Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 11 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pratap Sarnaik : ॲक्शन मोडमध्ये प्रताप सरनाईक! MMRDA च्या ५५४ सुरक्षा रक्षकांना थकीत पगारासह दिवाळी बोनस मिळणार

Pratap Sarnaik : मुंबई मेट्रो आणि मोनोरेल स्थानकांवर कार्यरत असलेल्या MMRDA च्या ५५४ कंत्राटी सुरक्षा रक्षकांना कामावरून कमी केल्याच्या प्रकरणात परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी हस्तक्षेप केला.

  • By विवेक
Updated On: Oct 11, 2026 | 06:05 PM
Sarnaik MMRDA Diwali Bonus

Sarnaik MMRDA Diwali Bonus

Follow Us
Follow Us:
  • MMRDA च्या ५५४ सुरक्षा रक्षकांचा रोजगाराचा प्रश्न
  • प्रताप सरनाईकांचा हस्तक्षेप; थकीत पगाराबाबत निर्देश
  • दोन महिन्यांचे वेतन आणि दिवाळी बोनस मिळणार?
 

भाईंदर : मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (MMRDA) अखत्यारीतील मेट्रो आणि मोनोरेल स्थानकांवर कार्यरत असलेल्या ५५४ कंत्राटी सुरक्षा रक्षकांना कामावरून कमी करण्याच्या प्रकरणात परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी हस्तक्षेप केला आहे. त्यांच्या आक्रमक भूमिकेनंतर संबंधित सुरक्षा रक्षकांना पुन्हा सेवेत रुजू करून घेण्यासह दोन महिन्यांचे थकीत वेतन, कामावरून दूर ठेवलेल्या ७ ते ८ दिवसांचा पगार आणि दिवाळी बोनस देण्याचे निर्देश देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. (Pratap Sarnaik)

मुंबई मेट्रो लाईन ७, २A, ९, २B तसेच मुंबई मोनोरेलच्या ५१ स्थानकांवर सुमारे ५५४ सुरक्षा रक्षक कार्यरत आहेत. संबंधित कंत्राटदाराने १ ऑक्टोबर २०२६ पासून कोणतीही कायदेशीर नोटीस न देता केवळ व्हॉट्सॲप संदेशाद्वारे या कर्मचाऱ्यांना कामावरून कमी केल्याचा आरोप आहे. त्यामुळे अनेक कामगारांच्या कुटुंबांवर आर्थिक संकट ओढवले होते. अन्यायग्रस्त SISPL सुरक्षा रक्षकांनी मंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडे धाव घेत मदतीची मागणी केली.

कामगारांच्या तक्रारीची गंभीर दखल घेत सरनाईक यांनी MMRDA महानगर आयुक्त डॉ. संजय मुखर्जी यांच्याशी संपर्क साधून या प्रकरणी तातडीने कार्यवाही करण्याची मागणी केली. कोणत्याही कामगारावर अन्याय सहन केला जाणार नाही, अशी ठाम भूमिका त्यांनी घेतली. सर्व ५५४ सुरक्षा रक्षकांना पुन्हा सेवेत सामावून घेणे, थकीत वेतन अदा करणे आणि दिवाळी बोनस देण्याबाबत त्यांनी निर्देश दिल्याचे सांगण्यात आले.

विद्यार्थ्यांना वाऱ्यावर सोडल्यास उद्याचे आंदोलन महागात पडेल; आमदार रोहित पवारांचा सरकारला निर्वाणीचा इशारा

शिवसेना पदाधिकाऱ्यांचा पाठपुरावा

या प्रकरणात शिवसेनेच्या महिला जिल्हा संघटक निशा नार्वेकर, भाईंदर पूर्व शहर समन्वयक मनोज राणे आणि मिरा रोड शहरप्रमुख संतोष गोळे यांनी कामगारांच्या बाजूने पाठपुरावा केला.

“कामगारांच्या हक्कांची पायमल्ली आणि कंत्राटदारांची दडपशाही सहन केली जाणार नाही. कामगारांचा हक्क आणि सन्मान जपण्यासाठी आम्ही सदैव तत्पर आहोत,” अशी भूमिका मंत्री सरनाईक यांनी मांडली. या हस्तक्षेपामुळे सुरक्षा रक्षकांना दिलासा मिळाल्याचे सांगण्यात येत आहे.

Shivaji Park CJP Protest : मुंबईत शिवाजी पार्कवर CJP चं आंदोलन, पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात

Web Title: Pratap sarnaik mmrda security guards pending salary diwali bonus

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 11, 2026 | 06:05 PM

Topics:  

  • MMRDA
  • Mumbai News
  • pratap sarnaik

संबंधित बातम्या

CJP Mumbai Protest : आंदोलकांची धरपकड सुरूच! शिवाजी पार्क परिसरात पोलिसांची फिल्डिंग, दंगली भडकवण्याचा पोलिसांचा डाव? मनसेचा आरोप
1

CJP Mumbai Protest : आंदोलकांची धरपकड सुरूच! शिवाजी पार्क परिसरात पोलिसांची फिल्डिंग, दंगली भडकवण्याचा पोलिसांचा डाव? मनसेचा आरोप

Mumbai News: वॉर्डमध्ये डॉक्टर आले नाहीत, सहकारी खोलीत पोहोचला; बाथरूम उघडताच निवासी डॉक्टर मृतावस्थेत
2

Mumbai News: वॉर्डमध्ये डॉक्टर आले नाहीत, सहकारी खोलीत पोहोचला; बाथरूम उघडताच निवासी डॉक्टर मृतावस्थेत

Mumbai News : मुंबईत ‘वंचित’ आक्रमक! हुतात्मा चौकात आंदोलन, पोलिसांकडून कार्यकर्ते ताब्यात
3

Mumbai News : मुंबईत ‘वंचित’ आक्रमक! हुतात्मा चौकात आंदोलन, पोलिसांकडून कार्यकर्ते ताब्यात

एसटी बँकेचे मुख्य कार्यालय म्हणजे गुंडागर्दीचा अड्डा; श्रीरंग बरगे यांचा आरोप
4

एसटी बँकेचे मुख्य कार्यालय म्हणजे गुंडागर्दीचा अड्डा; श्रीरंग बरगे यांचा आरोप

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.