Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • women premier league |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेबाबत मोठी बातमी! पाच महिन्यात योजनेसाठी….

मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनासंदर्भात मोठी अपडेट समोर येत आहे. दरम्यान निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर योजना स्थगित असून मानधन वाढीच आश्वासन देण्यात आले.

  • By श्वेता झगडे
Updated On: Aug 14, 2025 | 11:55 AM
लाडकी बहीण योजनेबाबत मोठी बातमी! पाच महिन्यात या योजनेसाठी एकही नवा अर्ज नाही (फोटो सौजन्य-X)

लाडकी बहीण योजनेबाबत मोठी बातमी! पाच महिन्यात या योजनेसाठी एकही नवा अर्ज नाही (फोटो सौजन्य-X)

Follow Us
Close
Follow Us:

Ladki Bahin Yojana News in Marathi : बहुचर्चित ‘मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना’ जाहीर झाल्यापासून काही ना काही कारणांमुळे सतत चर्चेत येत आहे. आज पुन्हा एकदा एक वर्षानंतरही चर्चेचा विषय बनली आहे. गेल्या वर्षी जुलैमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी २१ ते ६५ वयोगटातील पात्र महिलांसाठी दरमहा १५०० रुपये देण्याची घोषणा केली त्यानंतर एकच गदारोळ झाला. महायुतीसाठी ही योजना फायदेशीर ठरली असली तरी विरोधकांनी आक्रमक भूमिका घेऊन या योजनेला विरोध दर्शविला होता. मात्र तरीही राज्यातील केवळ कोट्यावधी महिलांनी या योजनेसाठी अर्ज केले होते, त्यापैकी २ कोटींहून अधिक महिलांना या योजनेचा लाभ मिळाला आणि त्यांच्या खात्यात दरमहा १५०० रुपये जमा होतात.

अंबाबाईच्या मूळ मूर्तीचं दर्शन आता भाविकांना घेता येणार; जिल्हाधिकारी येडगे यांची माहिती

मात्र आता लाडकी बहिण योजनेअंतर्गत मोठी माहिती समोर येत आहे, ती म्हणजे लाडकी बहीण योजनेकडे महिलांनी पाठ फिरवली की काय? असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे. कारण गेल्या 5 महिन्यांत या योजनेसाठी एकही नवा अर्ज आलेला नाही. त्यामुळे विविध चर्चांना उधाण आलं आहे.

महायुतीसाठी गेम चेंजर ठरणारी मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना सुरुवातीपासूनच चर्चेत आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीनंतर महायुती सरकारने ‘माझी लाडकी बहिण’ योजना जाहीर केली आणि तिच्या प्रभावी अंमलबजावणीचे उद्दिष्ट ठेवले. याचिकेचे निकाल विधानसभा निवडणुकीत दिसून आले. ना भूतो असा विजय महायुतीचा झाला. परंतु, त्यानंतर या योजनेची छाननी केल्यानंतर लाखो अपात्र लाभार्थी महिलांना वगळण्यात आले.

फक्त,आता याच लाडकी बहीण योजनेची क्रेझ ओसरली का, अशी चर्चा सुरू झाली आहे. याचे कारण म्हणजे गेल्या पाच महिन्यात लाडकी बहीण योजनेसाठी एकही नवा अर्ज केला नसल्याचा दावा केला जात आहे. यामुळे राज्यातील लाडक्या बहिणींनी या योजनेकडे पाठ फिरवली का, अशी कुजबुज सुरू झाली आहे.

योग्यवेळी मानधन वाढ

येत्या महानगरपालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लक्षात घेता, योग्य वेळी या योजनेचे पैसे वाढवण्याची ग्वाही देण्यात आली आहे. लाडकी बहीण योजना पुढील पाच वर्षे सुरू राहील आणि सध्याचे १५०० रुपये प्रति महिना मानधन पात्र उमेदवारांना वाटले जाईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

‘लाडकी बहिण योजना’ म्हणजे काय?

या योजनेअंतर्गत, महाराष्ट्र सरकार २१ ते ६५ वयोगटातील महिलांना दरमहा १,५०० रुपयांची आर्थिक मदत देते. या आर्थिक मदतीचा उद्देश महिलांना स्वावलंबी बनवणे आणि त्यांच्या कुटुंबाची आर्थिक स्थिती सुधारणे हा आहे. सध्या लाखो महिला याचा लाभ घेत आहेत. महिलांचे हक्क आणि त्यांची आर्थिक सुरक्षा ही सरकारची प्राथमिकता आहे असे आश्वासन एकनाथ शिंदे यांनी दिले. या योजनेबद्दल पसरवल्या जाणाऱ्या अफवांकडे लक्ष देऊ नका असे ते म्हणाले. “आम्ही महिलांच्या सक्षमीकरणासाठी वचनबद्ध आहोत आणि त्यांच्या मदतीत कोणत्याही प्रकारचा अडथळा येऊ देणार नाही,” असे ते पुढे म्हणाले. अशाप्रकारे, महाराष्ट्र सरकारने स्पष्ट केले आहे की ‘लाडकी बहिण योजना’ ही महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्याकडे एक कायमस्वरूपी पाऊल आहे आणि त्याचे फायदे पूर्वीप्रमाणेच मिळत राहतील.

घरावर स्लॅब टाकताना अचानक विजेचा बसला जोरदार झटका; एकाचा मृत्यू तर 14 जण जखमी

Web Title: Mukhyamantri ladki bahin yojana application drop sparks concerns

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 14, 2025 | 11:55 AM

Topics:  

  • Eknath Shinde
  • Ladki Bahin Yojana
  • maharashtra

संबंधित बातम्या

Mumbai Political News: उद्धव ठाकरे की एकनाथ शिंदे, कोणाला हाताळणे सोपे? देवेंद्र फडणवीसांनी स्पष्टच सांगितले
1

Mumbai Political News: उद्धव ठाकरे की एकनाथ शिंदे, कोणाला हाताळणे सोपे? देवेंद्र फडणवीसांनी स्पष्टच सांगितले

Latur Municipal Election 2026: लातूरमध्ये प्रोटोकॉल डावलून अपक्षांचा मुंबईत; पक्षप्रवेश शिंदे गटात अंतर्गत संघर्ष उफाळला
2

Latur Municipal Election 2026: लातूरमध्ये प्रोटोकॉल डावलून अपक्षांचा मुंबईत; पक्षप्रवेश शिंदे गटात अंतर्गत संघर्ष उफाळला

मोठी बातमी! मुंबईमध्ये ठाकरे गटाला मोठा धक्का! एकनाथ शिंदेनी फिरवला गेम; ‘या’ बड्या नेत्याचा शेकडो समर्थकांसह पक्षप्रवेश
3

मोठी बातमी! मुंबईमध्ये ठाकरे गटाला मोठा धक्का! एकनाथ शिंदेनी फिरवला गेम; ‘या’ बड्या नेत्याचा शेकडो समर्थकांसह पक्षप्रवेश

मुंबईतील लोकसंख्या बदल अन् राजकीय गणिते; राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरुच
4

मुंबईतील लोकसंख्या बदल अन् राजकीय गणिते; राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरुच

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.