Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • Gudi Padwa |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Sangli News: ‘पीएम सूर्य घर’ योजनेची अंमलबजावणी प्रभावीपणे करा; खासदार विशाल पाटील यांचे महावितरणला निर्देश

सांगलीचे खासदार विशाल पाटील यांनी 'पीएम सूर्य घर' योजनेचा आढावा घेतला. सौर विक्रेत्यांच्या समस्या सोडवून योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे आदेश त्यांनी महावितरणला दिले आहेत.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Mar 15, 2026 | 08:32 PM
Sangli News: ‘पीएम सूर्य घर’ योजनेची अंमलबजावणी प्रभावीपणे करा; खासदार विशाल पाटील यांचे महावितरणला निर्देश
Follow Us
Close
Follow Us:

 

  • ‘पीएम सूर्य घर’ योजनेची अंमलबजावणी प्रभावीपणे करा
  • खासदार विशाल पाटील यांचे महावितरणला निर्देश
सांगली : ‘पीएम सूर्य घर’ योजना, सौरऊर्जा प्रकल्पांबाबत प्रशासनाने गांभीर्याने अमलबाजवणी करावी, आशा सूचना सांगली लोकसभा मतदारसंघाचे खासदार विशाल पाटील यांनी दिल्या, त्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्ह्यातील रूफटॉप सोलार प्रकल्पांच्या अंमलबजावणीसंदर्भात आढावा बैठक पार पडली. या बैठकीत प्रकल्पांच्या अंमलबजावणीतील अडचणी, तांत्रिक समस्या आणि प्रक्रियेत सुधारणा करण्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.

बैठकीस महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी मर्यादित कंपनीच्या स्वतंत्र संचालिका नीताताई केळकर, मुख्य अभियंता स्वप्नील काटकर, अधीक्षक अभियंता अमित बोकील, आमदार सत्यजित देशमुख, तसेच जिल्ह्यातील महावितरणचे सर्व कार्यकारी अभियंते व संबंधित अधिकारी उपस्थित होते.

या वेळी ऑल इंडिया रिन्यूएबल एनर्जी असोसिएशनच्या सांगली जिल्हा संचालिका स्नेहा संजय पाटील यांनी जिल्ह्यातील सौर विक्रेत्यांच्या वतीने सौर प्रकल्पांच्या अंमलबजावणीत येणाऱ्या विविध कार्यात्मक अडचणी मांडल्या. सौर प्रकल्पांची डिजिटल प्रक्रिया सर्वत्र लागू करणे, ग्राहक नाव बदल प्रक्रियेत होणारा विलंब, गुणवत्ता तपासणीतील विसंगती, जनरेशन मीटर तपासणीतील उशीर, रिलीज ऑर्डर व कमिशनिंग पत्र देण्यात होणारा विलंब, AMISP संस्थांशी समन्वयातील अडचणी तसेच नव्या बिलिंग प्रणालीतील त्रुटी या प्रमुख मुद्द्यांकडे त्यांनी लक्ष वेधले.

Sangli News: माजी खासदारांच्या गावात राजकीय भूंकप! चिंचणीचे लोकनियुक्त सरपंच सदाशिव माळी यांचा अचानक राजीनामा

याशिवाय फीडर स्तरावरील व्होल्टेज ओव्हरव्होल्टेज- अंडरव्होल्टेज यामुळे छतावरील सौर प्रणालींच्या उत्पादनावर होणाऱ्या परिणामाबाबतही चर्चा करण्यात आली. सौर विक्रेते व ग्राहकांना येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी सांगली जिल्ह्यासाठी एकसमान आणि स्पष्ट मार्गदर्शक परिपत्रक जारी करण्याची मागणीही स्नेहा पाटील यांनी मांडली.

या सर्व मुद्द्यांवर चर्चा झाल्यानंतर खासदार विशालदादा पाटील यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना सौर विक्रेता संघटनेने मांडलेल्या अडचणी गांभीर्याने घेऊन त्यावर आवश्यक ती कार्यवाही करण्याचे निर्देश दिले. केंद्र शासनाच्या “पीएम सूर्य घर : मोफत वीज योजना” तसेच राज्यातील वितरित सौरऊर्जा योजनांची अंमलबजावणी सुलभ, पारदर्शक आणि वेळेत होण्यासाठी प्रशासनाने समन्वयाने काम करावे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

Sangali News: तासगावच्या द्राक्ष संशोधन केंद्राकडे दुर्लक्ष का? सांगलीच्या आमदारांचा लक्षवेधीद्वारे सरकारला सवाल

Web Title: Mp vishal patil reviews pm surya ghar yojana implementation in sangli

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 15, 2026 | 08:32 PM

Topics:  

  • mahavitaran
  • Sangli
  • sangli news
  • Vishal Patil

संबंधित बातम्या

Sangli Crime: धक्कादायक! संशयाच्या भरात पतीने पत्नीचा जीव घेतला; नातेवाईकांसमोरच मारहाण
1

Sangli Crime: धक्कादायक! संशयाच्या भरात पतीने पत्नीचा जीव घेतला; नातेवाईकांसमोरच मारहाण

कोयनेतून सिंचनासाठी विसर्ग सुरू; सांगली पाटबंधारे विभागाकडून मागणी वाढली
2

कोयनेतून सिंचनासाठी विसर्ग सुरू; सांगली पाटबंधारे विभागाकडून मागणी वाढली

तुमचा काळा इतिहास बाहेर काढायला लावू नका; संजय पाटलांचा जयंत पाटलांना इशारा
3

तुमचा काळा इतिहास बाहेर काढायला लावू नका; संजय पाटलांचा जयंत पाटलांना इशारा

Kavathe Mahankal: निसर्ग कोपला अन् कर्ज नडलं; मळणगावच्या कष्टकरी शेतकऱ्याचा विदारक अंत
4

Kavathe Mahankal: निसर्ग कोपला अन् कर्ज नडलं; मळणगावच्या कष्टकरी शेतकऱ्याचा विदारक अंत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.