Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 21 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharastra Politics |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

MSRTC ST Bus: रेल्वे वाहतूक विस्कळीत, प्रवाशांना एसटीचा आधार! उंबरमाळी स्थानकावर ‘लालपरी’ ठरली संकटमोचक

MSRTC ST Bus: रेल्वे वाहतूक विस्कळीत झाल्याने उंबरमाळी रेल्वे स्थानकावर अनेक प्रवासी अडकले होते. यामध्ये महिला आणि तरुणींचाही समावेश होता. अशा परिस्थितीत एसटी महामंडळाच्या ‘लालपरी’ने प्रवाशांच्या मदतीसाठी धाव घेत त्यांना दिलासा दिला. चालक आणि वाहकाच्या तत्परतेचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी कौतुक करत त्यांचे अभिनंदन केले.

  • By श्वेता झगडे
Updated On: Nov 21, 2026 | 11:28 AM
रेल्वे वाहतूक विस्कळीत, प्रवाशांना एसटीचा आधार! उंबरमाळी स्थानकावर ‘लालपरी’ ठरली संकटमोचक

रेल्वे वाहतूक विस्कळीत, प्रवाशांना एसटीचा आधार! उंबरमाळी स्थानकावर ‘लालपरी’ ठरली संकटमोचक

Follow Us
Follow Us:
  • उंबरमाळी रेल्वे स्थानकावर अडकलेल्या प्रवाशांच्या मदतीला धावली ‘लालपरी’;
  • चालक-वाहकाच्या तत्परतेचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडून कौतुक!
  • कर्तव्यदक्ष कर्मचाऱ्यांचे मंत्री सरनाईक यांनी केले अभिनंदन
मुंबई : मध्य रेल्वेच्या कसारा मार्गावरील वाहतूक शुक्रवारी (20 नोव्हेंबर 2024) रात्री नऊ वाजल्यापासून विस्कळीत झाल्याने उंबरमाळी रेल्वे स्थानकावर अनेक प्रवासी अडकून पडले होते. रात्रीची वेळ आणि प्रवासासाठी अन्य पर्याय उपलब्ध नसल्याने विशेषतः महिला व महाविद्यालयीन तरुणी चिंतेत होत्या. अशा परिस्थितीत कसारा येथे थांबलेली एसटी बस प्रवाशांच्या मदतीसाठी तातडीने उंबरमाळी येथे पोहोचली. एसटी चालक आणि वाहकाने दाखविलेल्या या समयसूचकतेमुळे अनेक प्रवाशांना सुरक्षित प्रवासाचा आधार मिळाला. या कर्तव्यदक्षतेचे परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी विशेष कौतुक केले. (MSRTC ST Bus)

अडकलेल्या प्रवाशांच्या मदतीसाठी लालपरी

रेल्वे वाहतूक ठप्प झाल्याने उंबरमाळी स्थानकावर चाकरमानी, विद्यार्थी, महिला आणि अन्य प्रवासी अडकले होते. ही बाब लक्षात येताच कसारा येथे थांबलेल्या एसटी बसचे चालक किरण खांडवी आणि वाहक राकेश पत्की यांनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखून आगारात स्थानक प्रमुख यांना माहिती दिली. तसेच अडकलेल्या प्रवाशांच्या मदतीसाठी बस पाठविण्याची विनंती केली. स्थानक प्रमुख श्रीमती पूनम देशमुख यांनीही यास दुजोरा दिल्यानंतर लालपरी तातडीने उंबरमाळी स्थानकाकडे रवाना करण्यात आली.

महावितरणचा वीजचोरांना दणका; राज्यभरात तीन दिवसात 250 वीजचोरीची प्रकरणे उघड

सर्व प्रवाशांना घेऊन नाशिकच्या दिशेने रवाना

रात्रीच्या वेळी एसटी बस उपलब्ध झाल्याने प्रवाशांनी सुटकेचा निश्वास सोडला. बसमध्ये महाविद्यालयीन तरुणी आणि नोकरदार महिलांची संख्या लक्षणीय होती. सुरक्षित प्रवासाची सोय झाल्याचे समजताच त्यांनी आपल्या पालकांना दूरध्वनी करून एसटी बस मदतीला आल्याची माहिती दिली. त्यामुळे कुटुंबीयांचीही चिंता दूर झाली. प्रवाशांनी चालक आणि वाहकाचे आभार मानले. त्यानंतर ही बस सर्व प्रवाशांना घेऊन नाशिकच्या दिशेने रवाना झाली.

या घटनेची दखल घेत परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी चालक किरण खांडवी, वाहक राकेश पत्की आणि संबंधित एसटी प्रशासनाचे अभिनंदन केले. ‘एसटी महामंडळ ही केवळ प्रवासी वाहतुकीची सेवा नसून, अडचणीच्या प्रसंगी सामान्य माणसाच्या मदतीला धावून जाणारी विश्वासाची यंत्रणा आहे. प्रवाशांच्या अडचणीचे गांभीर्य ओळखून तत्परतेने मदतीचा हात देणाऱ्या कर्मचाऱ्यांमुळे महामंडळाची सेवाभावी परंपरा अधिक दृढ होत आहे,’ असे त्यांनी यावेळी म्हटलं. प्रवाशांची सुरक्षितता आणि सुविधा यांना सर्वोच्च प्राधान्य देत संकटसमयी मदतीसाठी पुढाकार घेणे, हीच एसटीची खरी ओळख आहे. किरण खांडवी आणि राकेश पत्की यांनी आपल्या कृतीतून कर्तव्यनिष्ठेचा आदर्श घालून दिला आहे, अशा शब्दांत मंत्री सरनाईक यांनी संबंधित कर्मचाऱ्यांच्या कार्याचे कौतुक केले.

Mumbai News: वांद्रे-धारावी दरम्यान नवीन पुलाच्या कामाला वेग; मिठी नदीवरील नवीन पुलाचे काम अंतिम टप्प्याकडे

💡

Frequently Asked Questions

  • Que: उंबरमाळी रेल्वे स्थानकावर प्रवासी का अडकले होते?

    Ans: रेल्वे वाहतूक विस्कळीत झाल्याने उंबरमाळी रेल्वे स्थानकावर अनेक प्रवासी अडकले होते.

  • Que: अडकलेल्या प्रवाशांच्या मदतीसाठी कोण धावून आले?

    Ans: महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाची (MSRTC) ‘लालपरी’ बस प्रवाशांच्या मदतीसाठी धावून आली.

  • Que: एसटी चालक आणि वाहकाचे कौतुक कोणी केले?

    Ans: परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी चालक आणि वाहकाच्या तत्परतेचे कौतुक करून त्यांचे अभिनंदन केले.

Web Title: Msrtc st bus helps stranded passengers at umbramali railway station pratap sarnaik sz

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 21, 2026 | 11:28 AM

Topics:  

  • msrtc
  • pratap sarnaik
  • railway
  • st bus

संबंधित बातम्या

Kopar Railway Station: प्रवाशांच्या जीवाशी खेळ सुरूच; आठ दिवसांत उपाययोजना करा, अन्यथा मनसे स्टाईल आंदोलन! हर्षद पाटील आक्रमक
1

Kopar Railway Station: प्रवाशांच्या जीवाशी खेळ सुरूच; आठ दिवसांत उपाययोजना करा, अन्यथा मनसे स्टाईल आंदोलन! हर्षद पाटील आक्रमक

MSRTC Special Bus Service: कार्तिकी एकादशी यात्रेसाठी एसटी महामंडळाचा मोठा निर्णय; भाविकांसाठी १ हजार जादा बसेसची व्यवस्था
2

MSRTC Special Bus Service: कार्तिकी एकादशी यात्रेसाठी एसटी महामंडळाचा मोठा निर्णय; भाविकांसाठी १ हजार जादा बसेसची व्यवस्था

Dadar Metro Station: मोठी बातमी! दादर की चैत्यभूमी? नामांतराच्या चर्चेला नवे वळण; राज्य सरकारचा प्रस्ताव नेमका कोणासाठी?
3

Dadar Metro Station: मोठी बातमी! दादर की चैत्यभूमी? नामांतराच्या चर्चेला नवे वळण; राज्य सरकारचा प्रस्ताव नेमका कोणासाठी?

NCMC Smart Card च्या सक्तीमुळे एसटीला आर्थिक फटका; प्रताप सरनाईक यांनी दिले चौकशीचे आदेश
4

NCMC Smart Card च्या सक्तीमुळे एसटीला आर्थिक फटका; प्रताप सरनाईक यांनी दिले चौकशीचे आदेश

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.