Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 11 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

CJP Mumbai Protest : आंदोलकांची धरपकड सुरूच! शिवाजी पार्क परिसरात पोलिसांची फिल्डिंग, दंगली भडकवण्याचा पोलिसांचा डाव? मनसेचा आरोप

CJP Mumbai Protest : दिल्लीतील CJP आंदोलनाचे पडसाद मुंबईतही उमटले आहेत. शिवाजी पार्क परिसरात पोलिसांनी बॅरिकेडिंग करत अनेकांना ताब्यात घेतले. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांच्यासह आंदोलकांवर कारवाई झाल्याच्या पार्श्वभूमीवर मनसे नेते संदीप देशपांडे यांनी पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केले.

  • By विवेक
Updated On: Oct 11, 2026 | 07:15 PM
Mumbai CJP Protest

Mumbai CJP Protest

Follow Us
Follow Us:
  • शिवाजी पार्क परिसरात पोलिसांचा मोठा बंदोबस्त
  • स्थानिकांना आंदोलकांना विरोध करण्यास सांगितले; संदीप देशपांडेंचा आरोप
  • दिल्लीतील आंदोलनाचे मुंबईत पडसाद
 

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीन्याच्या मागणीसाठी कॉकरोच जनता पार्टी आणि काही विद्यार्थी संघटनांकडून दिल्लीत जोरदार आंदोलन पार पाडले जात आहे. याचे पडसाद कालपासूनच मुंबईतदेखील पाहायला मिळत आहे. दिल्ली आणि मुंबईत पोलिसांकडून धरपकड चालू असून आंदोलकांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. काल मोठ्या प्रमाणात CJP चे पदाधिकारी, राजकीय नेते आणि इतर आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर आजही पोलिसांकडून तोच कित्ता गिरवला जात आहे. यावरूनच मोठ्या प्रमाणात राजकीय आणि सामाजिक वर्तुळात संताप व्यक्त करण्यात येत असून चर्चाना उधाण आले आहे. (CJP Mumbai Protest)

दादर येथील छत्रपती शिवाजी महाराज पार्क परिसरात आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांनी मोठा बंदोबस्त तैनात केला आहे. परिसराकडे जाणाऱ्या मार्गांवर बॅरिकेडिंग करण्यात आले असून अनेकांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली आहे. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले. या कारवाईवरून मनसे नेते संदीप देशपांडे यांनी पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित करत गंभीर आरोप केले आहेत.

शिवाजी पार्क परिसरात पोलिसांचा मोठा बंदोबस्त

केंद्रीय मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी आणि CJP समर्थकांवरील कारवाईच्या निषेधार्थ मुंबईत आंदोलनाची हाक देण्यात आली होती. या पार्श्वभूमीवर शिवाजी पार्क परिसरात पोलिसांनी सुरक्षाव्यवस्था वाढवली. महत्त्वाच्या मार्गांवर बॅरिकेडिंग करण्यात आले असून परिसरात येणाऱ्या नागरिकांची चौकशी केली जात असल्याचे वृत्त आहे.

CJP Press Conference : ‘मोदींसारखा भित्रा पंतप्रधान पहिला नाही,’ CJP च्या आशुतोष रांकाचा जोरदार हल्लाबोल

काही नागरिकांनी आपण आंदोलक नसून कामावरून घरी जात असल्याचे किंवा परिसरात फिरण्यासाठी आल्याचे सांगितले. तरीही पोलिसांनी आपल्याला ताब्यात घेतल्याचा दावा काही तरुणांनी केला आहे. दरम्यान, अंजली दमानिया यांनाही आंदोलनस्थळी पोहोचण्याच्या प्रयत्नादरम्यान ताब्यात घेण्यात आल्याचे वृत्त समोर आले आहे.

“स्थानिकांना आंदोलकांना विरोध करण्यास सांगितले”; संदीप देशपांडेंचा आरोप

या कारवाईवरून मनसे नेते संदीप देशपांडे यांनी पोलिसांवर गंभीर आरोप केले आहेत. त्यांच्या दाव्यानुसार, शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात भाजपच्या एका पदाधिकाऱ्याने स्थानिकांची बैठक घेतली होती. या बैठकीत आंदोलकांना अडवण्यास आणि त्यांना विरोध करण्यास सांगण्यात आल्याचा आरोप देशपांडे यांनी केला.

आंदोलकांच्या अंगावर जाण्यास सांगून त्याबदल्यात संरक्षण देण्याचे आश्वासन देण्यात आल्याचा दावाही त्यांनी केला. या आरोपांचे पुरावे आपल्याकडे असल्याचे देशपांडे यांनी म्हटले आहे. त्यामुळे मुंबईत संघर्ष घडवून आणण्याचा प्रयत्न होता का, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

दिल्लीतील आंदोलनाचे मुंबईत पडसाद

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी CJP ने दिल्लीत आंदोलन पुकारले होते. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पक्षाचे संस्थापक अभिजीत दिपके यांच्यासह काही कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याचे वृत्त समोर आले होते. त्यानंतर मुंबईतही आंदोलनाची घोषणा करण्यात आली.

मुंबईतील शिवाजी पार्क परिसरातील बंदोबस्त, आंदोलकांना ताब्यात घेण्याची कारवाई आणि संदीप देशपांडे यांनी केलेले आरोप यामुळे या प्रकरणाला राजकीय वळण मिळाले आहे. पोलिसांची कारवाई नेमकी कोणत्या कारणांमुळे करण्यात आली आणि देशपांडे यांच्या आरोपांबाबत प्रशासन काय भूमिका घेते, याकडे आता लक्ष लागले आहे.

Sanjay Raut : ‘मोदी पंतप्रधान राहणार नाहीत?’ संजय राऊतांचा मोठा दावा, मोदी-शाह आणि फडणवीसांवर जोरदार टीका

Web Title: Cjp mumbai protest shivaji park mumbai police protestors detained sandeep despande vg

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 11, 2026 | 07:15 PM

Topics:  

  • CJP Protest
  • Mumbai News
  • Mumbai Police
  • Sandeep Deshpande

संबंधित बातम्या

CJP Protest Mumbai : मुंबईत CJP आंदोलनावरून राडा! आदित्य-तेजस ठाकरे आंदोलनात उतरले, ‘महाराष्ट्र बंद’चा इशारा
1

CJP Protest Mumbai : मुंबईत CJP आंदोलनावरून राडा! आदित्य-तेजस ठाकरे आंदोलनात उतरले, ‘महाराष्ट्र बंद’चा इशारा

CJP protest: CJP आंदोलन अन् थेट UN ची एंट्री! भारताने संयुक्त राष्ट्रसंघाला कसं खडसावलं?
2

CJP protest: CJP आंदोलन अन् थेट UN ची एंट्री! भारताने संयुक्त राष्ट्रसंघाला कसं खडसावलं?

Pratap Sarnaik : ॲक्शन मोडमध्ये प्रताप सरनाईक! MMRDA च्या ५५४ सुरक्षा रक्षकांना थकीत पगारासह दिवाळी बोनस मिळणार
3

Pratap Sarnaik : ॲक्शन मोडमध्ये प्रताप सरनाईक! MMRDA च्या ५५४ सुरक्षा रक्षकांना थकीत पगारासह दिवाळी बोनस मिळणार

CJP Press Conference : ‘मोदींसारखा भित्रा पंतप्रधान पहिला नाही,’ CJP च्या आशुतोष रांकाचा जोरदार हल्लाबोल
4

CJP Press Conference : ‘मोदींसारखा भित्रा पंतप्रधान पहिला नाही,’ CJP च्या आशुतोष रांकाचा जोरदार हल्लाबोल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.