Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 23 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

ST Employees Salary : ‘राजा उदार झाला, हाती भोपळा दिला’; एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनवाढीवरून सरकारवर निशाणा

एसटी कर्मचाऱ्यांच्या नोव्हेंबर २०२५ पासूनच्या वेतनवाढीच्या फरकासाठी ४१० कोटी रुपयांची मागणी करण्यात आली असताना राज्य सरकारने केवळ ४५ कोटी रुपयांचा अतिरिक्त निधी दिल्याने महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसने अर्थ खात्यावर तीव्र टीका केली आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Jul 08, 2026 | 02:41 PM
'राजा उदार झाला, हाती भोपळा दिला'; एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनवाढीवरून सरकारवर निशाणा

'राजा उदार झाला, हाती भोपळा दिला'; एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनवाढीवरून सरकारवर निशाणा

Follow Us
Follow Us:
  • एसटीची ४१० कोटींची मागणी
  • अर्थ खात्याने दिले अवघे ४५कोटी!
  • श्रीरंग बरगे यांची अर्थ खात्यावर उपरोधित टीका!
मुंबई : एसटीने नोव्हेंबर २०२५ पासूनच्या वेतनवाढीच्या फरकापोटी राज्य सरकारकडे ४१० कोटी रुपयांची मागणी केली असताना केवळ ४५ कोटी रुपयांचा अतिरिक्त निधी देऊन अर्थ खात्याने “राजा उदार झाला, हाती भोपळा दिला” अशीच भूमिका घेतल्याची टीका महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बरगे यांनी केली.

बरगे यांनी सांगितले की, एसटी कर्मचाऱ्यांचे वेतन शासनाकडून मिळणाऱ्या सवलत मूल्य प्रतिपूर्तीच्या रकमेतून दिले जाते. मे महिन्याची सवलत मूल्य प्रतिपूर्ती ४०५ कोटी रुपये इतकी असून या महिन्यात त्याव्यतिरिक्त शासनाने ४५ कोटी रुपयांचा अतिरिक्त निधी दिला आहे. मात्र, नोव्हेंबर २०२५ पासूनच्या वेतनवाढीच्या फरकासाठी मागितलेले ४१० कोटी रुपये अद्याप मंजूर झालेले नाहीत.

MSRTC News: एसटी प्रवाशांसाठी महत्त्वाची सूचना! NCMC स्मार्ट कार्डशिवाय मिळणार नाही सवलत; नोंदणीला वेग

या निधीसाठी एसटी महामंडळाचे अध्यक्ष तथा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी अर्थ खात्याकडे वारंवार लेखी व तोंडी पाठपुरावा केला. मात्र, त्याची दखल घेण्यात आली नाही. सवलत मूल्य प्रतिपूर्ती रक्कम देण्यात आली पण त्या फक्त व्यतिरिक्त देण्यात आलेल्या ४५ कोटी रुपयांचा उद्देश काय, याचा खुलासा अर्थ खात्याने करावा, अशी मागणीही त्यांनी केली. सटी कर्मचाऱ्यांच्या भविष्य निर्वाह निधी (पीएफ), ग्रॅज्युइटी आणि इतर वैधानिक देयकांचा संबंधित संस्थांकडे भरणा झालेला नसल्याने कर्मचाऱ्यांना या महिन्यात पीएफ ॲडव्हान्स मिळणार की नाही, याबाबत अनिश्चितता निर्माण झाली असल्याचा दावा बरगे यांनी केला.

“एसटीने मागितलेला वेतनवाढीच्या फरकाचा निधी न देता केवळ ४५ कोटी रुपयांची अतिरिक्त रक्कम देऊन अर्थ खात्याने कर्मचाऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम केले आहे,” अशी टीकाही त्यांनी केली.बरगे यांच्या म्हणण्यानुसार, एसटी महामंडळाला दरमहा वेतनासाठी सुमारे ५३३ कोटी रुपयांची आवश्यकता असते. निधीची कमतरता असल्याने कपात दाखविण्यात आलेली देणी न देता सध्या केवळ नक्त वेतन दिले जात असून निधीअभावी ७,००० कोटी रुपयांहून अधिक वैधानिक देणी प्रलंबित आहेत. नोव्हेंबर २०२५ पासूनचा वेतनवाढीचा फरकही एसटीला न दिल्याने कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी वाढत आहे.

एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाची धग अद्याप कायम असून शासनाने, विशेषतः अर्थ खात्याने, या प्रश्नाची गंभीर दखल घ्यावी. अन्यथा कर्मचाऱ्यांमधील असंतोष आणखी तीव्र होऊ शकतो, असा इशाराही बरगे यांनी दिला.

St Bus News : एसटीतील जुने ट्रॉली जॅक ठरतायत ‘मृत्यूचा सापळा’; चार कर्मचाऱ्यांचा बळी, नवीन उपकरणांची मागणी

Web Title: Msrtc salary hike funds 45 crore vs 410 crore employee congress criticism

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 08, 2026 | 02:41 PM

Topics:  

  • msrtc
  • st bus
  • ST Employees

संबंधित बातम्या

MSRTC Ganpati special Buses: गणपतीसाठी गावी जाणाऱ्यांना गुड न्यूज; एसटीच्या एकेरी गट आरक्षणावरील ३० टक्के अतिरिक्त शुल्क रद्द
1

MSRTC Ganpati special Buses: गणपतीसाठी गावी जाणाऱ्यांना गुड न्यूज; एसटीच्या एकेरी गट आरक्षणावरील ३० टक्के अतिरिक्त शुल्क रद्द

Gondiya News: विद्यार्थ्यांच्या तासिका ऐरणीवर; गोंदिया बस आगाराचे ढिसाळ नियोजन एसटीच्या विलंबाचा विद्यार्थ्यांना बसतोय फटका
2

Gondiya News: विद्यार्थ्यांच्या तासिका ऐरणीवर; गोंदिया बस आगाराचे ढिसाळ नियोजन एसटीच्या विलंबाचा विद्यार्थ्यांना बसतोय फटका

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.