Ajit Pawar Plane crash conspircy: अजितदादांच्या विमानात सुसाईड बॉम्बर; अमोल मिटकरींचा पुन्हा आरोप
अजित पवार ज्या विमानाने प्रवास करत होते, त्या व्हीएसआर कंपनीचे पायलट दोन वेळा बदलले गेले. ती कंपनी आधीच नादुरुस्त होती, वर्षभरापासून कंपनीवर बंदी होती आणि तेच विमान अजितदादांसाठी २८ तारखेला देण्यात आले, असे का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
दुसरीकडे डिसेंबर २०२५ च्या महिन्यात व्हीएसआर कंपनीने आपल्या विमान कंपनीच्या प्रत्येक पायलटचा ५० कोटी रुपयाचा विमा कंपनीने उतरवला होता. पायलेटने मेडे-मेडे कॉल दिला नाही. टेक ऑफ घेऊन काही वेळातच पुणे कव्हर करता आले असते, मात्र, पायलटने ते केले नाही. त्यामुळे आम्हाला मोठी शंका व्हीएसआर कंपनीवर आहे. ५० कोटींचा विमा काढून त्यांनी पायलटला हे कृत्य करा लावले का? याचा सुद्धा तपास झाला पाहिजे, अशी मागणी आमदार अमोल मिटकरी यांनी केली. मंगळवारी दुपारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीची वेळ मागितल्याचेही अमोल मिटकरी यांनी सांगितले. पायलटला हिप्नोटाईज केले होते का?, त्याला आमिष दाखवले होत का? असा सवालही त्यांनी उपस्थित केला. (Maharashtra Politics)
“अजितदादांच्या विमान अपघाताप्रकरणात कुटुंबातील सदस्य म्हणून आमदार रोहित पवार पत्रकार परिषद घेणार आहेत. त्यांच्या पत्रकार परिषदेकडे महाराष्ट्रसह देशाचे लक्ष आहे. मला अपेक्षा आहे १० तारखेच्या पत्रकार परिषदमध्ये अनेक गोष्टी कव्हर होतील. जे काही पुरावे त्यांच्याकडे असतील ते सादर करतील, त्यामुळेच रोहित पवारांची पत्रकार परिषद पाहणे अतिशय महत्त्वाचे आहे.” अमोल मिटकरी, आमदार
मिटकरी यांनी राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली चाकणकरांना खडेबोल सुनावले आहेत. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाबाबत विचार केला जाईल’ असे वक्तव्य केल्यावरून अमोल मिटकरी यांनी चाकणकरांचा समाचार घेतला. ‘सुनेत्रा पवार याच अजित पवार यांच्या खऱ्या राजकीय उत्तराधिकारी आहेत. त्याच्याशिवाय दुसरा कोणताही त्या जागेवर विचार होऊ शकत नाही. आज केवळ महाराष्ट्रातच नव्हे, तर पक्षातील प्रत्येक कार्यकत्यांचेही हेच मत आहे. त्यामुळे प्रस्ताव आला तर विचार करू, अशी भाषा वापरणे हे पक्षाच्या भावनाना धक्का देणारे आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती मृत्यूनंतर बीडचे खासदार बजरंग सोनवणे आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी यांच्याकडून रोज नवनवीन आरोप होऊन लागल्यानंतर रविवारी ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी या विषयावर जोरदार टोलेबाजी केली. अजितदादा यांच्या अपघाती मृत्यूनंतर कोण विमानात बॉम्ब ठेवला म्हणतो, कोण आत्मघातकी हल्ला म्हणतो, हा सर्व प्रकार अजितदादांच्या मृत्यूचे भांडवल करून स्वतःचे अस्तित्व ठेवण्याची तडफड असल्याचा टोला हाके यांनी लगावला. अमोल मिटकरी याला फक्त भुंकण्यासाठी अजितदादांनी आमदार केले होते. त्याचे कर्तुत्व म्हणजे अजितदादांच्या चपल्या उचलणे एवढेच होते. आता अजितदादाही राहिले नाहीत आणि त्यांची आमदारकीही संपत आलेली असताना अस्तित्व टिकवण्यासाठी ही केविलवाणी धडपड केली जात असल्याचा टोलाही हाके यांनी लगावला.
Maharashtra EVM Controversy: ढाब्यावर सापडलेल्या ‘त्या’ दोन राखीव ईव्हीएम प्रकरणावर निवडणूक
मिटकरींकडे कुठली पुरावे असतील तर त्यांनी तातडीने पोलिसांना किंवा तपास यंत्रणा यांच्याकडे देणे गरजेचे आहे. नसेल तर राज्याचे मुख्यमंत्री आहेत आणि कोणावर विश्वास नसेल तर उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार आहेत. त्यांच्याकडे पुरावे द्यावेत. मात्र केवळ प्रसिद्धीसाठी आणि स्वतःचे अस्तित्व टिकविण्यासाठी केविलवाणी धडपड करू नये, अशी टीका लक्ष्मण हाके यांनी केली आहे.






