Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 12 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Mumbai News: रुग्णभाराशी मेळ घालण्याचे आव्हान! राज्यातील रुग्णालयांत ओपीडी तिप्पट; डॉक्टर, मनुष्यबळही तिप्पट झाल्याबाबत सवाल

Mumbai News: रुग्णालयांमध्ये संदर्भित रुग्णांवर उपचार आणि विविध शस्त्रक्रिया केल्या जातात. मात्र, ओपीडीचा रुग्णभार तिप्पट वाढला असेल, तर त्या प्रमाणात डॉक्टर, शल्यचिकित्सक, स्त्रीरोगतज्ज्ञ, बालरोगतज्ज्ञ, परिचारिका आणि तांत्रिक कर्मचाऱ्यांची संख्या वाढली का, हा प्रश्न अधिक महत्त्वाचा ठरतो.

  • By सुरुची कदम
Updated On: Sep 12, 2026 | 09:47 AM
रुग्णभाराशी मेळ घालण्याचे आव्हान! राज्यातील रुग्णालयांत ओपीडी तिप्पट; डॉक्टर, मनुष्यबळही तिप्पट झाल्याबाबत सवाल

रुग्णभाराशी मेळ घालण्याचे आव्हान! राज्यातील रुग्णालयांत ओपीडी तिप्पट; डॉक्टर, मनुष्यबळही तिप्पट झाल्याबाबत सवाल

Follow Us
Follow Us:

Mumbai News: राज्यातील सरकारी रुग्णालयांमध्ये बाह्यरुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असताना आरोग्यसेवेचा विस्तारही त्याच वेगाने झाला आहे का, असा महत्त्वाचा प्रश्न आता उपस्थित होत आहे. सरकारी रुग्णालयांतील ओपीडी तिप्पट वाढणे ही एका बाजूला नागरिकांचा सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील वाढता विश्वास दर्शविणारी बाब असली, तरी दुसऱ्या बाजूला उपलब्ध डॉक्टर, परिचारिका, इतर आरोग्य कर्मचारी, खाटा आणि पायाभूत सुविधांवरील वाढता ताणही यातून स्पष्ट होतो. सार्वजनिक आरोग्य विभागाच्या आकडेवारीनुसार राज्यात आरोग्य सेवा संचालनालयाच्या अखत्यारित जिल्हा रुग्णालये, संदर्भ सेवा रुग्णालये, सामान्य रुग्णालये, स्त्री रुग्णालये, उपजिल्हा रुग्णालये, ग्रामीण रुग्णालये आणि ट्रॉमा केअर सेंटर अशी एकूण ६११ रुग्णालये व केंद्रे असून, त्यामध्ये एकूण २९ हजार ५३४ खाटा उपलब्ध आहेत.(फोटो सौजन्य – AI)

Mumbai News : परीक्षेतील गोंधळाला आळा बसणार? अभाविपच्या परिषदेत प्रश्नपत्रिका, AI आणि निकालावर मोठं मंथन

उपचारक्षमतेत वाढ किती?

रुग्णसंख्या वाढताना औषधांचा पुरवठा, प्रयोगशाळा तपासण्या, क्ष-किरण व इतर निदान सुविधा आणि खाटांची क्षमता यांचा विस्तारही आवश्यक आहे. माजी आरोग्य महासंचालक डॉ. सुभाष साळुंखे यांच्या मते, सरकारी रुग्णालयांमधील ओपीडी वाढ ही केवळ आरोग्यसेवेची उपलब्धता वाढल्याचे लक्षण म्हणून पाहून चालणार नाही. वाढत्या रुग्णभाराला तोंड देण्यासाठी आवश्यक डॉक्टर, मनुष्यबळ, खाटा आणि उपचारक्षमतेत किती वाढ झाली, याचा आढावा घेण्याची वेळ आल्याचे डॉ. साळुंखे यांनी स्पष्ट केले, यामध्ये २० जिल्हा रुग्णालयांत ५ हजार १२७ खाटा, २४ स्त्री रुग्णालयांत ३ हजार ५ खाटा, ३३ शंभर खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयांत ३ हजार ३०० खाटा, तर ७३ पन्नास खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयांत ३ हजार ६५० खाटा आहेत. राज्यातील ३७३ ग्रामीण रुग्णालयांमध्ये ११ हजार १९० खाटा असून, ७८ ट्रॉमा केअर सेंटरमध्ये १ हजार ५६० खाटांची व्यवस्था आहे.

विशेष म्हणजे, ग्रामीण भागातील रुग्णांना मोठ्या शहरांकडे जाण्याची वेळ येऊ नये म्हणून ३० खाटांच्या ग्रामीण रुग्णालयांचे श्रेणीवर्धन करून १०६ उपजिल्हा रुग्णालये उभारण्यात आली आहेत. या रुग्णालयांमध्ये संदर्भित रुग्णांवर उपचार आणि विविध शस्त्रक्रिया केल्या जातात. मात्र, ओपीडीचा रुग्णभार तिप्पट वाढला असेल, तर त्या प्रमाणात डॉक्टर, शल्यचिकित्सक, स्त्रीरोगतज्ज्ञ, बालरोगतज्ज्ञ, परिचारिका आणि तांत्रिक कर्मचाऱ्यांची संख्या वाढली का, हा प्रश्न अधिक महत्त्वाचा ठरतो.

ग्लोबल रुग्णालयातील १५ टक्के राखीव खाटांचा गैरव्यवहार? १०० कोटींच्या नुकसानीवर तडजोडीचा आरोप

66 ‘लोकसंख्येच्या संख्या, खाटा प्रमाणात आणि आरोग्य मनुष्यबळ संस्थांची वाढविण्यासोबतच आरोग्य योजनांमध्ये खासगी क्षेत्राचा अधिक व्यापक सहभाग सुनिश्चित करणे आवश्यक आहे. सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेची केवळ ओपीडी वाढवून प्रगती मोजता येणार नाही; त्यासाठी पायाभूत सुविधा, मनुष्यबळ आणि उपचारक्षमता यांचा समतोल वाढविणे तितकेच महत्वाचे आहे, अशी माहिती – डॉ. सुभाष साळुंखे, माजी आरोग्य यांनी दिली आहे.

डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.

Web Title: Mumbai news the challenge of balancing the patient load opd numbers in state hospitals have tripled

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 12, 2026 | 09:47 AM

Topics:  

  • Government Hospital
  • Health Updates
  • Mumbai News

संबंधित बातम्या

Mumbai News: गणपती उत्सवासाठी मुंबई पोलिस दल झाले सज्ज! २५ हजारांहून अधिक अधिकारी-कर्मचारी बंदोबस्तासाठी राहणार तैनात
1

Mumbai News: गणपती उत्सवासाठी मुंबई पोलिस दल झाले सज्ज! २५ हजारांहून अधिक अधिकारी-कर्मचारी बंदोबस्तासाठी राहणार तैनात

Maharashtra Breaking News Today 2026: वर्षभराच्या लढाईनंतर माधुरी हत्तीण कोल्हापुरात दाखल
2

Maharashtra Breaking News Today 2026: वर्षभराच्या लढाईनंतर माधुरी हत्तीण कोल्हापुरात दाखल

Mumbai News : परीक्षेतील गोंधळाला आळा बसणार? अभाविपच्या परिषदेत प्रश्नपत्रिका, AI आणि निकालावर मोठं मंथन
3

Mumbai News : परीक्षेतील गोंधळाला आळा बसणार? अभाविपच्या परिषदेत प्रश्नपत्रिका, AI आणि निकालावर मोठं मंथन

Cricket: मुंबईत ‘सेलिब्रिटीज अँड टायकून्स कप’ची घोषणा; पुण्यात रंगणार क्रिकेटचा थरार
4

Cricket: मुंबईत ‘सेलिब्रिटीज अँड टायकून्स कप’ची घोषणा; पुण्यात रंगणार क्रिकेटचा थरार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.