Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 30 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Politics Maharashtra |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

ABVP Mumbai : शासकीय वसतिगृहातील विद्यार्थ्यांच्या समस्यांवर अभाविप आक्रमक; प्रशासनाला ११ दिवसांचा अल्टिमेटम!

ABVP Mumbai : शासकीय वसतिगृहातील विद्यार्थ्यांच्या मूलभूत समस्यांवर अखिल भारतीय विद्यार्थी परिषद आक्रमक झाली आहे. पिण्याचे पाणी, स्वच्छता, कॅन्टीन, लिफ्ट आणि वाय-फाय अशा विविध सुविधांसाठी अभाविपने उच्च शिक्षण विभागाच्या संयुक्त संचालकांना निवेदन दिले आहे.

  • By विवेक
Updated On: Oct 30, 2026 | 09:34 PM
abvp mumbai nivedan

abvp mumbai nivedan

Follow Us
Follow Us:
  • वसतिगृहातील मूलभूत सुविधांचा प्रश्न ऐरणीवर
  • पाणी, स्वच्छता, लिफ्ट आणि वाय-फायसाठी अभाविपची मागणी
  • विद्यार्थ्यांच्या मूलभूत सुविधांवर अभाविपची ठाम भूमिका
 

मुंबई, नवराष्ट्र न्यूज नेटवर्क / नीता परब : अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीने शासकीय वसतिगृहातील विद्यार्थ्यांच्या विविध मूलभूत समस्यांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी उच्च शिक्षण विभागाच्या संयुक्त संचालकांना निवेदन सादर करण्यात आले. यावेळी वसतिगृहातील विद्यार्थ्यांनीही एकत्रितपणे सहभागी होत आपल्या प्रलंबित समस्या प्रशासनासमोर मांडल्या. निवेदनानंतर या प्रश्नांवर संयुक्त संचालकांसोबत सविस्तर चर्चा करण्यात आली. (ABVP Mumbai)

वसतिगृहातील विद्यार्थाना भेडसावणाऱ्या समस्या

शासकीय वसतिगृहांमध्ये विद्यार्थ्यांना भेडसावणाऱ्या पिण्याच्या पाण्याची समस्या, लिफ्टची अकार्यक्षमता, नियमित स्वच्छतेचा अभाव, कॅन्टीनमधील अस्वच्छता व गैरसोयी, तसेच इमारतीच्या दुरवस्थेसह अनेक महत्त्वाच्या प्रश्नांकडे या निवेदनाद्वारे लक्ष वेधण्यात आले. याशिवाय उंदीर, कबुतरे व ढेकणांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रभावी उपाययोजना करणे, प्रत्येक मजल्यावर पिण्याच्या पाण्याची सुविधा उपलब्ध करून देणे, वाचनालयाचे नूतनीकरण करणे, संगणक सुविधा कार्यान्वित करणे, वसतिगृहात सुरळीत वाय-फाय सुविधा उपलब्ध करून देणे, तसेच भोजनाच्या गुणवत्तेवर नियंत्रण ठेवण्यासाठी वसतिगृह भोजन समिती स्थापन करणे या मागण्याही करण्यात आल्या. विद्यार्थी कल्याण निधीच्या वापराबाबत पारदर्शकता राखण्याबाबतची मागणीदेखील अभाविपच्या वतीने करण्यात आली.

विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रवासात वसतिगृहाची भूमिका अत्यंत महत्त्वाची असून, तेथील मूलभूत सुविधांच्या अभावामुळे विद्यार्थ्यांच्या दैनंदिन जीवनावर आणि शिक्षणावर परिणाम होता कामा नये. विद्यार्थ्यांना सुरक्षित, स्वच्छ आणि सन्मानजनक वातावरण उपलब्ध करून देणे ही प्रशासनाची जबाबदारी आहे, अशी भूमिका यावेळी अभाविपच्या पदाधिकाऱ्यांनी मांडली.

Gunratna Sadawarte : ‘डंके की चोट पे सांगतोय, एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होणार नाहीत’, गुणरत्न सदावर्तेंचं मोठं विधान

आंदोलनाचा इशारा

विद्यार्थ्यांनी मांडलेल्या समस्यांची संयुक्त संचालकांनी दखल घेत आवश्यक कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले. मात्र, केवळ आश्वासन नको तर प्रत्यक्ष कार्यवाही व्हावी, यासाठी अभाविपच्या वतीने प्रशासनाला ११ दिवसांची मुदत देण्यात आली आहे. या कालावधीत मागण्यांची पूर्तता न झाल्यास वसतिगृहातील विद्यार्थ्यांना सोबत घेऊन तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा स्पष्ट इशारा अभाविपने दिला आहे. याप्रसंगी अभाविप मुंबई महानगर मंत्री अभिषेक पवार, मुंबई महानगर वसतिगृह प्रमुख अथर्व, अभाविपचे अन्य कार्यकर्ते तसेच शासकीय वसतिगृहातील विद्यार्थी उपस्थित होते.

याबाबत बोलताना अभाविपचे मुंबई महानगर मंत्री अभिषेक पवार म्हणाले, “वसतिगृहातील विद्यार्थ्यांना मूलभूत सुविधा मिळणे हा त्यांचा अधिकार आहे. प्रशासनाने ११ दिवसांत या समस्यांचे निराकरण करावे, अन्यथा अभाविप विद्यार्थ्यांना सोबत घेऊन आंदोलन करण्यात येईल. विद्यार्थ्यांच्या हक्कांशी कोणतीही तडजोड केली जाणार नाही.”

Asha Workers : मुंबईतील आशा सेविकांची दिवाळी अंधारात? बोनस न मिळाल्यास ‘भीक मांगो’ आंदोलनाचा इशारा!

Web Title: Abvp mumbai ultimatum government hostel student problems vg

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 30, 2026 | 09:34 PM

Topics:  

  • ABVP
  • Mumbai News
  • Student Protest

संबंधित बातम्या

Mumbai News : प्रवीण दाभाडे यांची युनायटेड चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज फॉर अ‍ॅग्रीकल्चरच्या मुंबई चॅप्टर अध्यक्षपदी नियुक्ती
1

Mumbai News : प्रवीण दाभाडे यांची युनायटेड चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज फॉर अ‍ॅग्रीकल्चरच्या मुंबई चॅप्टर अध्यक्षपदी नियुक्ती

Mumbai Drone Crash: शो ठरला जीवघेणा! मुंबईत उडत्या ड्रोनचा प्रवाशाला भीषण फटका; डोक्याला गंभीर दुखापत!
2

Mumbai Drone Crash: शो ठरला जीवघेणा! मुंबईत उडत्या ड्रोनचा प्रवाशाला भीषण फटका; डोक्याला गंभीर दुखापत!

राज्यातील शाळा, अंगणवाड्यांना सुरक्षित पिण्याचे पाणी मिळणार; प्रशासनाचे महत्त्वपूर्ण निर्देश
3

राज्यातील शाळा, अंगणवाड्यांना सुरक्षित पिण्याचे पाणी मिळणार; प्रशासनाचे महत्त्वपूर्ण निर्देश

गोवंडी- मानखुर्दकडे दुर्लक्ष… मुंबई फक्त श्रीमंतांसाठीच! राज्य सरकार आणि महापालिकेवर सापत्न भावाची वागणूक दिल्याचा गंभीर आरोप
4

गोवंडी- मानखुर्दकडे दुर्लक्ष… मुंबई फक्त श्रीमंतांसाठीच! राज्य सरकार आणि महापालिकेवर सापत्न भावाची वागणूक दिल्याचा गंभीर आरोप

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.