
गोवंडी- मानखुर्दकडे दुर्लक्ष... मुंबई फक्त श्रीमंतांसाठीच! राज्य सरकार आणि महापालिकेवर सापत्न भावाची वागणूक दिल्याचा गंभीर आरोप
Mumbai News: पालिकेच्या एम-ईस्ट वॉर्ड अंतर्गत येणारा गोवंडी-मानखुर्द परिसर सध्या तीव्र वायू प्रदूषण आणि घोर प्रशासकीय दुर्लक्ष या दुहेरी संकटाचा सामना करत आहे. स्थानिक रहिवाशांनी सरकार आणि महापालिकेला सापत्न भावाची वागणूक देत असल्याचा गंभीर आरोप केला आहे. गोवंडी-मानखुर्दकडे केवळ ‘गरिबांची झोपडपट्टी’ म्हणून दुर्लक्ष केले जात आहे, तर व्हीआयपी भागांना आधुनिक सुविधा पुरवल्या जात आहेत. मुंबईच्या उच्चभू भागांमधील हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी मात्र, गोवंडीला वाऱ्यावर सोडले आहे, विविध तंत्रज्ञानाचा वापर करत आहेत. असे स्थानिकांकडून सांगण्यात येत आहे.(फोटो सौजन्य – AI)
देवनार डंपिंग यार्ड, बायोमेडिकल वेस्ट प्लांट (एसएमएस एन्वायरो) आणि तीन रेडी-मिक्स काँक्रीट (आरएमसी) प्लांटमधून निघणाऱ्या धुरामुळे आणि हानिकारक कणांमुळे हा परिसर रोगांचे माहेरघर बनला आहे. तथापि, स्थानिक नगरसेवक जमीर कुरेशी यांच्या अथक प्रयत्नांमुळे, महापालिकेने एक आरएमसी प्लांट बंद करून काहीसा दिलासा दिला आहे. मात्र, उर्वरित तीन प्लांटवर अजूनही कठोर कारवाईची गरज आहे.
प्रशासकीय अनास्था इतकी आहे की, महापालिका कार्यालयाजवळ आणि बैंगनवाडी सिग्नल येथील मल्हार विवाह स्थळाच्या शेजारी तीन बेकायदेशीर आरएससी प्लांटमधील सिमेंटची बारीक धूळ अन्न आणि पेयांमध्ये मिसळून लोकांच्या फुफ्फुसांपर्यंत पोहोचते. डॉक्टरांच्या मते, हे विषारी प्रदूषण या परिसरातील कर्करोग, दमा आणि क्षयरोग यांसा यांसारख्या जीवघेण्या आजारांचे प्रमुख कागारिकाच्या आरोग्याच्या सुरक्षेचा विचार करता, हे जागरिकांच्या आरोग्याच्या सुरक्षेचा विचार करना है हॉलपासून दूर हलवावेत किंवा ते हॉल तिथून काढून टाकावेत, अशी जोरदार मागणी आहे.
८ वर्षानुवर्षे आम्ही सरकार महानगरपालिकेकडे विनवणी करत आहोत की, इतरांप्रमाणेच आम्हालाही जगण्यासाठी स्वच्छ हवा आणि पाण्याची गरज आहे. पण आम्हाला फक्त आरएमसी प्लांटमधून येणारी सिमेंटची धूळ आणि एसएमएस कंपनीमधून येणारा विषारी धूर मिळतो. ही सावत्र आईसारखी वागणूक आहे.