
फोटो सौजन्य सोशल मिडिया
माझगाव डॉकमधील फिक्स्ड टर्म कामगारांच्या रोजगारासह प्रस्तावित पी-७५१ प्रकल्पाबाबत मंत्री ॲड. फुंडकर यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयामध्ये बैठक पार पडली, या बैठकीत कामगार मंत्री ॲड. आकाश फुंडकर म्हणाले, माझगाव डॉक ही आस्थापना राज्य कामगार आयुक्तालयाच्या कार्यकक्षेत येत नसून केंद्र शासनाशी सबंधित आस्थापना आहे. तथापी, कामगारांच्या मागण्यांच्या अनुषंगाने राज्य कामगार आयुक्तालयाने केंद्रीय कामगार विभागाशी संपर्क साधला आहे.माझगाव डॉक व्यवस्थापनाने केंद्रीय कामगार विभागाला दिलेल्या माहितीनुसार, कंपनीला मिळणारे कार्यादेश आणि त्यानुसार उपलब्ध कामाचा व्याप यांच्याशी फिक्स्ड टर्म कामगारांची नियुक्ती जोडली गेली आहे.
कचऱ्यापासून CBG निर्मितीसाठी टास्क फोर्स स्थापन करा; CM Devendra Fadnavis यांचे निर्देश
कंपनीच्या कामकाजाच्या आवश्यकतेनुसार या कामगारांची नियुक्ती केली जाते, त्यानुसार कामगारांच्या नियुक्तीसाठी पाठपुरावा करण्यात येणार असल्याचे सांगत कामगार मंत्री फुंडकर म्हणाले, कंपनीला सध्या नवीन कार्यादेश प्राप्त झालेले नसल्यामुळे फिक्स्ड टर्म कामगारांची नवीन भरती प्रस्तावित नसल्याचे निदर्शनास येत आहे. भविष्यात नवीन कार्यादेश मिळाल्यास कंपनीची आवश्यकता आणि कामाचा व्याप विचारात घेऊन भरती केली जाऊ शकते. लागू भरती निकषांनुसार उमेदवारांचा विचार करताना जहाजबांधणी क्षेत्रातील संबंधित अनुभवाला योग्य महत्व दिले जाईल, यासाठी विभागाच्या माध्यमातून प्रयत्न करण्यात येतील.
फिक्स्ड टर्म कामगारांनी केंद्रीय कामगार व रोजगार मंत्रालयाच्या ‘समाधान’ पोर्टलवर औद्योगिक वाद दाखल केल्यास त्याची तपासणी करून औद्योगिक संबंध संहिता, २०२० आणि त्याअंतर्गत लागू नियमांनुसार योग्य कार्यवाही करण्यात येईल, असेही कामगार मंत्री ॲड. आकाश फुंडकर म्हणाले.
यावेळी कामगार विभागाच्या अपर मुख्य सचिव आय. ए. कुंदन, कामगार आयुक्त एच. पी. तुम्मोड आणि माझगाव डॉक कामगार संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.
Sugarcane Rate : दर निश्चित होईपर्यंत ऊस देऊ नका, वसीम इनामदारांचे शेतकऱ्यांना आवाहन