Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 2 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

MSRTC News: एसटी प्रवाशांसाठी महत्त्वाची सूचना! NCMC स्मार्ट कार्डशिवाय मिळणार नाही सवलत; नोंदणीला वेग

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड (NCMC) प्रकल्पाला राज्यभरातून मोठा प्रतिसाद मिळत आहे. ३० जून २०२६ पर्यंत ६२.८६ लाख प्रवाशांनी नोंदणी केली असून, ३५.५२ लाख कार्डे सक्रिय करण्यात आली आहेत.

  • By श्वेता झगडे
Updated On: Jul 02, 2026 | 03:55 PM
एसटी प्रवाशांसाठी महत्त्वाची सूचना! NCMC स्मार्ट कार्डशिवाय मिळणार नाही सवलत; नोंदणीला वेग

एसटी प्रवाशांसाठी महत्त्वाची सूचना! NCMC स्मार्ट कार्डशिवाय मिळणार नाही सवलत; नोंदणीला वेग

Follow Us
Follow Us:
  • एसटीच्या NCMC स्मार्ट कार्ड प्रकल्पाला वेग;
  • राज्यभरात ६२.८६ लाख नोंदणी, ३५.५२ लाख कार्डे सक्रिय
  • NCMC स्मार्ट कार्डशिवाय मिळणार नाही सवलत
मुंबई : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड (NCMC) प्रकल्पाला राज्यभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. ३० जून २०२६ अखेर ६२ लाख ८६ हजार ७६५ प्रवाशांनी NCMC स्मार्ट कार्डसाठी नोंदणी केली असून, त्यापैकी ३५ लाख ५२ हजार ३३२ कार्डे सक्रिय (ॲक्टिव्हेट) करण्यात आली आहेत, अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली.

१ ऑगस्ट २०२६ पासून महिला, ज्येष्ठ नागरिक आणि अमृत ज्येष्ठ नागरिक यांच्यासाठी NCMC स्मार्ट कार्ड अनिवार्य करण्यात येणार आहे. त्यामुळे ज्या पात्र प्रवाशांनी अद्याप नोंदणी केलेली नाही, त्यांनी उर्वरित कालावधीत अधिकृत परवानाधारक केंद्रांवर जाऊन NCMC स्मार्ट कार्डची नोंदणी करून घ्यावी, असे आवाहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केले आहे.

St Bus News : एसटीतील जुने ट्रॉली जॅक ठरतायत ‘मृत्यूचा सापळा’; चार कर्मचाऱ्यांचा बळी, नवीन उपकरणांची मागणी

NCMC प्रकल्पाच्या अंमलबजावणीत छत्रपती संभाजीनगर प्रदेशाने सर्वाधिक कामगिरी नोंदवली असून, तेथे १५ लाख ९३ हजार २५६ प्रवाशांनी नोंदणी केली आहे. त्यापैकी ८ लाख ८६ हजार ४७३ कार्डे सक्रिय करण्यात आली आहेत. त्यानंतर पुणे प्रदेश १४ लाख ७१ हजार ४३६ नोंदणींसह दुसऱ्या, तर नाशिक प्रदेश १४ लाख ३८ हजार ६९ नोंदणींसह तिसऱ्या क्रमांकावर आहे.

विभागनिहाय कामगिरीत जळगाव विभागाने ४ लाख ६३ हजार २३० नोंदणींसह आघाडी घेतली आहे. त्यानंतर अहिल्यानगर विभागाने ३ लाख ९५ हजार ५१५, सातारा विभागाने ३ लाख ४८ हजार ४१८, सोलापूर विभागाने ३ लाख ४२ हजार २४२, बुलढाणा विभागाने ३ लाख ३१ हजार ११ आणि बीड विभागाने ३ लाख २७ हजार ७०९ नोंदणी करून उल्लेखनीय प्रगती साधली आहे.

एसटी महामंडळाने विविध प्रवासी सवलती, डिजिटल तिकीट व्यवस्था आणि ‘वन नेशन, वन कार्ड’ ही संकल्पना प्रभावीपणे राबविण्यासाठी NCMC प्रकल्पाला प्राधान्य दिले आहे. आगामी काळात नोंदणीकृत उर्वरित प्रवाशांची कार्डे सक्रिय करण्यासाठी विशेष मोहीम अधिक गतिमान करण्यात येणार असून, राज्यातील प्रत्येक पात्र प्रवाशापर्यंत NCMC स्मार्ट कार्ड पोहोचविण्याचा महामंडळाचा निर्धार असल्याचे प्रतिपादन परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केले.

तीर्थयात्रा होणार अधिक सुलभ! ‘एसटी संगे तीर्थाटन’ योजनेत खासगी पर्यटन संस्थांना हिरवा कंदील; भाविकांना मिळणार वन-स्टॉप सुविधा

Web Title: Msrtc ncmc smart card mandatory from 1 august 2026 registration update news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 02, 2026 | 03:55 PM

Topics:  

  • msrtc
  • pratap sarnaik
  • st bus

संबंधित बातम्या

Ratnagiri Bus Accident : ब्रेक निकामी, चालकाचे नियंत्रण सुटले अन्…! रत्नागिरी जिल्ह्यात दोन एसटी बसची टक्कर, 15 विद्यार्थी जखमी
1

Ratnagiri Bus Accident : ब्रेक निकामी, चालकाचे नियंत्रण सुटले अन्…! रत्नागिरी जिल्ह्यात दोन एसटी बसची टक्कर, 15 विद्यार्थी जखमी

St Bus News : एसटीतील जुने ट्रॉली जॅक ठरतायत ‘मृत्यूचा सापळा’; चार कर्मचाऱ्यांचा बळी, नवीन उपकरणांची मागणी
2

St Bus News : एसटीतील जुने ट्रॉली जॅक ठरतायत ‘मृत्यूचा सापळा’; चार कर्मचाऱ्यांचा बळी, नवीन उपकरणांची मागणी

तीर्थयात्रा होणार अधिक सुलभ! ‘एसटी संगे तीर्थाटन’ योजनेत खासगी पर्यटन संस्थांना हिरवा कंदील; भाविकांना मिळणार वन-स्टॉप सुविधा
3

तीर्थयात्रा होणार अधिक सुलभ! ‘एसटी संगे तीर्थाटन’ योजनेत खासगी पर्यटन संस्थांना हिरवा कंदील; भाविकांना मिळणार वन-स्टॉप सुविधा

Pratap Sarnaik : आदिवासी जमीन घोटाळा प्रकरणात नवा ट्विस्ट; अप्पर तहसीलदारांच्या निलंबनाची मंत्री प्रताप सरनाईक यांची मागणी
4

Pratap Sarnaik : आदिवासी जमीन घोटाळा प्रकरणात नवा ट्विस्ट; अप्पर तहसीलदारांच्या निलंबनाची मंत्री प्रताप सरनाईक यांची मागणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.