
२०३७ पर्यंत एसटीची ‘ई-लालपरी’! संपूर्ण ताफा १०० टक्के इलेक्ट्रिक करण्याचे लक्ष्य
एसटीच्या मुख्यालयात झालेल्या ३१२ व्या संचालक मंडळाच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी संचालक मंडळाचे सदस्य आणि महामंडळाचे खातेप्रमुख उपस्थित होते.
MSRTC NCMC Card : ‘ही’ सवलत घेण्यात पुणेकरांनी मारली बाजी; तब्बल 9.26 लाखांची नोंद
सध्या एसटीच्या ताफ्यात सुमारे १४ हजार बसेस असून, त्यापैकी ११०० बसेस ई-बसेस आहेत. ताफ्यातील सुमारे ५ हजार जुन्या बसेस नियमानुसार टप्प्याटप्प्याने स्क्रॅप करण्यात येणार आहेत. त्यामुळे ताफ्याचे आधुनिकीकरण आणि डिझेलवरील अवलंबित्व कमी करण्यास मदत होणार आहे.
सात ते आठ वर्षे वापर झालेल्या जुन्या बसेसचे २०२७ पासून टप्प्याटप्प्याने इलेक्ट्रिकमध्ये रूपांतर करण्याची मोहीम सुरू करण्यात येणार आहे. त्याचबरोबर प्रवासी वाहतुकीच्या गरजेनुसार नव्या ई-बसेसची मोठ्या प्रमाणावर खरेदी केली जाणार आहे. सध्या डिझेल बसेसचे आयुर्मान सुमारे १५ वर्षे, तर ई-बसेसचे आयुर्मान सुमारे २० वर्षे असल्याने इलेक्ट्रिक बसेसचा अधिक काळ वापर करता येणार आहे. डिझेलवरील अवलंबित्व कमी झाल्यामुळे इंधन खर्चातही बचत होण्याची अपेक्षा आहे.
ई-बसेसच्या वाढत्या संख्येला आवश्यक असलेली चार्जिंग स्टेशन, विद्युत पायाभूत सुविधा आणि तांत्रिक यंत्रणा उभारण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. आगारनिहाय नियोजन करून ई-बसेसची खरेदी आणि चार्जिंग सुविधा उभारणी या दोन्ही प्रक्रिया समांतरपणे राबविण्यात येणार आहेत.
“एसटी ही महाराष्ट्राच्या प्रत्येक गावाला जोडणारी सार्वजनिक सेवा आहे. तिचे आधुनिकीकरण करताना पर्यावरणाची जबाबदारीही महत्त्वाची आहे. डिझेलवरील अवलंबित्व कमी करून स्वच्छ, हरित आणि आधुनिक सार्वजनिक वाहतूक व्यवस्था उभी करण्याचा आमचा संकल्प आहे. सन २०३७ पर्यंत एसटीचा १०० टक्के ताफा इलेक्ट्रिक करण्यासाठी नियोजनबद्ध कार्यवाही सुरू आहे,” असे मंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितले.
“महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात धावणारी लालपरी भविष्यात हरित महाराष्ट्राची ‘ई-लालपरी’ बनेल. पर्यावरणपूरक सार्वजनिक वाहतुकीचे देशातील आदर्श मॉडेल महाराष्ट्रात उभारण्याच्या दिशेने एसटीची वाटचाल सुरू आहे,” असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.