Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 31 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Politics Maharashtra |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Women: स्त्रीशक्तीचा संघर्ष आणि अस्तित्वाची कहाणी!! महिलांच्या जीवनातील विविध पैलू आणि हक्कांचे दर्शन घडविणारे छायाचित्र प्रदर्शन

Women: सध्याच्या ऑनलाइन युगात महिलांची विविध प्रकारे फसवणूक होण्याचे तसेच त्यांचे मानसिक आणि आर्थिक शोषण होण्याचे प्रकार वाढत आहेत. या पार्श्वभूमीवर ऑनलाइन सुरक्षितता, सायबर गुन्हे आणि त्यापासून बचाव करण्याबाबतही प्रदर्शनाच्या माध्यमातून जनजागृती करण्यात आली आहे.

  • By सुरुची कदम
Updated On: Oct 31, 2026 | 12:20 PM
स्त्रीशक्तीचा संघर्ष आणि अस्तित्वाची कहाणी!! महिलांच्या जीवनातील विविध पैलू आणि हक्कांचे दर्शन घडविणारे छायाचित्र प्रदर्शन

स्त्रीशक्तीचा संघर्ष आणि अस्तित्वाची कहाणी!! महिलांच्या जीवनातील विविध पैलू आणि हक्कांचे दर्शन घडविणारे छायाचित्र प्रदर्शन

Follow Us
Follow Us:

नीता परब: महिलांच्या जन्मापासून ते आयुष्यातील विविध टप्प्यांपर्यंतचा प्रवास, त्यांचे संघर्ष, कष्ट आणि सामाजिक वास्तव यांचे प्रभावी दर्शन घडविणाऱ्या या प्रदर्शनातून महिलांच्या जीवनातील विविध पैलू छायाचित्रांच्या माध्यमातून मांडण्यात आले आहेत. राज्य शासनाच्या महिलांसाठीच्या विविध योजना, महिला संरक्षणविषयक कायदे आणि मदतीसाठी उपलब्ध असलेल्या हेल्पलाईनची माहिती देण्यात आली आहे. प्रत्येकासाठी हे प्रदर्शन महत्वपूर्ण असल्याची माहिती महिला व बालविकास विभागाचे सचिव डॉ. अनुपकुमार यादव यांनी दिली.

Mumbai News : प्रवीण दाभाडे यांची युनायटेड चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज फॉर अ‍ॅग्रीकल्चरच्या मुंबई चॅप्टर अध्यक्षपदी नियुक्ती

महिलांच्या जीवनातील विविध पैलू

महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या वतीने मंत्रालयातील त्रिमूर्ती प्रांगणात आयोजित उजेडाच्या वाटेवर या छायाचित्र प्रदर्शनाला डॉ. अनुपकुमार यादव यांनी भेट दिली. यावेळी आयोगाच्या सदस्य सचिव नंदिनी आवडे उपस्थित होत्या. सर्व छायाचित्र संदेश भंडारी यांची कलाकृती आहे. प्रदर्शनात शहरी तसेच ग्रामीण भागातील कष्टकरी महिलांचे जीवन, त्यांच्या वाट्याला येणारे संघर्ष, सामाजिक परिस्थिती आणि विविध क्षेत्रांतील योगदान छायाचित्रांद्वारे मांडण्यात आले आहे.

छायाचित्रांमधून व्यक्त होणाऱ्या भावना अधिक प्रभावी करण्यासाठी कल्पना दुधाळ, नारायण सुर्वे, अरुण कांबळे यांसारख्या कवींच्या कवितांचाही समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे महिलांच्या जीवनातील वेदना, संघर्ष आणि जिद्दीचे वास्तव अधिक संवेदनशीलतेने उलगडते.

महिलांसाठी उपलब्ध असलेल्या विविध हेल्पलाईन क्रमांकाची प्रदर्शनात मािहती

महिलांना मदत मिळण्यासाठी उपलब्ध असलेल्या विविध हेल्पलाईन क्रमांकांची माहितीही प्रदर्शनात देण्यात आली आहे. यामध्ये चाइल्ड हेल्पलाइन १०९८, आपत्कालीन मदत ११२, महाराष्ट्र राज्य महिला आयोग १५५२०९, सखी वन स्टॉप सेंटर १८१, सायबर गुन्हे हेल्पलाइन १९३०, ज्येष्ठ नागरिकांसाठी १४५६७, मोफत कायदेशीर सल्ला १५१०० तसेच महिलांसाठी पोलीस मदत क्रमांक १०९१ यांचा समावेश आहे.

याशिवाय कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण अधिनियम, कामाच्या ठिकाणी महिलांचा लैंगिक छळ प्रतिबंधक अधिनियम, हुंडा प्रतिबंधक कायदा, मातृत्व लाभ कायदा, प्रसवपूर्व व प्रसवोत्तर निदान तंत्र कायदा, हिंदू वारसा हक्क कायदा, वैद्यकीय गर्भपात कायदा, माहिती तंत्रज्ञान कायदा आणि मुस्लिम महिलांच्या हक्कांशी संबंधित कायद्यांची माहिती देण्यात आली आहे.

सध्याच्या ऑनलाइन युगात महिलांची विविध प्रकारे फसवणूक होण्याचे तसेच त्यांचे मानसिक आणि आर्थिक शोषण होण्याचे प्रकार वाढत आहेत. या पार्श्वभूमीवर ऑनलाइन सुरक्षितता, सायबर गुन्हे आणि त्यापासून बचाव करण्याबाबतही प्रदर्शनाच्या माध्यमातून जनजागृती करण्यात आली आहे. महिलांच्या आयुष्यातील विविध अनुभव, संघर्ष आणि जगण्याची जिद्द यांचे दर्शन घडविणारे हे प्रदर्शन केवळ छायाचित्रांचे संकलन नसून महिलांचे हक्क, सुरक्षितता आणि समानतेचा संदेश देणारे प्रभावी माध्यम ठरत आहे.

Mumbai News: अवघ्या ६२५ ग्रॅमच्या चिमुकल्याला मिळाले नवजीवन! जूचंद्र महापालिका रुग्णालयात ८२ दिवसांची यशस्वी उपचारसेवा

मुलीच्या जन्मापासून ते महिलेच्या आयुष्यातील विविध टप्प्यांवर तिला करावा लागणारा संघर्ष, तिचा जीवनप्रवास आणि सामाजिक वास्तव यांचे प्रभावी चित्रण त्रिमूर्ती प्रांगणात आयोजित छायाचित्र प्रदर्शनातून करण्यात आले आहे. मुली व महिलांना समाजात समान हक्क आणि समान संधी मिळण्याच्या दृष्टीने या प्रदर्शनाचे महत्त्व असल्याचे मत मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांनी व्यक्त केले. महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या वतीने आयोजित या प्रदर्शनातील छायाचित्रे प्रसिद्ध छायाचित्रकार संदेश भंडारे यांनी टिपली आहेत.

💡

Frequently Asked Questions

  • Que: महिलांच्या जीवनातील विविध पैलू दर्शविणाऱ्या छायाचित्र प्रदर्शनाचा उद्देश काय आहे?

    Ans: या छायाचित्र प्रदर्शनाचा उद्देश महिलांचे जीवन, त्यांचा संघर्ष, यश, सामाजिक स्थान आणि हक्क यांविषयी समाजात जागरूकता निर्माण करणे हा आहे.

  • Que: छायाचित्र प्रदर्शनातून महिलांच्या कोणत्या संघर्षांचे दर्शन घडते?

    Ans: महिलांना शिक्षण, रोजगार, समानता, सुरक्षितता आणि सामाजिक स्वातंत्र्य मिळवताना करावा लागणारा संघर्ष तसेच त्यांच्या जिद्दीचे आणि यशाचे पैलू छायाचित्रांतून मांडले जातात.

  • Que: महिलांच्या हक्कांविषयी जागरूकता निर्माण करणे का महत्त्वाचे आहे?

    Ans: महिलांना समान संधी, शिक्षण, सुरक्षितता, सन्मान आणि निर्णयस्वातंत्र्य मिळण्यासाठी त्यांच्या हक्कांविषयी जागरूकता असणे आवश्यक आहे.

Web Title: Womens strength and struggles photo exhibition highlights womens lives experiences and rights sk

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 31, 2026 | 12:20 PM

Topics:  

  • Mumbai News
  • Womens

संबंधित बातम्या

Mumbai News: अवघ्या ६२५ ग्रॅमच्या चिमुकल्याला मिळाले नवजीवन! जूचंद्र महापालिका रुग्णालयात ८२ दिवसांची यशस्वी उपचारसेवा
1

Mumbai News: अवघ्या ६२५ ग्रॅमच्या चिमुकल्याला मिळाले नवजीवन! जूचंद्र महापालिका रुग्णालयात ८२ दिवसांची यशस्वी उपचारसेवा

Mumbai News: गरीबनगरमधील ९४ बांधकामांवर हातोडा! पात्र कुटुंबांचे पुनर्वसन; रेल्वेच्या पायाभूत सुविधांचा होणार विस्तार
2

Mumbai News: गरीबनगरमधील ९४ बांधकामांवर हातोडा! पात्र कुटुंबांचे पुनर्वसन; रेल्वेच्या पायाभूत सुविधांचा होणार विस्तार

Mumbai News : प्रवीण दाभाडे यांची युनायटेड चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज फॉर अ‍ॅग्रीकल्चरच्या मुंबई चॅप्टर अध्यक्षपदी नियुक्ती
3

Mumbai News : प्रवीण दाभाडे यांची युनायटेड चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज फॉर अ‍ॅग्रीकल्चरच्या मुंबई चॅप्टर अध्यक्षपदी नियुक्ती

ABVP Mumbai : शासकीय वसतिगृहातील विद्यार्थ्यांच्या समस्यांवर अभाविप आक्रमक; प्रशासनाला ११ दिवसांचा अल्टिमेटम!
4

ABVP Mumbai : शासकीय वसतिगृहातील विद्यार्थ्यांच्या समस्यांवर अभाविप आक्रमक; प्रशासनाला ११ दिवसांचा अल्टिमेटम!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.