Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pratap Sarnaik : “एसटीचा तोटा कमी करण्यासाठी ठोस उपाययोजना करा “, प्रताप सरनाईक यांचे निर्देश

एसटी महामंडळाचा तोटा कमी करण्यासाठी ठोस उपाययोजना करण्याचे निर्देश परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिले. आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी कार्यक्षम नियोजन आणि खर्च नियंत्रणावर भर देण्यास सांगितले आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Apr 15, 2026 | 03:48 PM
"एसटीचा तोटा कमी करण्यासाठी ठोस उपाययोजना करा ", प्रताप सरनाईक यांचे निर्देश

"एसटीचा तोटा कमी करण्यासाठी ठोस उपाययोजना करा ", प्रताप सरनाईक यांचे निर्देश

Follow Us
Close
Follow Us:

मुंबई : २०२५-२६ या आर्थिक वर्षात महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) आर्थिक कामगिरीबाबत परिवहन मंत्री तथा महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी स्पष्ट भूमिका मांडत तोटा कमी करण्यासाठी सर्वंकष उपाययोजना राबविण्याचे निर्देश दिले आहेत. एसटी महामंडळाच्या मुख्यालयात घेण्यात आलेल्या आढावा बैठकीत बोलत होते. या बैठकीला एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ माधव कुसेकर व सर्व खाते प्रमुख उपस्थित होते.

या आर्थिक वर्षात एसटीचे एकूण चालनीय उत्पन्न ११,४७५ कोटी रुपये इतके नोंदविण्यात आले, तर खर्च १२,०६६ कोटी रुपये झाला. परिणामी महामंडळाला तब्बल ५९१ कोटी रुपयांचा तोटा सहन करावा लागला. दैनंदिन सरासरी उत्पन्न ३१ कोटी ४० लाख रुपये असताना, खर्च ३३ कोटी रुपये इतका झाला असून दररोज सुमारे १ कोटी ६० लाख रुपयांचा तोटा होत असल्याचे त्यांनी निदर्शनास आणले. राज्यातील एकूण ३१ विभागांपैकी केवळ ८ विभाग नफ्यात असून, उर्वरित २३ विभाग तोट्यात आहेत.

Mira Bhayandar : मिरा-भाईंदरमध्ये “झोम्बी ड्रग”चा शिरकाव? सार्वजनिक सुरक्षेवर गंभीर प्रश्नचिन्ह

मागील आर्थिक वर्षात जालना, परभणी, बुलढाणा, भंडारा, गडचिरोली, अकोला, धुळे आणि वर्धा हे ८ विभाग नफ्यात होते. मात्र उर्वरित २३ विभागापैकी नाशिक, कोल्हापूर, नागपूर, रत्नागिरी, सातारा आणि ठाणे या मोठ्या विभागांचा वाढता तोटा गंभीर चिंतेचा विषय असल्याचे मंत्री सरनाईक यांनी स्पष्ट केले.

“येत्या आर्थिक वर्षात वाहतुकीचे सुयोग्य नियोजन करून उपलब्ध बसेस आणि मनुष्यबळाचा अधिकाधिक कार्यक्षम वापर करणे अत्यावश्यक आहे. उर्वरित दीड ते दोन कोटी रुपयांचा दैनंदिन तोटा भरून काढणे हे आपले मुख्य उद्दिष्ट असले पाहिजे,” असे ते म्हणाले.

तोट्यातील विभागांची सखोल चौकशी करून त्यामागील कारणांची मिमांसा करावी व त्यावर ठोस उपाययोजना राबवाव्यात, असे निर्देशही त्यांनी दिले. तसेच सातत्याने तोट्यात असलेल्या मोठ्या विभागांमध्ये सक्षम आणि कार्यक्षम अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यावर भर देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

नागपूरसारख्या मोठ्या विभागात गेल्या दोन वर्षांपासून सातत्याने तोटा होत असून तेथे अकार्यकारी विभाग नियंत्रक नेमण्यात आल्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली. “ज्या अधिकाऱ्यांकडे आर्थिक आणि वैधानिक अधिकार नाहीत, ते प्रशासनावर प्रभावी नियंत्रण ठेवू शकत नाहीत. त्यामुळे अशा अधिकाऱ्यांना पर्यायी पदस्थापना देऊन सक्षम नेतृत्व देणे आवश्यक आहे,” असे स्पष्ट मत त्यांनी व्यक्त केले.
एसटी महामंडळ आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी प्रशासनिक शिस्त, संसाधनांचा प्रभावी वापर आणि जबाबदारी निश्चिती या तत्त्वांवर भर देत लवकरच व्यापक सुधारणा आराखडा राबविण्यात येणार असल्याचेही मंत्री सरनाईक यांनी सांगितले.

मुंबई शहरात ३३ हजार झाडांची छाटणी! पालिकेचे मान्सूनपूर्व काम, उष्णता आणि वायू गुणवत्तेवर परिणाम होण्याची भीती

Web Title: Msrtc loss reduction measures instructions pratap sarnaik news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 15, 2026 | 03:48 PM

Topics:  

  • msrtc
  • pratap sarnaik
  • st bus

संबंधित बातम्या

School Bus Rule : स्कूल बस भाडेवाढीला बसणार चाप? शालेय वाहतूक अधिक सुरक्षित करण्यासंदर्भातील अधिसूचना
1

School Bus Rule : स्कूल बस भाडेवाढीला बसणार चाप? शालेय वाहतूक अधिक सुरक्षित करण्यासंदर्भातील अधिसूचना

ST Bus : एसटीत ‘अमृत’ ज्येष्ठांना स्वच्छता अधिभारावरून वाद; ज्येष्ठ नागरिक-वाहक आमने-सामने
2

ST Bus : एसटीत ‘अमृत’ ज्येष्ठांना स्वच्छता अधिभारावरून वाद; ज्येष्ठ नागरिक-वाहक आमने-सामने

Marathi Language: मराठीचा इंगा! रिक्षा-टॅक्सीचालकांनो व्हा सावध, मराठी भाषा येत नाही तर परवानाही होणार रद्द
3

Marathi Language: मराठीचा इंगा! रिक्षा-टॅक्सीचालकांनो व्हा सावध, मराठी भाषा येत नाही तर परवानाही होणार रद्द

“महावितरणला ३२ हजार कोटींचे अर्थसाहाय्य, एसटीला सुद्धा भरीव निधी द्या”, एसटी कर्मचारी काँग्रेसची राज्य सरकारकडे मागणी
4

“महावितरणला ३२ हजार कोटींचे अर्थसाहाय्य, एसटीला सुद्धा भरीव निधी द्या”, एसटी कर्मचारी काँग्रेसची राज्य सरकारकडे मागणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.