Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 9 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

आता ST चा प्रवासाच्या सवलतीसाठी ‘NCMC’ कार्ड अनिवार्य; बोगसगिरीला बसणार चाप

नवीन एनसीएमसी कार्डसाठी १९९ रुपये शुल्क आकारले जाणार आहे. कार्ड हरवल्यास किंवा पुन्हा काढायचे असल्यास १४९ रुपये मोजावे लागतील. कार्डमध्ये ५० रुपयांच्या पटीत रक्कम भरण्याची सुविधा उपलब्ध राहतील.

  • By anuradha sagar
Updated On: Feb 18, 2026 | 05:45 PM
आता ST चा प्रवासाच्या सवलतीसाठी ‘NCMC’ कार्ड अनिवार्य; बोगसगिरीला बसणार चाप
Follow Us
Follow Us:
  • विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक, महिला, दिव्यांग आणि पुरस्कारार्थी अशा ३५ संवर्गातील प्रवाशांना हे कार्ड बंधनकारक असेल.
  • ज्येष्ठ नागरिक आणि महिलांच्या नोंदणीसाठी बसस्थानकांवर विशेष व्यवस्था केली जाईल.
  • सध्या अनेक प्रवासी केवळ आधार कार्ड दाखवून सवलत घेतात, मात्र आता स्मार्ट कार्ड असल्याशिवाय प्रवास करता येणार नाही.
Kokan ST News :   रत्नागिरी जिल्ह्यासह राज्यभरातील एसटी आगारांमध्ये सवलतीच्या प्रवाशांसाठी ‘एनसीएमसी’ (नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड) कार्ड अनिवार्य करण्यात येणार आहे. बोगस ओळखपत्र दाखवून सवलतीचा लाभ घेणाऱ्यांवर चाप बसवण्यासाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (एसटी महामंडळ) लवकरच विशेष नोंदणी मोहिम राबवणार आहे.
राज्यात एसटीमार्फत विद्यार्थी, दिव्यांग, ज्येष्ठ नागरिक, महिला, पुरस्कारार्थी अशा सुमारे ३५ प्रकारच्या सवलती दिल्या जातात. सध्या अनेक प्रवासी केवळ आधार कार्ड दाखवून सवलतीचा लाभ घेत असल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे गैरप्रकार रोखण्यासाठी आणि व्यवहारात पारदर्शकता आणण्यासाठी स्मार्ट ‘एनसीएमसी’ कार्ड अनिवार्य करण्यात येत आहे. हे कार्ड असेल तरच सवलतीचा लाभ घेता येणार असून, एसटी बसमधून प्रवासही करता येणार आहे.

Maharashtra Politics: राजकारणात भूकंप होणार? राज ठाकरे-एकनाथ शिंदेंच्या भेटीला, बंधू नाराज?

 प्रमुख बसस्थानकांवर नोंदणी केंद्र
कोकणासह राज्यातील सर्व आगारांमध्ये विशेष नोंदणी मोहिम राबवण्यात येणार आहे. प्रमुख बसस्थानकांवर नोंदणी केंद्र उभारण्यात येतील. ज्येष्ठ नागरिक आणि महिलांसाठी स्वतंत्र सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती एसटी प्रशासनाने दिली आहे. या उपक्रमामुळे सवलतींची अचूक नोंद ठेवणे, गैरवापर टाळणे आणि प्रवाशांना अधिक सुरक्षित व स्मार्ट प्रवासाची सुविधा देणे शक्य होणार असल्याचा दावा महामंडळाकडून करण्यात आला आहे.

 १९९ रुपयांत नवीन कार्ड
नवीन एनसीएमसी कार्डसाठी १९९ रुपये शुल्क आकारले जाणार आहे. कार्ड हरवल्यास किंवा पुन्हा काढायचे असल्यास १४९ रुपये मोजावे लागतील. कार्डमध्ये ५० रुपयांच्या पटीत रक्कम भरण्याची सुविधा उपलब्ध राहणार असून, अधिकृत काउंटर, ईटीएम मशिन तसेच मोबाईल अ‍ॅपद्वारे रिचार्जची सोय केली जाणार आहे.

IIT मुंबईत लेक्चर सुरु असतानाच डोगेश भाईची रुबाबात एन्ट्री; VIDEO तुफान व्हायरल
सवलतधारकांसाठी आवश्यक कागदपत्रे
विद्यार्थ्यांना त्यांच्या शैक्षणिक क्रमांकाशी जोडलेले कार्ड दिले जाईल.
ज्येष्ठ नागरिक व महिलांना आधार क्रमांकाशी संलग्न कार्ड मिळेल.
दिव्यांग प्रवाशांना यूडीआयडी क्रमांकाशी जोडलेले कार्ड दिले जाईल.
पुरस्कार विजेत्यांना विभागीय कार्यालयामार्फत विशेष कार्ड वितरित केले जाईल.

 

Web Title: Msrtc ncmc card mandatory for concessional travel

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 18, 2026 | 05:45 PM

Topics:  

  • Maharashtra ST Buses
  • Maharashtra ST Department
  • MSRTC Bus

संबंधित बातम्या

मोठी बातमी ! एसटीचे तब्बल 11 अधिकारी थेट निलंबित; कामातील हलगर्जीपणा नडला
1

मोठी बातमी ! एसटीचे तब्बल 11 अधिकारी थेट निलंबित; कामातील हलगर्जीपणा नडला

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.