Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 27 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • amravati |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

वाई-पाचगणी रस्त्यावरील कोट्यवधींच्या कामाचा बोजवारा; नागरिकांच्या जिवाशी खेळ, प्रशासन मात्र गप्प

क्कादायक बाब म्हणजे अवघ्या एक महिन्यापूर्वी पूर्ण झालेल्या काँक्रीट रस्त्यावर आजच भेगा पडू लागल्या आहेत. अनेक ठिकाणी काँक्रीटचे टवके उडाले असून कामाच्या दर्जाबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत.

  • By कृपादान आवळे
Updated On: Jul 12, 2026 | 04:18 PM
वाई–पाचगणी रस्त्यावरील कोट्यवधींच्या कामाचा बोजवारा; नागरिकांच्या जिवाशी खेळ, प्रशासन मात्र गप्प!

वाई–पाचगणी रस्त्यावरील कोट्यवधींच्या कामाचा बोजवारा; नागरिकांच्या जिवाशी खेळ, प्रशासन मात्र गप्प!

Follow Us
Follow Us:

वाई : वाई-पाचगणी मार्गावरील रस्त्याच्या कामातील गंभीर त्रुटींमुळे स्थानिक नागरिकांचा संताप अनावर झाला आहे. तब्बल सहा महिने धुळीचे साम्राज्य, खड्ड्यांमुळे वाहनांचे नुकसान, अपघातांचा धोका आणि प्रदूषणामुळे नागरिकांसह मुक्या जनावरांनी प्रचंड हाल सोसले. एवढा त्रास सहन केल्यानंतर तरी दर्जेदार रस्ता मिळेल, अशी अपेक्षा होती; मात्र, प्रत्यक्षात निकृष्ट काम आणि नियोजनशून्य कारभारामुळे नागरिकांच्या पदरी पुन्हा एकदा निराशाच पडली आहे.

कंत्राटदाराने रस्त्याची उंची वाढवून अर्धवट काँक्रीटीकरण केले; परंतु सर्वात मूलभूत असलेली पावसाच्या पाण्याच्या निचऱ्याची व्यवस्था पूर्णपणे दुर्लक्षित केली. रस्त्याच्या दोन्ही बाजूंना गटारे न बांधल्यामुळे रस्ता उंच झाला आणि आजूबाजूची घरे, अंगणे तसेच जनावरांचे गोठे सखल भागात गेले. परिणामी, मुसळधार पाऊस पडताच संपूर्ण पाणी थेट नागरिकांच्या घरात आणि गोठ्यांमध्ये शिरत असून मोठे आर्थिक नुकसान होत आहे.

Yavatmal News : रस्त्याअभावी ग्रामीणमधील बसफेऱ्या बंद! विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान; पूल खचल्याने गावाचा संपर्क तुटला

याहून धक्कादायक बाब म्हणजे अवघ्या एक महिन्यापूर्वी पूर्ण झालेल्या काँक्रीट रस्त्यावर आजच भेगा पडू लागल्या आहेत. अनेक ठिकाणी काँक्रीटचे टवके उडाले असून कामाच्या दर्जाबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत. कोट्यवधी रुपये खर्च करून उभारलेल्या रस्त्याची इतक्या कमी कालावधीत झालेली दुरवस्था ही कंत्राटदाराच्या निष्काळजीपणाची आणि संबंधित विभागाच्या ढिसाळ देखरेखीची साक्ष देणारी आहे.

स्थानिक नागरिकांचा सवाल अत्यंत रास्त आहे. कर वेळेवर भरणाऱ्या जनतेला निकृष्ट दर्जाची कामे आणि प्रशासनाच्या चुकीच्या नियोजनाची शिक्षा का भोगावी? काम पूर्ण होण्यापूर्वी अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष पाहणी केली होती का? दर्जा तपासणी झाली होती का? दोषी कंत्राटदारावर कारवाई होणार का? या प्रश्नांची उत्तरे देण्यास प्रशासनाकडे शब्दही उरलेला दिसत नाही.

दरम्यान, पावसाळ्यात घरांमध्ये साचणारे पाणी, जनावरांचे होणारे हाल, वाढलेला आजारांचा धोका आणि नव्या रस्त्याची उघड झालेली निकृष्ट गुणवत्ता यामुळे नागरिकांमध्ये तीव्र संतापाचे वातावरण आहे. संबंधित विभागाने तातडीने गटारांची उभारणी करून रस्त्यावरील सर्व दोष दूर करावेत, तसेच निकृष्ट काम करणाऱ्या कंत्राटदारावर कठोर कारवाई करावी, अशी जोरदार मागणी स्थानिकांकडून करण्यात येत आहे.

“अवघ्या एका महिन्यात भेगा पडणारा रस्ता किती दिवस टिकणार?” हा प्रश्न आता प्रत्येक नागरिकाच्या मनात घर करून बसला असून, प्रशासनाने यापुढेही मौन बाळगल्यास तीव्र लोकआंदोलन उभे राहण्याची चिन्हे दिसत आहेत

Web Title: Multi crore rupee project on wai pachgani road in shambles

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 12, 2026 | 04:18 PM

Topics:  

  • Satara News
  • Wai News

संबंधित बातम्या

Satara News : सातारा-जावलीच्या आरोग्य व्यवस्थेचा आढावा, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या महत्त्वपूर्ण सूचना
1

Satara News : सातारा-जावलीच्या आरोग्य व्यवस्थेचा आढावा, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या महत्त्वपूर्ण सूचना

मायणी येथील शिंदेवाडी ग्रामस्थांनी शक्तिपीठ महामार्गाची रोखली मोजणी
2

मायणी येथील शिंदेवाडी ग्रामस्थांनी शक्तिपीठ महामार्गाची रोखली मोजणी

वाईत रोडरोमिओंवर पोलिसांचा कडक वॉच; गैरप्रकार करणाऱ्यांची गय नाही प्रदीप सूर्यवंशी
3

वाईत रोडरोमिओंवर पोलिसांचा कडक वॉच; गैरप्रकार करणाऱ्यांची गय नाही प्रदीप सूर्यवंशी

ईद-ए-मिलाद व आगामी सण-उत्सवाच्या पार्श्वभूमीवर वाई येथे जातीय दंगा काबू योजनेची रंगीत तालीम व रूट मार्च
4

ईद-ए-मिलाद व आगामी सण-उत्सवाच्या पार्श्वभूमीवर वाई येथे जातीय दंगा काबू योजनेची रंगीत तालीम व रूट मार्च

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.