मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या सिल्व्हर ओक (Silver Oak) या निवासस्थानी घुसून संपकरी एसटी कर्मचाऱ्यांनी आंदोलन केलं होतं. याप्रकरणी एसटी कर्मचाऱ्यांचे वकील ॲड. गुणरत्न सदावर्ते (Gunratna Sadavarte) यांना अटक केली होती. आता याप्रकरणी सदावर्ते यांना दिलासा मिळाला आहे. ॲड गुणरत्न सदावर्ते यांना जामीन मंजूर झाला (Bail Granted To Gunratna Sadavarte) आहे. पन्नास हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर सुटका करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. सदावर्तेंसह ११५ एसटी कर्मचाऱ्यांनाही मुंबई सत्र न्यायालयानं जामीन दिला आहे.
[read_also content=”ठराविक विचारधारेची साहित्य निर्मिती ही लोकशाहीसाठी धोक्याची घंटा – शरद पवार https://www.navarashtra.com/maharashtra/sharad-pawar-speech-in-akhil-bhartiya-sahitya-sammelan-nrsr-272116.html”]
शरद पवार यांच्या घरावरील हल्ल्याप्रकरणी सदावर्ते यांना मुख्य आरोपी तर ११५ कर्मचाऱ्यांना सहआरोपी करण्यात आलं होतं. या कर्मचाऱ्यांना जामीन मिळाला असला तरी त्यांना पुन्हा कामावर रुजू करुन घेणार की नाही याबाबत अजून काहीही स्पष्ट करण्यात आलेलं नाही.






