Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 14 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Nagpur Crime: नागपुरात उघडपणे हल्ला; तलवारीने वार करत कुख्यात गुंडाच्या पुतण्याची निर्घृण हत्या

नागपूरच्या गिट्टीखदान परिसरात पूर्ववैमनस्यातून एका तरुणाची धारदार शस्त्रांनी हत्या करण्यात आली. फुटाळा तलाव परिसरात अमन शेख याच्यावर तलवार आणि चाकूने हल्ला करण्यात आला. अमन हा शहरातील कुख्यात गुंड शेखूचा पुतण्या असल्याची माहिती आहे. या प्रकरणी पोलिसांनी काही संशयितांना ताब्यात घेत तपास सुरू केला आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Jun 30, 2026 | 11:08 AM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:

• फुटाळा तलाव परिसरात अमन शेखवर टोळक्याने धारदार शस्त्रांनी हल्ला केला.
• पूर्वी झालेल्या वादातून ही हत्या झाल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे.
• मुख्य आरोपींसह काही संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे.

नागपूर: नागपूर येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पूर्ववैमनस्यातून एका तरुणाची धारधार शस्त्रांनी निर्घृण हत्या करण्यात आल्याचे समोर आले आहे. घडलेली घटना फुटाळा तलाव परिसरात घडली. हत्या झालेला तरुण हा कुख्यात गुंडाचा पुतण्या असल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेमुळे शहरात पुन्हा एकदा गँगवार भडकण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

काय घडलं नेमकं?

मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव असद उर्फ अमन शेख असे आहे. गिट्टीखदान भागात गुन्हेगारी टोळी चालवणारा लाला पांडे हा सोमवारी संध्याकाळी फुटाळा तलाव परिसरात मयूर जाधव नावाच्या तरुणाच्या दुकानावर बसला होता. संध्याकाळी सातच्या सुमारास अमन शेख तिथे पोहोचला आणि त्याने कथितरीत्या मयूरला धमकावण्यास सुरुवात केली. त्यावेळी लाला पांडेने मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला असता दोघांमध्ये जोरदार वाद सुरू झाला. या वादात अमनने लालाच्या कानशिलात लगावली. या अपमानाचा बदला घेण्याची धमकी देत लाला तिथून निघून गेला.

Madhya Pradesh : “बाबांनी आईला काठीने मारुन टाकलं”, लहान भाऊ-बहिणीने पोलिसांना सांगितली आईच्या हत्येची कहाणी

त्यांनतर लाला पांडे हा काही मिनटात त्याचा भाऊ जंगली पांडे आणि इतर सहा साथीदारांसह हत्यारे घेऊन फुटाळा तलाव परिसरात आला. या टोळक्याने अमनला गाठले आणि त्याच्यावर चाकू आणि तलवारीने सपासप वार करण्यास सुरुवात केली. स्वतःचा जीव वाचवण्यासाठी अमन पळत होता, मात्र हल्लेखोरांनी त्याचा पाठलाग करून त्याची क्रूरपणे हत्या केली. धक्कादायक बाब म्हणजे, प्रत्यक्षदर्शींच्या सांगण्यानुसार या थरारक घटनेच्या वेळी फुटाळा परिसरात पोलिसांचे कोणतेही गस्ती पथक, वाहन किंवा बीट मार्शल उपस्थित नव्हते.

टोळीयुद्ध होण्याची शक्यता

या भीषण घटनेनंतर गिट्टीखदान पोलिसांनी तातडीने हत्येचा गुन्हा दाखल केला. चौकशीसाठी तीन संशयितांना ताब्यात घेतले आहे. अमन शेख हा कुख्यात गुंड शेखूचा पुतण्या असल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे गिट्टीखदान परिसरात पुन्हा एकदा टोळीयुद्धाचा भडका उडण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. उघडपणे घडलेल्या या हत्येमुळे परिसरातील नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून पोलिस प्रशासनाचीही चिंता वाढली आहे.

Jalgaon Accident: पंढरपूर वारीच्या मार्गावर भीषण अपघात; धडकेत ट्रॅक्टरचे दोन तुकडे, एक वारकरी ठार तर…

💡

Frequently Asked Questions

  • Que: नागपुरात कोणाची हत्या करण्यात आली?

    Ans: अमन उर्फ असद शेख या तरुणाची हत्या करण्यात आली.

  • Que: हत्या कशी करण्यात आली?

    Ans: आरोपींनी तलवार आणि चाकूसारख्या धारदार शस्त्रांनी हल्ला करून हत्या केल्याचा आरोप आहे.

  • Que: ही घटना कुठे घडली?

    Ans: नागपूरमधील गिट्टीखदान पोलीस ठाण्याच्या हद्दीतील फुटाळा तलाव परिसरात ही घटना घडली.

Web Title: Nagpur crime brazen attack in nagpur notorious gangsters nephew brutally murdered with a sword

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 30, 2026 | 11:08 AM

Topics:  

  • crime
  • Nagpur
  • Nagpur Crime

संबंधित बातम्या

‘आपण सोशल मीडियावर कमी पडतो,’ नागपुरात भाजप नेते, कार्यकर्त्यांना रविंद्र चव्हाण यांच्या कडून बैठकीत थेट कानपिचक्या
1

‘आपण सोशल मीडियावर कमी पडतो,’ नागपुरात भाजप नेते, कार्यकर्त्यांना रविंद्र चव्हाण यांच्या कडून बैठकीत थेट कानपिचक्या

नागपूर पदवीधर मतदारसंघासाठी भाजपची जोरदार तयारी; रविंद्र चव्हाणांचा विदर्भ दौरा, संघटनात्मक बैठकींना वेग
2

नागपूर पदवीधर मतदारसंघासाठी भाजपची जोरदार तयारी; रविंद्र चव्हाणांचा विदर्भ दौरा, संघटनात्मक बैठकींना वेग

Nagpur Accident : वाढदिवसाच्या पार्टीला जात होते, वाटेतच मृत्यूने दिली भेट, अपघाताचा थरारक Video Viral
3

Nagpur Accident : वाढदिवसाच्या पार्टीला जात होते, वाटेतच मृत्यूने दिली भेट, अपघाताचा थरारक Video Viral

Chhattisgarh crime: 8 मुली, एजंट अन् मसाज रूम…! ‘वेलनेस स्पा’च्या नावाखाली देहव्यापार; मॅनेजर, महिला दलालासह 7 ग्राहकांना अटक
4

Chhattisgarh crime: 8 मुली, एजंट अन् मसाज रूम…! ‘वेलनेस स्पा’च्या नावाखाली देहव्यापार; मॅनेजर, महिला दलालासह 7 ग्राहकांना अटक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.