Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘अग्निवीरांना समान लाभ मिळणार नाही’; केंद्र सरकारचे मुंबई हायकोर्टात स्पष्टीकरण

दोन वेगवेगळ्या श्रेणीतील व्यक्तींमध्ये समानता असू शकत नाही. हे वर्गीकरण अग्निवीर योजनेच्या उद्दिष्टांशी सुसंगत असून संविधानाच्या कलमा १४ अंतर्गत ते वैध आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: May 12, 2026 | 08:49 AM
अग्निवीरांना समान लाभ मिळणार नाही

अग्निवीरांना समान लाभ मिळणार नाही

Follow Us
Follow Us:

मुंबई : अग्निवीरांचा दर्जा नियमित सैनिकांसमान नाही. त्यामुळे युद्ध किंवा लष्करी मोहिमेदरम्यान अग्निवीराचा मृत्यू झाल्यास त्यांचे कुटुंबीय नियमित सैनिकांप्रमाणे निवृत्तीवेतन लाभांमध्ये समानतेचा दावा करू शकत नाहीत, अशी माहिती केंद्र सरकारने मुंबई हायकोर्टात दिली आहे.

जम्मू-काश्मीरमधील ‘ऑपरेशन सिंदूर’ दरम्यान मृत्यू आलेल्या अग्निवीर मुरली नाईक यांच्या आई ज्योतिबा नाईक यांनी दाखल केलेल्या याचिकेला उत्तर देताना केंद्र सरकारने प्रतिज्ञापत्र सादर केले आहे. यात केंद्राने असा युक्तिवाद केला की, ही असमानता घटनात्मकदृष्ट्या वैध आहे. ‘अग्निवीर योजना’ ही सध्याच्या राष्ट्रीय सुरक्षेच्या गरजा लक्षात घेऊन तयार केलेली एक अल्पकालीन भरती योजना आहे. प्रतिज्ञापत्रात स्पष्ट करण्यात आले की, अग्निवीरांची सेवा चार वर्षांसाठी असते. निवृत्तीवेतन लाभ किंवा इतर मानधन हे दीर्घकालीन सेवा बजावणाऱ्या सशस्त्र दलातील कर्मचाऱ्यांसाठी राखीव आहेत.

PM Narendra Modi : “सोने खरेदी टाळा आणि इंधन वाचवा !”; पंतप्रधान मोदींचे २४ तासांत दुसऱ्यांदा देशवासियांना कळकळीचे आवाहन

सरकारने म्हटले की, दोन वेगवेगळ्या श्रेणीतील व्यक्तींमध्ये समानता असू शकत नाही. हे वर्गीकरण अग्निवीर योजनेच्या उद्दिष्टांशी सुसंगत असून संविधानाच्या कलमा १४ अंतर्गत ते वैध आहे.

सामाजिक सुरक्षेबाबत पुन्हा प्रश्नचिन्ह उपस्थित

अग्निवीर मुरली नाईक यांचा गेल्या वर्षी मे महिन्यात सीमेवर गोळीबारात मृत्यू झाला होता. अग्निवीर आणि नियमित सैनिकांमध्ये केला जाणारा हा भेदभाव मनमानी असून, कुटुंबाला पूर्ण मृत्यू लाभ न देणे हे ‘भेदभावपूर्ण’ असल्याचे त्यांच्या आईने याचिकेत म्हटले आहे. केंद्र सरकारच्या या भूमिकेमुळे आता अग्निवीरांच्या भविष्यातील लाभांबाबत आणि त्यांच्या सामाजिक सुरक्षेबाबत पुन्हा एकदा कायदेशीर चर्चा सुरू झाली आहे.

Nana Patole on PM Narendra Modi : “उपदेश देण्यापूर्वी स्वतःच्या…!” नाना पटोलेंचा पंतप्रधान मोदींना थेट सवाल

दुसरीकडे, अग्निवीर योजनेअंतर्गत देशसेवा करणाऱ्या अग्निविरांसाठी महत्त्वाची आणि दिलासादायक बातमी समोर आली आहे. भारतीय सैन्याच्या ‘अग्निवीर’ योजनेअंतर्गत सेवा करणाऱ्या तरुणांसाठी महाराष्ट्र सरकारने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. चार वर्षांच्या सेवेनंतर रोजगाराच्या संधींबद्दलच्या अनिश्चिततेला तोंड देण्यासाठी, राज्य सरकारने त्यांच्या पुनर्वसनाची तयारी सुरू केली आहे. चार वर्षांची लष्करी सेवा पूर्ण केल्यानंतर त्यांच्या भविष्याबद्दल आणि नोकरीबद्दल साशंक असलेल्यांच्या चिंता दूर करण्यासाठी राज्य सरकारने पुढाकार घेतला आहे.

Web Title: Agniveers will not receive equal benefits central government clarifies in bombay high court

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 12, 2026 | 08:49 AM

Topics:  

  • Agneeveer
  • Agniveer Scheme
  • indian army

संबंधित बातम्या

Indian Aarmy : भारतीय सैन्याच्या प्रशिक्षित श्वानांचा धडकी भरवणारा युद्ध अभ्यास; श्वानांचे कौशल्य पाहून अमेरिकन सैन्य थक्क!
1

Indian Aarmy : भारतीय सैन्याच्या प्रशिक्षित श्वानांचा धडकी भरवणारा युद्ध अभ्यास; श्वानांचे कौशल्य पाहून अमेरिकन सैन्य थक्क!

तब्बल 19000 अग्निवीर होणार सेवानिवृत्त; 31 डिसेंबरला पहिली सरकारी नोकरी संपणार
2

तब्बल 19000 अग्निवीर होणार सेवानिवृत्त; 31 डिसेंबरला पहिली सरकारी नोकरी संपणार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.