Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 24 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Mumbai-Nagpur Expressway: मुंबई ते नागपूर आता ‘नॉन-स्टॉप’ होणार! राज्य सरकारचा मोठा रस्ता प्रकल्प

मुंबई ते नागपूर हा प्रवास आता सोपा आणि जलद होणार आहे. दक्षिण मुंबई ते नागपूर प्रवास सुलभ करण्यासाठी राज्य सरकार मुंबई-वडोदरा महामार्ग ठाणे कोस्टल रोडशी जोडण्याची तयारी करत आहे. ठाण्यात १८ km चा ८ लेन रस्ता बांधणार आहेत.

  • By Priti Hingane
Updated On: Feb 09, 2026 | 01:35 PM
Mumbai-Nagpur Expressway: मुंबई ते नागपूर आता 'नॉन-स्टॉप' होणार! राज्य सरकारचा मोठा रस्ता प्रकल्प

Mumbai-Nagpur Expressway: मुंबई ते नागपूर आता 'नॉन-स्टॉप' होणार! राज्य सरकारचा मोठा रस्ता प्रकल्प

Follow Us
Follow Us:
  • महाराष्ट्राच्या कनेक्टिव्हिटीला मिळणार गती
  • दक्षिण मुंबई थेट नागपूरशी जोडली जाणार
  • मुंबई-वडोदरा महामार्ग ठाणे कोस्टल रोडशी जोडणार
 

Mumbai-Nagpur Expressway: मुंबई ते नागपूर हा प्रवास आता सोपा आणि जलद होणार आहे. दक्षिण मुंबई ते नागपूर प्रवास सुलभ करण्यासाठी राज्य सरकार मुंबई-वडोदरा महामार्ग ठाणे कोस्टल रोडशी जोडण्याची तयारी करत आहे. ठाण्यात १८ किलोमीटर लांबीचा ८ लेन रस्ता बांधला जाणार आहे. एकदा तो पूर्ण झाला की, नागपूरहून येणारी वाहने समृद्धी महामार्गाने थेट दक्षिण मुंबईला पोहोचू शकतील. या नॉन-स्टॉप प्रवासामुळे वाहतूक कोंडी कमी होईलच, शिवाय इंधन आणि वेळेचीही लक्षणीय बचत होईल.

Ajit Pawar Plane crash conspircy: अजितदादांच्या विमानात सुसाईड बॉम्बर; अमोल मिटकरींचा पुन्हा गंभीर आरोप

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकल्पाची संकल्पना मांडली. यामुळे मुंबई-वडोदरा एक्सप्रेस वे ठाणे कोस्टल रोडशी जोडला जाईल. या रस्त्याचे नेमके ठिकाण लवकरच जाहीर केले जाईल. हा प्रकल्प सध्या सुरुवातीच्या टप्प्यात आहे आणि चाचण्या सुरू आहेत. हा १८ KM लांबीचा रस्ता कोणती सरकारी संस्था बांधेल हे अद्याप निश्चित झालेले नाही. या रस्त्याच्या बांधकामाची जबाबदारी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ (MMRDC) घेणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. या प्रकल्पाचा अंतिम आराखडा तयार झाल्यानंतर परिस्थिती अधिक स्पष्ट होईल असे सूत्रांचे म्हणणे आहे.

MMRDC च्या मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गांमुळे नागपूर-आमणे-भिवंडी प्रवास फक्त सात तासांचा होईल. तथापि, आमणेहून दक्षिण मुंबई, वरळी, वांद्रे, अंधेरी आणि दहिसर असा प्रवास करणे वाहनचालकांसाठी एक मोठी अडचण आहे. हे लक्षात घेऊन, राज्य सरकारने ठाण्यात आठ पदरी नवीन रस्ता बांधण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबई कोस्टल रोड, दाणे कोस्टल रोड, मुंबई-वडोदरा महामार्ग आणि समृद्धी महामार्ग यांना जोडणारा हा एक महत्वाचा दुवा असेल. भविष्यात, वाहनांना सी ब्रिज आणि कोस्टल रोडद्वारे दक्षिण मुंबईत नॉन-स्टॉप प्रवेश मिळेल.

Uddhav Thackeray News: उद्धव ठाकरेंची आमदारकी धोक्यात ? भाजप आणि शिंदेसेनेच्या बड्या नेत्यांनी डिवचलं

प्रकल्पाचा प्रारंभिक खर्च सुमारे २००० कोटी रुपये असण्याचा अंदाज आहे. जर हा रस्ता पूर्ण झाला तर भविष्यात समृद्धी महामार्गावरून येणारी वाहने भाईंदर वर्सोवा सागरी पुलावर आणि नंतर मुंबईला किनाऱ्याशी जोडणाऱ्या वांद्रे-वसोंवा सागरी पुलावर पोहोचण्यासाठी या रस्त्याचा वापर करू शकतील. वांद्रे-वरळी सागरी लिंक पुलामुळे थेट नरिमन पॉइंटपर्यंत प्रवास करणे सोपे होईल. मुंबई-वडोदरा महामार्गावरून येणाऱ्या वाहनांना समृद्धीपर्यंत पोहोचणे देखील सोपे होईल. प्रकल्प खूप महत्त्वाचा मानला जातो. या रस्त्यामुळे नागपूरहून येणारी वाहने ठाणे, भिवंडी किंवा मुंबईच्या अंतर्गत रस्त्यांवर न जाता न थांबता प्रवास करू हा शकतील.

Web Title: Mumbai to nagpur non stop travel via samruddhi expressway

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 09, 2026 | 01:35 PM

Topics:  

  • Nagpur

संबंधित बातम्या

Nagpur school bomb threat: १२ खासगी आणि ३ सरकारी शाळांना बॉम्बने उडवून देण्याची धमकी; खलिस्तानी संघटनेच्या नावाने मेल
1

Nagpur school bomb threat: १२ खासगी आणि ३ सरकारी शाळांना बॉम्बने उडवून देण्याची धमकी; खलिस्तानी संघटनेच्या नावाने मेल

नागपूर ग्रामीण आरटीओमधील कथित भ्रष्टाचार! १० ते १५ कोटींच्या मासिक खंडणीचा दावा…
2

नागपूर ग्रामीण आरटीओमधील कथित भ्रष्टाचार! १० ते १५ कोटींच्या मासिक खंडणीचा दावा…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.