Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 5 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

मुंबईकरांच्या जीवनात ‘एआय वैद्य’ची स्मार्ट एंट्री! प्रायोगिक तत्त्वावर प्रणाली सुरू करण्याचा निर्णय; डॉक्टरांच्या आधी घेणार माहिती

रुग्णाची लक्षणे, वैद्यकीय इतिहास आणि प्राथमिक माहिती डॉक्टरांकडे आधीच उपलब्ध असल्याने हिस्ट्री घेण्यात जाणारा वेळ कमी होईल. त्यामुळे डॉक्टरांना निदान आणि उपचारांवर अधिक लक्ष केंद्रित करता येईल, मलेरिया, डेंग्यूसारख्या आजारांचा संशय असल्यास कोणत्या तपासण्या आवश्यक आहेत, याचाही अंदाज डॉक्टरांना तत्काळ घेता येईल.

  • By सुरुची कदम
Updated On: Jul 04, 2026 | 10:35 AM
मुंबईकरांच्या जीवनात 'एआय वैद्य'ची स्मार्ट एंट्री! प्रायोगिक तत्त्वावर प्रणाली सुरू करण्याचा निर्णय; डॉक्टरांच्या आधी घेणार माहिती

मुंबईकरांच्या जीवनात 'एआय वैद्य'ची स्मार्ट एंट्री! प्रायोगिक तत्त्वावर प्रणाली सुरू करण्याचा निर्णय; डॉक्टरांच्या आधी घेणार माहिती

Follow Us
Follow Us:

मुंबई महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये डॉक्टरांकडे गेल्यानंतर ‘काय त्रास आहे?’, ‘किती दिवसांपासून आहे?’, ‘आधी काही आजार आहेत का?’ अशा प्रश्नांमध्ये जाणारा वेळ आता मोठ्या प्रमाणात वाचणार आहे. महापालिकेने कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित ‘वैद्य एआय’ प्रणाली प्रायोगिक तत्त्वावर सुरू करण्याचा निर्णय घेतला असून, रुग्णाची प्राथमिक वैद्यकीय माहिती डॉक्टरांपर्यंत आधीच डिजिटल स्वरूपात पोहोचणार आहे. त्यामुळे उपचार प्रक्रिया अधिक जलद, अचूक आणि सुलभ होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.(फोटो सौजन्य – AI)

रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! दुसरी वंदे भारत स्लीपर ट्रेन तयार; मुंबई–बेंगळुरू मार्ग, कोच आणि सुविधांची माहिती

महापालिका आणि फॅक्टल ॲनॅलिटिक्स लिमिटेड यांच्यात झालेल्या सामंजस्य करारानुसार ही प्रणाली केईएम, राजावाडी, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर (कांदिवली) रुग्णालय तसेच काही महापालिका दवाखान्यांमध्ये प्रायोगिक स्वरूपात वापरली जाणार आहे. महापालिकेचे प्रमुख रुग्णालय संचालक डॉ. शैलेश मोहिते यांनी सांगितले की, वैद्य एआय डॉक्टरांची जागा घेणार नाही, तर त्यांचा स्मार्ट सहाय्यक म्हणून काम करेल.

रुग्णाची लक्षणे, वैद्यकीय इतिहास आणि प्राथमिक माहिती डॉक्टरांकडे आधीच उपलब्ध असल्याने हिस्ट्री घेण्यात जाणारा वेळ कमी होईल. त्यामुळे डॉक्टरांना निदान आणि उपचारांवर अधिक लक्ष केंद्रित करता येईल, मलेरिया, डेंग्यूसारख्या आजारांचा संशय असल्यास कोणत्या तपासण्या आवश्यक आहेत, याचाही अंदाज डॉक्टरांना तत्काळ घेता येईल. एचएमआयएस आणि व्हॉट्सऍप चॅटबॉटशी ही प्रणाली जोडली जाणार असल्याने रुग्णसेवेबरोबरच आरोग्य यंत्रणेची कार्यक्षमताही वाढणार असल्याचा विश्वास महापालिका प्रशासनाने व्यक्त केला आहे.

७८ वैद्य एआय डॉक्टरांची जागा घेण्यासाठी नाही, तर डॉक्टरांना अधिक अचूक प्राथमिक माहिती आधीच डिजिटल स्वरूपात उपलब्ध झाल्याने डॉक्टरांचा वेळ वाचेल आणि ते उपचारांवर अधिक लक्ष केंद्रित करू शकतील, यामुळे रुग्णांचा प्रतीक्षाकाळ कमी होऊन महापालिकेच्या आरोग्य सेवेची गुणवत्ता आणि कार्यक्षमता दोन्ही वाढतील, असे मत डॉ. शैलेश मोहिते, संचालक, पालिका प्रमुख रुग्णालये यांनी व्यक्त केले आहे.

Sanjay Raut News: अयोध्येचा अंडरवर्ल्ड चालवणारा ‘दाऊद’ कोण…? संजय राऊतांचा गंभीर आरोप

कसे चालणार तपासणीचे काम ?

एखाद्या रुग्णाने ॲपमध्ये ताप, खोकला, अंगदुखी किंवा वजन कमी होणे अशी लक्षणे नोंदवली.
तर प्रणाली त्यानुसार प्राथमिक विश्लेषण करून जवळचा महापालिका दवाखाना किंवा आवश्यक असल्यास थेट रुग्णालयात जाण्याचा सल्ला देईल.
गंभीर आजाराचा संशय असल्यास त्याचीही सूचना मिळेल.

डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.

Web Title: Ai doctor set to make smart entry into mumbaikars lives pilot project to collect patient information before doctor consultation

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 04, 2026 | 10:35 AM

Topics:  

  • Doctors News
  • Health Updates
  • Mumbai News

संबंधित बातम्या

मोदींच्या २५ वर्षांच्या प्रवासाची रंगमंचावर गाथा; ‘हनुमान अंश’प्रमाणे ‘नमो सेवा गाथा’ही रेकॉर्ड करेल; रविंद्र चव्हाणांचा मोठा दावा
1

मोदींच्या २५ वर्षांच्या प्रवासाची रंगमंचावर गाथा; ‘हनुमान अंश’प्रमाणे ‘नमो सेवा गाथा’ही रेकॉर्ड करेल; रविंद्र चव्हाणांचा मोठा दावा

Mumbai News: तंबाखूमुक्त शैक्षणिक संस्था बळकटीकरणावर गोलमेज! विद्यार्थ्यांचे आरोग्य नियोजनाचा भाग बनणे आवश्यक
2

Mumbai News: तंबाखूमुक्त शैक्षणिक संस्था बळकटीकरणावर गोलमेज! विद्यार्थ्यांचे आरोग्य नियोजनाचा भाग बनणे आवश्यक

Mumbai News: ऐतिहासिक बाणगंगा तलावात शेकडो माशांचा मृत्यू! पिंडदान विधीतील अन्नपदार्थ कुजल्याने दुर्घटना
3

Mumbai News: ऐतिहासिक बाणगंगा तलावात शेकडो माशांचा मृत्यू! पिंडदान विधीतील अन्नपदार्थ कुजल्याने दुर्घटना

Jaslok Hospital: 50 वर्षांनंतर नियतीने पुन्हा आणले समोरासमोर! कधीकाळच्या रुग्ण डॉक्टरांनीच केली डॉ. जोहारींची तपासणी
4

Jaslok Hospital: 50 वर्षांनंतर नियतीने पुन्हा आणले समोरासमोर! कधीकाळच्या रुग्ण डॉक्टरांनीच केली डॉ. जोहारींची तपासणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.