Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 17 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

MSRTC NCMC Card: ST प्रवाशांसाठी मोठी सुविधा! NCMC कार्ड आता ‘या’ वरून करा रिचार्ज; केंद्रावर जाण्याची गरज नाही

MSRTC NCMC Card: एसटीच्या NCMC कार्डधारकांसाठी डिजिटल सुविधा आणखी सुलभ झाली आहे. 15 सप्टेंबर 2026 पासून BHIM Appच्या माध्यमातून NCMC कार्डचे Top-up करता येणार आहे. कार्डच्या पाठीमागील QR कोड BHIM Appमधून स्कॅन करून आवश्यक रक्कम कार्डमध्ये जमा करता येईल.

  • By श्वेता झगडे
Updated On: Sep 17, 2026 | 03:02 PM
ST प्रवाशांसाठी मोठी सुविधा! NCMC कार्ड आता 'या' वरून करा रिचार्ज; केंद्रावर जाण्याची गरज नाही

ST प्रवाशांसाठी मोठी सुविधा! NCMC कार्ड आता 'या' वरून करा रिचार्ज; केंद्रावर जाण्याची गरज नाही

Follow Us
Follow Us:
  • NCMC कार्डचा Top-up आता घरबसल्या!
  • QR Code स्कॅन करा अन् काही क्षणांत रिचार्ज
  • STचे NCMC कार्ड BHIM Appवरून करता येणार Top-up
MSRTC NCMC Card: महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (MSRTC) NCMC कार्डधारक प्रवाशांसाठी महत्त्वाची डिजिटल सुविधा सुरू करण्यात आली आहे. आता प्रवाशांना BHIM Appच्या माध्यमातून NCMC कार्डचे Top-up करता येणार आहे. त्यामुळे कार्डमधील शिल्लक रक्कम संपल्यानंतर रिचार्ज करण्यासाठी संबंधित केंद्रावर जाण्याची गरज कमी होणार असून मोबाईलवरूनच रक्कम जमा करता येईल.

15 सप्टेंबरपासून सुविधा सुरू

एसटी महामंडळाच्या माहितीनुसार, 15 सप्टेंबर 2026 पासून BHIM Appद्वारे NCMC कार्ड Top-up करण्याची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. NCMC कार्ड प्रकल्पांतर्गत अमृत ज्येष्ठ नागरिक, ज्येष्ठ नागरिक आणि महिला सवलतधारक प्रवाशांच्या कार्डची नोंदणी व वितरण प्रक्रिया सुरू आहे. या कार्डचा वापर आणखी सोपा करण्यासाठी BHIM Appशी Top-upची सुविधा जोडण्यात आली आहे. त्यामुळे प्रवाशांना आवश्यकतेनुसार कार्डमध्ये रक्कम भरता येणार आहे.

Nashik Bus Stand: बसस्थानकच आले रस्त्यावर! तीन महिने प्रवाशांचे हाल, सिटीलिंकच्या केवळ एका बसला जागा

NCMC कार्ड Top-up कसे कराल?

ही प्रक्रिया सोपी ठेवण्यात आली आहे. सर्वप्रथम मोबाईलमध्ये BHIM App उघडावे. त्यानंतर NCMC कार्डच्या पाठीमागे असलेला QR कोड BHIM Appच्या माध्यमातून स्कॅन करावा. QR कोड स्कॅन झाल्यानंतर Appमध्ये दिसणाऱ्या प्रक्रियेनुसार आवश्यक रक्कम निवडून Top-up पूर्ण करता येईल. यामुळे प्रत्येक वेळी कार्ड रिचार्ज करण्यासाठी प्रत्यक्ष केंद्रावर जाण्याची आवश्यकता राहणार नाही.

ज्येष्ठ नागरिक आणि महिलांना फायदा

NCMC कार्ड प्रकल्पामध्ये अमृत ज्येष्ठ नागरिक, ज्येष्ठ नागरिक तसेच महिला सवलतधारक प्रवाशांचा समावेश करण्यात आला आहे. विशेषतः नियमित एसटी प्रवास करणाऱ्या या प्रवाशांसाठी ऑनलाइन Top-up सुविधा उपयुक्त ठरणार आहे. कार्डमध्ये कमी शिल्लक असल्यास मोबाईलवरूनच Top-up करता येणार असल्यामुळे वेळ वाचण्यास मदत होईल.

ST च्या डिजिटल प्रवासाला आणखी चालना

एसटी महामंडळाकडून प्रवासी सेवा अधिक डिजिटल आणि सुलभ करण्याच्या दृष्टीने विविध उपाययोजना केल्या जात आहेत. त्याचाच भाग म्हणून NCMC कार्डला BHIM Appद्वारे Top-up करण्याची सुविधा उपलब्ध झाली आहे. ‘प्रवाशांच्या सेवेसाठी डिजिटल सुविधा, अधिक सुलभ आणि अधिक गतिमान प्रवास’ या उद्देशाच्या दिशेने हे महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे.

MSRTC News: एसटी महामंडळ संकटात; 4,500 कोटींहून अधिक वैधानिक देणी थकीत, 200 कोटींच्या कर्ज परतफेडीचाही मागितला हिशोब

Web Title: Msrtc ncmc card top up through bhim app qr code scan senior citizens women passengers

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 17, 2026 | 03:02 PM

Topics:  

  • msrtc
  • NCMC Card
  • st bus

संबंधित बातम्या

ST News : STच्या बसस्थानकांवर आता १२५ ‘हिरकणी कक्ष’; स्तनदा मातांसाठी मोठा निर्णय, टोयोटाच्या CSR निधीतून उभारणी
1

ST News : STच्या बसस्थानकांवर आता १२५ ‘हिरकणी कक्ष’; स्तनदा मातांसाठी मोठा निर्णय, टोयोटाच्या CSR निधीतून उभारणी

NCMC कार्ड नसेल तरीही सवलतीच्या दरात करता येणार प्रवास; पुन्हा मिळाली मुदतवाढ
2

NCMC कार्ड नसेल तरीही सवलतीच्या दरात करता येणार प्रवास; पुन्हा मिळाली मुदतवाढ

प्रवाशांच्या सेवेसाठी एसटीचा ताफा होणार अधिक सक्षम; तब्बल 5 हजार ‘लालपरी’ बसेसची निविदा प्रक्रिया पूर्ण
3

प्रवाशांच्या सेवेसाठी एसटीचा ताफा होणार अधिक सक्षम; तब्बल 5 हजार ‘लालपरी’ बसेसची निविदा प्रक्रिया पूर्ण

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.