Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 4 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Karad News: अरे बापरे! वृक्षारोपण करायला गेले अन्‌ मधमाशांच्या तावडीत सापडले; ४० शाळकरी मुले रुग्णालयात!

कराडच्या आगाशिव डोंगरावर वृक्षारोपणासाठी गेलेल्या नूतन मराठी शाळेच्या ५० विद्यार्थ्यांवर मधमाशांनी हल्ला केला. या धावपळीत ४० विद्यार्थी जखमी झाले असून त्यांच्यावर कराड रुग्णालयात उपचार करण्यात आले.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Jul 12, 2026 | 04:42 PM
वृक्षारोपण करायला गेले अन्‌ मधमाशांच्या तावडीत सापडले

वृक्षारोपण करायला गेले अन्‌ मधमाशांच्या तावडीत सापडले

Follow Us
Follow Us:
  • आगाशिव डोंगरावर वृक्षारोपणासाठी गेलेल्या विद्यार्थ्यांवर मधमाशांचा भीषण हल्ला
  • धावपळीत ४० विद्यार्थी जखमी
  • कराडमध्ये खळबळ
कराड: पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यासाठी आगाशिव डोंगरावर सीडबॉल प्रत्यारोपण आणि वृक्षारोपण मोहिमेत सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांवर अचानक मधमाशांच्या थव्याने हल्ला चढविल्याने एकच गोंधळ उडाला. या घटनेत मधमाशांच्या दंशामुळे, तसेच जीव वाचविण्यासाठी धावताना पडल्याने सुमारे ४० विद्यार्थी किरकोळ जखमी झाले.

शनिवारी सकाळी नऊ ते साडेनऊच्या दरम्यान आगाशिव डोंगरावर हा प्रकार घडला. जखमी विद्यार्थ्यांवर वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालयात उपचार करण्यात आले असून, सर्वांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली.

मलकापूर येथील आगाशिवनगर परिसरातील श्री लक्ष्मीदेवी शिक्षण प्रसारक मंडळाच्या नूतन मराठी प्राथमिक व माध्यमिक शाळेत पर्यावरणपूरक उपक्रमांना विशेष प्राधान्य दिले जाते. दरवर्षीप्रमाणे यंदाही विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण संवर्धनाची जाणीव निर्माण करण्यासाठी वृक्षारोपण, बीजारोपण आणि सीडबॉल प्रत्यारोपणाचे विविध उपक्रम आयोजित करण्यात आले होते.

Satara News: कराड पालिकेला भाजपचा ‘बोंबाबोंब’ आंदोलनाचा इशारा; रखडलेल्या विकासकामांवर प्रशासनाला धारेवर

त्याचाच भाग म्हणून इयत्ता आठवी आणि नववीतील सुमारे ५० विद्यार्थी शिक्षक व कर्मचाऱ्यांसमवेत आगाशिव डोंगरावर गेले होते. वन विभागाच्या कार्यालयामागील परिसरात विद्यार्थी सीडबॉल प्रत्यारोपण आणि वृक्षारोपणाचे काम करत असताना अचानक मधमाशांचा थवा त्यांच्या दिशेने आला. काही क्षणांतच मधमाशांनी विद्यार्थ्यांवर हल्ला चढविल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले.

मधमाशांच्या दंशापासून बचाव करण्यासाठी विद्यार्थी सैरावैरा पळू लागले. या धावपळीत अनेक विद्यार्थी घसरून पडले, तर काहींना मधमाशांनी दंश केला. त्यामुळे सुमारे ४० विद्यार्थी किरकोळ जखमी झाले. घटनेची माहिती मिळताच शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक, व्यवस्थापन समितीचे सदस्य आणि कर्मचाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत विद्यार्थ्यांना सुरक्षित स्थळी हलविले.

यानंतर सर्व जखमी विद्यार्थ्यांना तातडीने कराड येथील वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी सर्व विद्यार्थ्यांवर आवश्यक उपचार केल्यानंतर त्यांना सुटी देण्यात आली. उपचारानंतर विद्यार्थ्यांना त्यांच्या पालकांच्या स्वाधीन करण्यात आले असून, सर्व विद्यार्थ्यांची प्रकृती समाधानकारक असल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

स्मार्ट मीटरविरोधात कराडात जनआक्रोश मोर्चा, वीज कार्यालयावर धडक

Web Title: Went for a tree plantation drive and fell prey to a swarm of honeybees 40 schoolchildren hospitalized

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 12, 2026 | 04:41 PM

Topics:  

  • Honey Bee Attack
  • Karad news
  • Satara News
  • Tree

संबंधित बातम्या

Satara News: मनोज जरांगे पाटलांच्या समर्थनात वाईत रस्ता रोको; सकल मराठा समाजाचा राज्य सरकारला थेट इशारा
1

Satara News: मनोज जरांगे पाटलांच्या समर्थनात वाईत रस्ता रोको; सकल मराठा समाजाचा राज्य सरकारला थेट इशारा

Wai News : दिव्यांग शेतकऱ्याच्या उपोषणाकडे प्रशासनाची डोळेझाक; तामखडा शिवारात 1500 ग्रामस्थांचा ठिय्या
2

Wai News : दिव्यांग शेतकऱ्याच्या उपोषणाकडे प्रशासनाची डोळेझाक; तामखडा शिवारात 1500 ग्रामस्थांचा ठिय्या

Maratha Reservation : कराड-चिपळूण मार्गावर ‘रास्ता रोको’, वारुंजी फाट्यावर भगवे वादळ!
3

Maratha Reservation : कराड-चिपळूण मार्गावर ‘रास्ता रोको’, वारुंजी फाट्यावर भगवे वादळ!

Satara News: सातारा जिल्ह्यात आरोग्य आणि शिक्षणाचा विकास; स्मार्ट आरोग्य केंद्रे व आदर्श शाळांसाठी कोट्यवधींचा निधी
4

Satara News: सातारा जिल्ह्यात आरोग्य आणि शिक्षणाचा विकास; स्मार्ट आरोग्य केंद्रे व आदर्श शाळांसाठी कोट्यवधींचा निधी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.