Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Political News |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Rohit Arya एन्काउंटर प्रकरणात शिवसेनेचा ‘हा’ बडा नेता अडचणीत? पोलिस थेट…

मुंबईतील पवई येथील आरए स्टुडिओमध्ये १७ मुलांना ओलीस ठेवणाऱ्या रोहित आर्यचा रुग्णालयात मृत्यू झाला. पोलीस कारवाईदरम्यान त्याला गोळी लागली आणि गंभीर अवस्थेत रुग्णालयात नेण्यात आले होते.

  • By तेजस भागवत
Updated On: Nov 03, 2025 | 08:26 PM
Rohit Arya एन्काउंटर प्रकरणात शिवसेनेचा ‘हा’ बडा नेता अडचणीत? पोलिस थेट…
Follow Us
Close
Follow Us:

आरोपी रोहित आर्याचा पोलिसांकडून एन्काउंटर
पवईत रंगले होते ओलिसनाट्य 
अनेक मुलांना ठेवले होते डांबून

Deepak Kesarkar: मुंबईतील पवई येथील आरए स्टुडिओमध्ये १७ मुलांना ओलीस ठेवणाऱ्या रोहित आर्यचा रुग्णालयात मृत्यू झाला. पोलीस कारवाईदरम्यान त्याला गोळी लागली आणि गंभीर अवस्थेत रुग्णालयात नेण्यात आले.  जिथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. आता या प्रकरणात नवीन माहिती समोर आली आहे. या प्रकरणात माजी मंत्री आणि शिवसेना नेते दीपक केसरकर यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.

मुंबईतील पवई येथे रोहित आर्याचा पोलिसांनी एन्काउंटर केला होता. दरम्यान आता या प्रकरणात दीपक केसरकर यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. मुंबई पोलिसांची गुन्हे शाखा माजी मंत्री दीपक केसरकर यांचा जबाब नोंदवण्याची शक्यता आहे. रोहित आर्याचा एन्काउंटर झाला त्या दिवशी पोलिसांनी दीपक केसरकर यांना रोहित आर्यशी बोलण्याची विनंती केल्याचे समजते आहे.

पोलिसांनी केसरकर यांना रोहित आर्यशी बोलण्याची विनंती केली होती. मात्र दीपक केसरकर यांनी रोहित आर्यशी बोलण्यास नकार दिला होता. त्यामुळे आता त्यांची बाजू समजून घेण्यासाठी मुंबई पोलिसांची गुन्हे शाखा त्यांचा जबाब नोंदवण्याची शक्यता आहे. त्यामुळे दीपक केसरकर यांच्या अडचणी वाढणार का अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

पवई ओलीस प्रकरणावर दीपक केसरकर यांची प्रतिक्रिया

आरोपी रोहित आर्य याचा पोलिसांकडून चकमकीमध्ये एन्काऊंटर झाला. त्याला सरकारी कामामधून 2 कोटी रुपये मिळणे अपेक्षित होते. मात्र ते थकवल्यामुळे रोहित आर्य याने आंदोलन आणि उपोषण देखील केले. या प्रकरणी त्याने तत्कालीन शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांची भेट घेऊन देखील फायदा झाला नाही असा दावा करण्यात येत आहे. या प्रकरणी आमदार दीपक केसरकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, “रोहित आर्या यांची स्वच्छता मॉनिटर नावाची कॉन्सेप्ट होती. माझी शाळा, सुंदर शाळामध्येही त्यांना काम देण्यात आलं होतं. पण त्या लोकांकडून त्यांनी डायरेक्ट पैसे घेतले. हे मॅटर त्यांनी संबंधित डिपार्टमेंटशी बोलून सोडवलं पाहिजे. मात्र अशा पद्धतीने कोणालाही ओलीस धरणं हे चुकीचं आहे,” अशी प्रतिक्रिया दीपक केसरकर यांनी दिली आहे.

Rohit Arya Powai case: मी रोहित आर्यला चेकने पैसे दिले..; पवई ओलीस प्रकरणावर दीपक केसरकर यांची प्रतिक्रिया

पुढे ते म्हणाले की, “मी रोहित आर्य याला ओळखतो. मी रोहित आर्यला चेकने पैसे दिले होते. रोहित आर्या यांची स्वच्छता मॉनिटर नावाची कॉन्सेप्ट होती. माझी शाळा, सुंदर शाळामध्येही त्यांना काम देण्यात आलं होतं. पण त्या लोकांकडून त्यांनी डायरेक्ट पैसे घेतले. हे मॅटर त्यांनी संबंधित डिपार्टमेंटशी बोलून सोडवलं पाहिजे,” असं केसरकर म्हणाले. अशा पद्धतीने कोणालाही ओलीस धरणं हे चुकीचं आहे, अशी प्रतिक्रिया तत्कालीन शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी पवई ओलीस प्रकरणावर दिली आहे.

 

Web Title: Mumbai crime branch record statement deepak kesarkar rohit arya encounter case powai

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 03, 2025 | 08:11 PM

Topics:  

  • Deepak Kesarkar
  • Maharashtra Politics
  • rohit arya

संबंधित बातम्या

आदिवासी महामंडळाच्या निवडणुकीत येणार रंगत; 17 जागांसाठी 43 उमेदवार मैदानात
1

आदिवासी महामंडळाच्या निवडणुकीत येणार रंगत; 17 जागांसाठी 43 उमेदवार मैदानात

Rohit Arya Case: ‘त्या दिवशी रोहित आर्यला भेटले अन्..”, ‘लग्नानंतर होईलच प्रेम’ची मंजूचा धक्कादायक खुलासा
2

Rohit Arya Case: ‘त्या दिवशी रोहित आर्यला भेटले अन्..”, ‘लग्नानंतर होईलच प्रेम’ची मंजूचा धक्कादायक खुलासा

Kolhapur News : कोल्हापूरमध्ये सरदार वल्लभभाई पटेल यांना अभिवादन; भाजपाकडून एकता पदयात्रेचं आयोजन 
3

Kolhapur News : कोल्हापूरमध्ये सरदार वल्लभभाई पटेल यांना अभिवादन; भाजपाकडून एकता पदयात्रेचं आयोजन 

जेव्हा आयुष्यच भयपट बनते! नांदेडचे 5 विद्यार्थी सापडले होते रोहित आर्यच्या तावडीत, पुढे जे घडलं…
4

जेव्हा आयुष्यच भयपट बनते! नांदेडचे 5 विद्यार्थी सापडले होते रोहित आर्यच्या तावडीत, पुढे जे घडलं…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.