Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 31 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Politics Maharashtra |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Mumbai News: अवघ्या ६२५ ग्रॅमच्या चिमुकल्याला मिळाले नवजीवन! जूचंद्र महापालिका रुग्णालयात ८२ दिवसांची यशस्वी उपचारसेवा

Mumbai News: जूचंद्र येथील महापालिकेच्या माताबाल संगोपन केंद्रातील नवजात शिशू अतिदक्षता विभागात बाळाला दाखल करण्यात आले. या बाळाचे वजन अवघे ६२५ ग्रॅम असून आता बाळाचे वजन १ किलो ६२५ ग्रॅमपर्यंत पोहोचले आहे.

  • By सुरुची कदम
Updated On: Oct 31, 2026 | 11:03 AM
अवघ्या ६२५ ग्रॅमच्या चिमुकल्याला मिळाले नवजीवन! जूचंद्र महापालिका रुग्णालयात ८२ दिवसांची यशस्वी उपचारसेवा

अवघ्या ६२५ ग्रॅमच्या चिमुकल्याला मिळाले नवजीवन! जूचंद्र महापालिका रुग्णालयात ८२ दिवसांची यशस्वी उपचारसेवा

Follow Us
Follow Us:

Mumbai News: वसई-विरार महापालिकेच्या जूचंद्र येथील माताबाल संगोपन केंद्रात डॉक्टरांनी वैद्यकीय कौशल्य आणि अथक प्रयत्नांच्या जोरावर अवघ्या ६२५ ग्रॅम वजनाच्या अतिपूर्वजन्म बाळाला नवजीवन दिले आहे. जन्मानंतर बाळाची प्रकृती अत्यंत नाजूक होती. मात्र, तब्बल ८२ दिवसांच्या उपचारांनंतर बाळाचे वजन आता १ किलो ६२५ ग्रॅम झाले आहे. विशेष म्हणजे, महापालिकेच्या रुग्णालयात हे उपचार पूर्णपणे मोफत करण्यात आले आहेत.

Mumbai News : प्रवीण दाभाडे यांची युनायटेड चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज फॉर अ‍ॅग्रीकल्चरच्या मुंबई चॅप्टर अध्यक्षपदी नियुक्ती

१० ऑगस्ट २०२६ रोजी या चिमुकल्याचा जन्म झाला. जन्मावेळी बाळाचे वजन होते अवघे ६२५ ग्रॅम. अतिशय कमी वजनामुळे बाळाला श्वसनाचा त्रास, संसर्गाचा धोका आणि शरीराचे तापमान नियंत्रित ठेवण्यासारख्या अनेक वैद्यकीय आव्हानांचा सामना करावा लागत होता.

अशा परिस्थितीत जूचंद्र येथील महापालिकेच्या माताबाल संगोपन केंद्रातील नवजात शिशू अतिदक्षता विभागात बाळाला दाखल करण्यात आले. वैद्यकीय अधीक्षक डॉ. गायत्री गोरख आणि बालरोगतज्ज्ञ डॉ. अंजू तिवारी शुक्ला यांच्या मार्गदर्शनाखाली डॉक्टर, परिचारिका आणि आरोग्य कर्मचाऱ्यांनी सलग ८२ दिवस विशेष उपचार आणि देखरेख केली.

योग्य औषधोपचार, पोषण आणि अहोरात्र वैद्यकीय निगेमुळे बाळाच्या प्रकृतीत हळूहळू सुधारणा झाली. अखेर जन्मावेळी ६२५ ग्रॅम असलेले बाळाचे वजन आता १ किलो ६२५ ग्रॅमपर्यंत पोहोचले आहे. म्हणजेच या ८२ दिवसांत बाळाच्या वजनात तब्बल एक किलोने वाढ झाली आहे.

या यशस्वी उपचारांबद्दल आरोग्य समिती सभापती निलेश देशमुख, आरोग्य समिती सदस्य डॉ. शुभांगी पाटील, आशिष वर्तक, अरुणा डाबरे आणि वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. भक्ती चौधरी यांनी रुग्णालयाला भेट देत वैद्यकीय पथकाचे कौतुक केले.

Maharashtra Accident Report: अजून किती जीव जाणार? राज्यात २६ हजार अपघातांचा हादरवणारा ग्राफ; पोलिसांची आकडेवारी जाहीर!

यावेळी बोलताना आरोग्य समिती सभापती निलेश देशमुख यांनी सांगितले की, खासगी रुग्णालयात अशा प्रकारच्या उपचारांसाठी लाखो रुपयांचा खर्च येऊ शकतो. मात्र, महापालिकेच्या रुग्णालयात ही संपूर्ण वैद्यकीय सेवा मोफत उपलब्ध करून देण्यात आली. महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये दरवर्षी सरासरी १० हजार सुरक्षित प्रसूती होत असून, सर्वसामान्य नागरिकांसाठी ही रुग्णालये वरदान ठरत असल्याचेही त्यांनी सांगितले.

💡

Frequently Asked Questions

  • Que: अवघ्या ६२५ ग्रॅम वजनाच्या बाळाला नवजीवन कसे मिळाले?

    Ans: अत्यंत कमी वजनाने जन्मलेल्या या बाळावर जूचंद्र महापालिका रुग्णालयात विशेष वैद्यकीय देखरेखीखाली उपचार करण्यात आले.

  • Que: ६२५ ग्रॅम वजनाने जन्मलेले बाळ किती धोकादायक स्थितीत असते?

    Ans: ६२५ ग्रॅम हे नवजात बाळाचे अत्यंत कमी जन्मवजन आहे. अशा बाळांना श्वसन, शरीराचे तापमान नियंत्रित ठेवणे, संसर्ग आणि पोषण यांसंबंधी अनेक अडचणींचा सामना करावा लागू शकतो.

  • Que: अकाली जन्मलेल्या बाळांना NICU मध्ये का ठेवले जाते?

    Ans: अकाली जन्मलेल्या बाळांची अवयवप्रणाली पूर्ण विकसित झालेली नसू शकते. त्यामुळे श्वासोच्छ्वास, हृदयाचे ठोके, शरीराचे तापमान आणि पोषण यावर सतत लक्ष ठेवण्यासाठी त्यांना NICU मध्ये ठेवले जाते.

Web Title: Mumbai news juchandra municipal hospital saves 625 gram newborn after 82 days of intensive care sk

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 31, 2026 | 11:03 AM

Topics:  

  • Government Hospital
  • Mumbai News
  • Vasai news

संबंधित बातम्या

Women: स्त्रीशक्तीचा संघर्ष आणि अस्तित्वाची कहाणी!! महिलांच्या जीवनातील विविध पैलू आणि हक्कांचे दर्शन घडविणारे छायाचित्र प्रदर्शन
1

Women: स्त्रीशक्तीचा संघर्ष आणि अस्तित्वाची कहाणी!! महिलांच्या जीवनातील विविध पैलू आणि हक्कांचे दर्शन घडविणारे छायाचित्र प्रदर्शन

Mumbai News: गरीबनगरमधील ९४ बांधकामांवर हातोडा! पात्र कुटुंबांचे पुनर्वसन; रेल्वेच्या पायाभूत सुविधांचा होणार विस्तार
2

Mumbai News: गरीबनगरमधील ९४ बांधकामांवर हातोडा! पात्र कुटुंबांचे पुनर्वसन; रेल्वेच्या पायाभूत सुविधांचा होणार विस्तार

Mumbai News : प्रवीण दाभाडे यांची युनायटेड चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज फॉर अ‍ॅग्रीकल्चरच्या मुंबई चॅप्टर अध्यक्षपदी नियुक्ती
3

Mumbai News : प्रवीण दाभाडे यांची युनायटेड चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज फॉर अ‍ॅग्रीकल्चरच्या मुंबई चॅप्टर अध्यक्षपदी नियुक्ती

ABVP Mumbai : शासकीय वसतिगृहातील विद्यार्थ्यांच्या समस्यांवर अभाविप आक्रमक; प्रशासनाला ११ दिवसांचा अल्टिमेटम!
4

ABVP Mumbai : शासकीय वसतिगृहातील विद्यार्थ्यांच्या समस्यांवर अभाविप आक्रमक; प्रशासनाला ११ दिवसांचा अल्टिमेटम!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.