Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 11 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

ST Bus: शाळा आणि महाविद्यालयांनी पुन्हा एकदा ‘लाल परी’लाच पसंती, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न

शाळा आणि महाविद्यालयांनी पुन्हा एकदा 'लाल परी'लाच पसंती दिली असून शालेय सहलीतून एसटीला तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. शालेय सहलींनी एसटीची तिजोरी भरली आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Apr 07, 2026 | 02:18 PM
शाळा आणि महाविद्यालयांनी पुन्हा एकदा 'लाल परी'लाच पसंती, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न

शाळा आणि महाविद्यालयांनी पुन्हा एकदा 'लाल परी'लाच पसंती, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न

Follow Us
Follow Us:
  • शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी
  • मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
  • शाळा आणि महाविद्यालयांनी पुन्हा एकदा ‘लाल परी’लाच पसंती
मुंबई : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (MSRTC) सन २०२५-२६ या शैक्षणिक वर्षात शालेय सहलींसाठी २५ हजार ५५८ बस फेऱ्यांच्या माध्यमातून लाखो विद्यार्थ्यांची सुरक्षित वाहतूक करत तब्बल १२७ कोटी १८ लाख रुपयांचे विक्रमी उत्पन्न मिळवले आहे. हे उत्पन्न मागील वर्षाच्या तुलनेत ३३ कोटी २९ लाखांनी अधिक असून, “शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षित सहलींसाठी एसटीशिवाय पर्याय नाही,” हे पुन्हा एकदा अधोरेखित झाल्याचे प्रतिपादन परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी केले.

Cabinet Meeting : “पावसामुळे पिकांचे नुकसान झाले, त्या ठिकाणी…” नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी मंत्रिमंडळात महत्त्वाचे निर्णय

मंत्री सरनाईक यांनी सांगितले की, ‘शालेय सहल’ हा प्रत्येक विद्यार्थ्याच्या आयुष्यातील एक हळवा आणि संस्मरणीय अनुभव असतो. शैक्षणिक वर्षात विविध धार्मिक व ऐतिहासिक पर्यटन स्थळांना भेट देण्यासाठी शाळा आणि महाविद्यालयांकडून सहली आयोजित केल्या जातात. या सहली एसटीच्या माध्यमातून आयोजित केल्यास विद्यार्थ्यांना प्रवासी भाड्यात शासनाकडून ५० टक्के सवलत दिली जाते. त्यामुळे एसटीमार्फत आयोजित सहली सुरक्षित, विश्वासार्ह आणि माफक दरात उपलब्ध होतात. विशेषतः ग्रामीण भागातील लाखो विद्यार्थी-विद्यार्थिनींना याचा मोठा लाभ होतो.

यंदाच्या शैक्षणिक वर्षात राज्यभरातील विविध शाळा व महाविद्यालयांच्या मागणीनुसार एसटी महामंडळाने तब्बल २५ हजार ५५८ बस फेऱ्या उपलब्ध करून दिल्या. या फेऱ्यांद्वारे लाखो विद्यार्थ्यांनी विविध धार्मिक व ऐतिहासिक पर्यटन स्थळांना भेटी देत सुरक्षित आणि सुखकर प्रवास केला. या उपक्रमातून महामंडळाला १२७ कोटी १८ लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले असून, ते मागील वर्षाच्या तुलनेत ३३ कोटी २९ लाखांनी अधिक आहे. यावर्षी बहुतांश शालेय सहलींसाठी एसटीने नव्या आणि अद्ययावत बसेस उपलब्ध करून दिल्यामुळे विद्यार्थ्यांचा प्रवास अधिक सुरक्षित, आरामदायी आणि समाधानकारक झाला.

भविष्यातही शालेय सहलींसाठी एसटी बसेस वेळोवेळी उपलब्ध करून दिल्या जातील. त्यामुळे येत्या शैक्षणिक वर्षात शाळा आणि महाविद्यालयांनी खाजगी बसेसऐवजी एसटी बसेसचा अधिकाधिक वापर करावा, असे आवाहन परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी केले आहे.

बालकांच्या कर्करोग उपचारांसाठी पाऊल! मुख्यमंत्री सहाय्यता कक्षाचा ‘बीपीसीएल’, टाटा मेमोरियल सेंटर यांच्यात करार

Web Title: Msrtc school trip record income 127 crore pratap sarnaik st bus safe travel marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 07, 2026 | 02:18 PM

Topics:  

  • msrtc
  • pratap sarnaik
  • st bus

संबंधित बातम्या

ST Employees Salary: एसटी कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! ११ ऑगस्टला ८६ हजार कर्मचाऱ्यांना मिळणार वेतन
1

ST Employees Salary: एसटी कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! ११ ऑगस्टला ८६ हजार कर्मचाऱ्यांना मिळणार वेतन

BJP MLA statement: प्रताप सरनाईकांवर टीका करताना भाजप आमदारांची जीभ घसरली; ‘सठिया गये, बूढे हो गये’ म्हणत मेहतांचा टोला
2

BJP MLA statement: प्रताप सरनाईकांवर टीका करताना भाजप आमदारांची जीभ घसरली; ‘सठिया गये, बूढे हो गये’ म्हणत मेहतांचा टोला

ST Employees Salary: एसटी कर्मचाऱ्यांचा पगार पुन्हा लांबणीवर; ‘कर्मचाऱ्यांचे संसार वेठीस धरू नका’, ७ तारखेचा पगार आता १० ऑगस्टला?
3

ST Employees Salary: एसटी कर्मचाऱ्यांचा पगार पुन्हा लांबणीवर; ‘कर्मचाऱ्यांचे संसार वेठीस धरू नका’, ७ तारखेचा पगार आता १० ऑगस्टला?

Ganpati Special ST Bus : चाकरमान्यांना बाप्पा पावला; गौरी-गणपतीसाठी कोकणात एसटीच्या ५,२२० जादा बसेस धावणार
4

Ganpati Special ST Bus : चाकरमान्यांना बाप्पा पावला; गौरी-गणपतीसाठी कोकणात एसटीच्या ५,२२० जादा बसेस धावणार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.