागेची तांत्रिक व्यवहार्यता आणि प्रवासी सुरक्षेच्या दृष्टीने असलेली स्थिती स्पष्ट होईल, असा राऊत यांनी भूमिका मांडली आहे.

हे सुद्धा वाचा : चाकणच्या वाहतूक कोंडीवर ‘ॲक्शन प्लॅन’, 31 ऑगस्टची डेडलाइन; जिल्हाधिकाऱ्यांनी दिले ‘हे’ महत्वाचे निर्देश

जमीन ताब्यात घेण्याची प्रक्रिया थांबवावी

विकासाच्या नावाखाली शेतकऱ्यांच्या जमिनी घेणे आणि प्रवासी सुरक्षेशी तडजोड करणे योग्य नाही, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे. आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी आवश्यक असलेल्या सुरक्षा मानकांची पूर्तता होत असल्याची खात्री होईपर्यंत प्रकल्प पुढे नेऊ नये, अशी मागणी त्यांनी केली आहे. तसेच, विमानतळाशी संबंधित तांत्रिक अहवाल तातडीने सार्वजनिक करावेत आणि प्रवासी सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य द्यावे, अशी भूमिका त्यांनी मांडली आहे. त्याचबरोबर जमीन ताब्यात घेण्याची प्रक्रिया थांबवावी, अशी मागणीही राऊत यांनी केली आहे.

Web Title: Mp sanjay raut has raised serious questions regarding the purandar airport

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 31, 2026 | 02:46 PM

Topics:  

  • Farmers
  • MP Sanjay Raut
  • Purandar Airport

संबंधित बातम्या

Farmers Crisis: पावसाने दिली हुलकावणी; सोयाबीन उत्पादक शेतकरी संकटात, तातडीच्या मदतीची मागणी
1

Farmers Crisis: पावसाने दिली हुलकावणी; सोयाबीन उत्पादक शेतकरी संकटात, तातडीच्या मदतीची मागणी

प्रथम ‘भारतकेसरी’ ओम्या बैलाचे निधन; मावळ तालुक्यातील बैलगाडा मालक अन् चाहत्यांकडून हळहळ व्यक्त
2

प्रथम ‘भारतकेसरी’ ओम्या बैलाचे निधन; मावळ तालुक्यातील बैलगाडा मालक अन् चाहत्यांकडून हळहळ व्यक्त

Purandar Airport Land Acquisition: पुरंदर विमानतळाच्या भूसंपादनावरून सासवडमध्ये कौटुंबिक वाद विकोपाला
3

Purandar Airport Land Acquisition: पुरंदर विमानतळाच्या भूसंपादनावरून सासवडमध्ये कौटुंबिक वाद विकोपाला

मुबलक साठा असताना अचानक साखरेची दरवाढ का? राजू शेट्टी यांचा हल्लाबोल; 20 हजार कोटींच्या घोटाळ्याचा आरोप
4

मुबलक साठा असताना अचानक साखरेची दरवाढ का? राजू शेट्टी यांचा हल्लाबोल; 20 हजार कोटींच्या घोटाळ्याचा आरोप

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.