Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 1 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Politics Maharashtra |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Mumbai News: संस्थाचालकांना लगाम; शिक्षक भरती होणार पारदर्शक! ३ ते २५ नोव्हेंबरपर्यंत मुलाखती, कौशल्य चाचणी

Mumbai News: निवड प्रक्रियेत शिफारस झालेल्या उमेदवारांना तसेच संबंधित व्यवस्थापनांना एसएमएसद्वारे माहिती देण्यात येत आहे. उमेदवारांना पवित्र पोर्टलच्या अधिकृत संकेतस्थळावर लॉगिन करून निवडीची स्थिती पाहता येणार आहे. तसेच व्यवस्थापननिहाय सर्वसाधारण गुणवत्ता यादी संकेतस्थळाच्या होमपेजवरील 'डाउनलोड' मेनूमध्ये उपलब्ध करून दिली आहे.

  • By सुरुची कदम
Updated On: Nov 01, 2026 | 08:57 AM
संस्थाचालकांना लगाम; शिक्षक भरती होणार पारदर्शक! ३ ते २५ नोव्हेंबरपर्यंत मुलाखती, कौशल्य चाचणी

संस्थाचालकांना लगाम; शिक्षक भरती होणार पारदर्शक! ३ ते २५ नोव्हेंबरपर्यंत मुलाखती, कौशल्य चाचणी

Follow Us
Follow Us:

Mumbai News: राज्यातील शिक्षक भरती प्रक्रियेत संस्थाचालकांच्या मनमानीला लगाम घालण्यासाठी मुलाखतीसह निवड प्रक्रियेत गुणांचे निश्चित निकष ठेवण्यात आले आहेत. यामध्ये शिक्षक अभियोग्यता व बुध्दीमत्ता चाचणी मध्ये प्राप्त गुण, शिफारस केलेल्या पदाची व्यावसायिक अर्हता, शिफारस केलेल्या पदाची शैक्षणिक अर्हता या साठी ९० गुण असतील तर संस्थाचालकांच्या, हातात मुलाखतीसाठी केवळ १० गुण राहणार असल्याने शिक्षक भरती प्रक्रिया अधिक पारदर्शक होणार अशी माहिती पत्रकार परिषदेत शिक्षण आयुक्त सचिंद्र, प्रताप सिंह यांनी दिली.(फोटो सौजन्य – istock)

Prakash Abitkar : आता महागड्या तपासण्यांचा खर्च वाचणार! पालकमंत्री प्रकाश आबिटकरांची कोल्हापूरला मोठी भेट

प्राधान्यक्रमांवर उमेदवारांची शिफारस

पवित्र पोर्टलमार्फत राबविण्यात येणाऱ्या शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी २०२५ अंतर्गत मुलाखतीसह निवड प्रकारातील नियमित फेरीची सर्वसाधारण गुणवत्तायादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. यामध्ये खासगी व्यवस्थापनांच्या शाळांमधील १० हजार ३२८ रिक्त पदांसाठी ११ हजार ४९३ उमेदवारांची मुलाखत व अध्यापन कौशल्य चाचणीसाठी शिफारस करण्यात आली आहे. या उमेदवारांची २७ हजार १४५ प्राधान्यक्रमांवर शिफारस झाली आहे. संबंधित मुलाखती व अध्यापन कौशल्य चाचणी ३ ते २५ नोव्हेंबरदरम्यान पूर्ण करण्याचे निर्देश नियुक्ती प्राधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.

२५ नोव्हेंबरपर्यंत मुलाखती पूर्ण होणार

निवड प्रक्रियेत शिफारस झालेल्या उमेदवारांना तसेच संबंधित व्यवस्थापनांना एसएमएसद्वारे माहिती देण्यात येत आहे. उमेदवारांना पवित्र पोर्टलच्या अधिकृत संकेतस्थळावर लॉगिन करून निवडीची स्थिती पाहता येणार आहे. तसेच व्यवस्थापननिहाय सर्वसाधारण गुणवत्ता यादी संकेतस्थळाच्या होमपेजवरील ‘डाउनलोड’ मेनूमध्ये उपलब्ध करून देण्यात आली आहे. शासन निर्णयातील तरतुदीनुसार ३ नोव्हेंबर ते २५ नोव्हेंबर २०२६ या कालावधीत उमेदवारांच्या मुलाखती आणि अध्यापन कौशल्य चाचणी पूर्ण करण्याचे नियोजन करण्याचे निर्देश नियुक्ती प्राधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.

Buldhana News : पावसाने वाळणारी पिकं आता वाचणार? तूर, कपाशी आणि हळदीला सिंचनासाठी पाणी देण्याचा निर्णय!

तक्रारींसाठी ७ नोव्हेंबरपर्यंत मुदत

पवित्र पोर्टलवरील मुलाखतीशिवाय निवड प्रकारातील निवडीसंदर्भात तक्रारींच्या निवारणासाठी राज्यस्तरावर तक्रार निवारण व दुरुस्ती समिती स्थापन करण्यात आली आहे. संबंधित उमेदवारांनी विहित नमुन्यातील तक्रारी ७ नोव्हेंबर २०२६ पर्यंत edupavitra२०२५grcc@gmail.com या ई-मेलवर पाठवाव्यात, असे आवाहन करण्यात आले आहे.

 

डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.

Web Title: Mumbai news interviews and skill tests to be conducted between november 3 and 25 sk

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 01, 2026 | 08:57 AM

Topics:  

  • bmc school
  • Mumbai News
  • Teacher Recruitment

संबंधित बातम्या

BMC School Diwali Holidays: BMC शाळांना यंदा दिवाळीची बंपर सुट्टी, 16 दिवस शाळा बंद राहणार, मुंबई महापालिकेचं परिपत्रक जाहीर
1

BMC School Diwali Holidays: BMC शाळांना यंदा दिवाळीची बंपर सुट्टी, 16 दिवस शाळा बंद राहणार, मुंबई महापालिकेचं परिपत्रक जाहीर

Women: स्त्रीशक्तीचा संघर्ष आणि अस्तित्वाची कहाणी!! महिलांच्या जीवनातील विविध पैलू आणि हक्कांचे दर्शन घडविणारे छायाचित्र प्रदर्शन
2

Women: स्त्रीशक्तीचा संघर्ष आणि अस्तित्वाची कहाणी!! महिलांच्या जीवनातील विविध पैलू आणि हक्कांचे दर्शन घडविणारे छायाचित्र प्रदर्शन

Mumbai News: अवघ्या ६२५ ग्रॅमच्या चिमुकल्याला मिळाले नवजीवन! जूचंद्र महापालिका रुग्णालयात ८२ दिवसांची यशस्वी उपचारसेवा
3

Mumbai News: अवघ्या ६२५ ग्रॅमच्या चिमुकल्याला मिळाले नवजीवन! जूचंद्र महापालिका रुग्णालयात ८२ दिवसांची यशस्वी उपचारसेवा

Mumbai News: गरीबनगरमधील ९४ बांधकामांवर हातोडा! पात्र कुटुंबांचे पुनर्वसन; रेल्वेच्या पायाभूत सुविधांचा होणार विस्तार
4

Mumbai News: गरीबनगरमधील ९४ बांधकामांवर हातोडा! पात्र कुटुंबांचे पुनर्वसन; रेल्वेच्या पायाभूत सुविधांचा होणार विस्तार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.