Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 22 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Sangli News: “विजेता कोण हे घोषणा नाही, जनता ठरवते!” गोपीचंद पडळकरांच्या इशाऱ्याला खासदार विशाल पाटील यांनी सुनावले

खा. विशाल पाटील यांनी पडळकरांना प्रत्युत्तर देत, “लोकसभा निवडणुकीत कोण विजयी होणार हे कुणाच्या घोषणांनी ठरत नाही, तर जनतेच्या मतांनी ठरते. माझ्याबाबतचा अंतिम निर्णय जनताच घेईल,” असे स्पष्ट केले.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Apr 07, 2026 | 07:52 PM
गोपीचंद पडळकरांच्या इशाऱ्याला खासदार विशाल पाटील यांनी सुनावले (Photo Credit- X)

गोपीचंद पडळकरांच्या इशाऱ्याला खासदार विशाल पाटील यांनी सुनावले (Photo Credit- X)

Follow Us
Follow Us:

 

  • “विजेता कोण हे घोषणा नाही, जनता ठरवते!”
  • गोपीचंद पडळकरांच्या इशाऱ्याला खासदार विशाल पाटील यांनी सुनावले
सांगली :  भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी “२०२९ मध्ये सांगलीचा खासदार भाजपचाच असेल आणि विशाल पाटील खासदार नसतील,” असे थेट आव्हान दिल्यानंतर राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. या पार्श्वभूमीवर खा. विशाल पाटील यांनी पडळकरांना प्रत्युत्तर देत, “लोकसभा निवडणुकीत कोण विजयी होणार हे कुणाच्या घोषणांनी ठरत नाही, तर जनतेच्या मतांनी ठरते. माझ्याबाबतचा अंतिम निर्णय जनताच घेईल,” असे स्पष्ट केले.

पाटील म्हणाले, “गेल्या लोकसभा निवडणुकीत पडळकरांना माझ्यापेक्षा कमी मते मिळाली होती. आता जातीयतेचा आधार घेऊन आणि वैयक्तिक टीका करून विजय मिळविल्याचे ते सांगत असले, तरी अशा प्रकारच्या राजकारणावर माझा विश्वास नाही.” त्यांनी आपल्या विकासाभिमुख कामकाजाचा पुनरुच्चार करत, “मी नेहमीच मतदारसंघातील विकासकामे, जनतेच्या समस्या आणि योजनांची अंमलबजावणी यावर लक्ष केंद्रित केले आहे,” असे सांगितले.

Sangli Politics: जयंत पाटील यांना मोठा दणका; सांगली बाजार समितीचे त्रिभाजन लागू

काल सांगलीत झालेल्या भाजप मेळाव्यात पडळकरांनी आक्रमक भूमिका घेत २०२९ च्या निवडणुकीसाठी आतापासूनच तयारी सुरू असल्याचे सांगितले होते. “भाजपचा विजय निश्चित करण्यासाठी आम्ही जीवाचे रान करू,” असा इशारा देत त्यांनी सांगलीसह पलूस-कडेगाव आणि इस्लामपूर भागातही जोर लावणार असल्याचे जाहीर केले होते.

यावर प्रतिक्रिया देताना पाटील म्हणाले, “लोकशाहीत मतदारच सर्वश्रेष्ठ असतो. त्यामुळे कोणत्याही आव्हानांना उत्तर देण्यापेक्षा मी जनतेचा विश्वास संपादन करण्यावर भर देणार आहे.” या आरोप-प्रत्यारोपांमुळे सांगलीच्या राजकारणात पुन्हा एकदा वातावरण तापले असून, आगामी २०२९ च्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा वाद अधिक तीव्र होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

तुमचा काळा इतिहास बाहेर काढायला लावू नका; संजय पाटलांचा जयंत पाटलांना इशारा

Web Title: Mp vishal patil hits back at gopichand padalkars warning

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 07, 2026 | 07:52 PM

Topics:  

  • gopichand padalkar
  • Sangli
  • Sangli Politics
  • Vishal Patil

संबंधित बातम्या

पश्चिम महाराष्ट्र आता भाजपचा बालेकिल्ला; जयकुमार गोरे यांचा दावा, आगामी निवडणुकांसाठी संघटन मजबूत
1

पश्चिम महाराष्ट्र आता भाजपचा बालेकिल्ला; जयकुमार गोरे यांचा दावा, आगामी निवडणुकांसाठी संघटन मजबूत

शक्तीपीठ महामार्गाविरोधात उद्या सांगलीत एल्गार; राजू शेट्टी, जयंत पाटील, रोहित पवार, विशाल पाटील मोर्चात सहभागी होणार
2

शक्तीपीठ महामार्गाविरोधात उद्या सांगलीत एल्गार; राजू शेट्टी, जयंत पाटील, रोहित पवार, विशाल पाटील मोर्चात सहभागी होणार

Maharashtra Politics: राज्यात नाट्यमय हालचाली? ‘या’ नेत्याने केली गोपीचंद पडळकरांच्या राजीनाम्याची मागणी
3

Maharashtra Politics: राज्यात नाट्यमय हालचाली? ‘या’ नेत्याने केली गोपीचंद पडळकरांच्या राजीनाम्याची मागणी

Kupwad Double Murder Case:  कुपवाड दुहेरी हत्याकांड प्रकरणी गोपीचंद पडळकर आक्रमक; सांगली-कुपवाडमध्ये बंदची हाक
4

Kupwad Double Murder Case: कुपवाड दुहेरी हत्याकांड प्रकरणी गोपीचंद पडळकर आक्रमक; सांगली-कुपवाडमध्ये बंदची हाक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.