Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 2 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ratnagiri Bus Accident : ब्रेक निकामी, चालकाचे नियंत्रण सुटले अन्…! रत्नागिरी जिल्ह्यात दोन एसटी बसची टक्कर, 15 विद्यार्थी जखमी

Maharashtra ST Bus: रत्नागिरी तालुक्यातील शीळ येथे गुरुवारी सकाळी दांडेआडम-रत्नागिरी आणि रत्नागिरी-भावेआडम या दोन एसटी बसमध्ये समोरासमोर भीषण धडक झाली. एका बसचे ब्रेक निकामी झाल्याने चालकाचे नियंत्रण सुटल्याची प्राथमिक माहिती असून, अपघातानंतर स्थानिक नागरिक आणि पोलिसांनी तातडीने बचावकार्य सुरू केले.

  • By श्वेता झगडे
Updated On: Jul 02, 2026 | 11:48 AM
ब्रेक निकामी, चालकाचे नियंत्रण सुटले अन्...! रत्नागिरी जिल्ह्यात दोन एसटी बसची टक्कर, 15 विद्यार्थी जखमी

ब्रेक निकामी, चालकाचे नियंत्रण सुटले अन्...! रत्नागिरी जिल्ह्यात दोन एसटी बसची टक्कर, 15 विद्यार्थी जखमी

Follow Us
Follow Us:
  • रत्नागिरी जिल्ह्यात दोन एसटी बसची टक्कर
  • मिरजोळे-उक्षी मार्गावर अपघात 15 विद्यार्थी जखमी
  • दोन्ही गाड्यांचे मोठे नुकसान
Ratnagiri Bus Accident News Marathi : रत्नागिरी तालुक्यातील शीळ येथे गुरुवारी (2 जुलै 2026) सकाळी दोन एसटी बसमध्ये भीषण अपघात झाला. सकाळी 7 वाजण्याच्या सुमारास झालेल्या या अपघातात ११ शाळकरी विद्यार्थी आणि एक बसचा चालक जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. प्राथमिक माहितीनुसार, एका एसटी बसचे ब्रेक अचानक निकामी झाल्याने चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि समोरून येणाऱ्या दुसऱ्या बसला जोरदार धडक बसली.

अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिक, पोलीस आणि प्रशासनाने तातडीने घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केले. जखमींना त्वरित रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

दांडेआडम आणि भावेआडम बसमध्ये समोरासमोर धडक

मिळालेल्या माहितीनुसार, दांडेआडम येथून रत्नागिरीकडे प्रवासी घेऊन येणारी एसटी बस (क्रमांक MH 14 BT 2231) आणि रत्नागिरी आगारातून भावेआडमच्या दिशेने निघालेली बस (क्रमांक MH 14 BT 4459) यांच्यात शीळ येथे समोरासमोर जोरदार धडक झाली. धडकेची तीव्रता इतकी मोठी होती की दोन्ही बसच्या समोरील भागाचे मोठे नुकसान झाले.

RATNAGIRI: चिपळूण काँग्रेसची संघटनात्मक बांधणी; नव्या पदाधिकाऱ्यांना जबाबदारी

प्राथमिक तपासात एका बसचे ब्रेक निकामी झाल्याने चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याची माहिती समोर आली आहे. मात्र, अपघाताचे नेमके कारण तांत्रिक तपासणीनंतरच स्पष्ट होणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

बसमध्ये शाळकरी विद्यार्थ्यांची मोठी उपस्थिती

दांडेआडमवरून रत्नागिरीकडे येणाऱ्या बसमध्ये सकाळच्या वेळेमुळे शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या मोठी होती. त्यामुळे अपघातानंतर काही काळ घटनास्थळी गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. या दुर्घटनेत ११ विद्यार्थी आणि एका बसचा चालक जखमी झाला.

सर्व जखमींना तातडीने रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी सर्वांवर त्वरित उपचार सुरू केले असून, कोणत्याही विद्यार्थ्याला गंभीर दुखापत झालेली नसल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. किरकोळ जखमी झालेल्या काही विद्यार्थ्यांना प्राथमिक उपचारानंतर घरी सोडण्यात आले.

विद्यार्थ्यांच्या तोंडाला दुखापत

अपघाताच्या जोरदार धडकेमुळे काही विद्यार्थ्यांच्या दातांना तसेच हनुवटीला किरकोळ दुखापत झाली. घटनास्थळी पोहोचलेल्या प्रशासकीय अधिकारी आणि पोलिसांनी जखमींची विचारपूस केली. तसेच रुग्णालयात आवश्यक त्या वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या.

पोलिसांकडून अपघाताचा तपास सुरू

या अपघातामागे नेमके तांत्रिक कारण काय होते, ब्रेक निकामी होण्यामागील कारणे कोणती होती आणि दोन्ही बसचा वेग किती होता, याचा तपास गुहागर आणि रत्नागिरी पोलिसांकडून सुरू आहे. एसटी महामंडळाच्या तांत्रिक पथकाकडूनही संबंधित बसची तपासणी केली जाणार असून, तपास अहवालानंतर अपघाताचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे. दरम्यान, या घटनेमुळे शीळ परिसरात काही काळ वाहतुकीवर परिणाम झाला होता. मात्र, अपघातग्रस्त बस बाजूला केल्यानंतर वाहतूक पुन्हा सुरळीत करण्यात आली.

Ratnagiri : रत्नागिरीत पानवल धरणाच्या मजबुतीकरण व नुतनीकरण कामाचे लोकार्पण

Web Title: Ratnagiri bus accident two st buses collide at sheel brake failure news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 02, 2026 | 11:48 AM

Topics:  

  • Bus Accident
  • Ratnagiri
  • st bus

संबंधित बातम्या

St Bus News : एसटीतील जुने ट्रॉली जॅक ठरतायत ‘मृत्यूचा सापळा’; चार कर्मचाऱ्यांचा बळी, नवीन उपकरणांची मागणी
1

St Bus News : एसटीतील जुने ट्रॉली जॅक ठरतायत ‘मृत्यूचा सापळा’; चार कर्मचाऱ्यांचा बळी, नवीन उपकरणांची मागणी

तीर्थयात्रा होणार अधिक सुलभ! ‘एसटी संगे तीर्थाटन’ योजनेत खासगी पर्यटन संस्थांना हिरवा कंदील; भाविकांना मिळणार वन-स्टॉप सुविधा
2

तीर्थयात्रा होणार अधिक सुलभ! ‘एसटी संगे तीर्थाटन’ योजनेत खासगी पर्यटन संस्थांना हिरवा कंदील; भाविकांना मिळणार वन-स्टॉप सुविधा

Pratap Sarnaik : भाडेवाढीनंतरही एसटी तोट्यात; ‘महिनाभरात उत्पन्न वाढवा, अन्यथा…’, प्रताप सरनाईक यांचा एक महिन्याचा अल्टिमेटम
3

Pratap Sarnaik : भाडेवाढीनंतरही एसटी तोट्यात; ‘महिनाभरात उत्पन्न वाढवा, अन्यथा…’, प्रताप सरनाईक यांचा एक महिन्याचा अल्टिमेटम

MSRTC Bus Accident : धावत्या एसटीचे चाक निखळले; अर्धा किलोमीटर एका चाकावर धावली बस, ५० प्रवाशांचे थरारक बचाव
4

MSRTC Bus Accident : धावत्या एसटीचे चाक निखळले; अर्धा किलोमीटर एका चाकावर धावली बस, ५० प्रवाशांचे थरारक बचाव

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.