Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 21 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Indian Army चा नाद करायचा नाय! Commonwealth Games मध्ये  लष्कराच्या खेळाडूंनी तब्बल…

२००५ मध्ये सुरू झालेल्या पुण्यातील आर्मी स्पोर्ट्स इन्स्टिट्यूटमध्ये क्रीडा विज्ञान, बायोमेकॅनिक्स, पोषण, मानसशास्त्र, फिजिओथेरपी, पुनर्वसन आणि कामगिरी विश्लेषण यांसह अत्याधुनिक सुविधा उपलब्ध आहेत.

  • By तेजस भागवत
Updated On: Aug 07, 2026 | 06:10 PM
Indian Army चा नाद करायचा नाय! Commonwealth Games मध्ये  लष्कराच्या खेळाडूंनी तब्बल…
Follow Us
Follow Us:

राष्ट्रकुल स्पर्धेतील भारताच्या ४१ टक्के पदकांवर लष्कराची मोहोर
भारताने जिंकली एकूण 39 पदके 
भारतीय लष्कराने स्पर्धेत २० खेळाडूंना दिली होती संधी

पुणे: ग्लासगो येथे झालेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा २०२६ मध्ये भारतीय लष्कराच्या खेळाडूंनी भारताच्या पदक मोहिमेत सिंहाचा वाटा उचलला. भारताने जिंकलेल्या ३९ पदकांपैकी १६ पदके (४१ टक्के) लष्कराच्या खेळाडूंनी मिळविली. या यशामागे पुण्यातील आर्मी स्पोर्ट्स इन्स्टिट्यूट (एएसआय) या उच्च दर्जाच्या प्रशिक्षण केंद्राची भक्कम तयारी आणि वैज्ञानिक प्रशिक्षण पद्धती महत्त्वाची ठरली.

भारतीय लष्कराने स्पर्धेत २० खेळाडूंना संधी दिली होती. त्यापैकी १६ खेळाडूंनी आठ सुवर्ण, सात रौप्य आणि एक कांस्य अशी एकूण १६ पदके जिंकत ८० टक्के यशाची नोंद केली. विशेष म्हणजे भारताच्या बॉक्सिंग संघाने सात सुवर्ण आणि तीन रौप्य पदके जिंकत राष्ट्रकुल स्पर्धेतील सर्वोत्तम कामगिरी केली. त्यातील सहा सुवर्ण आणि दोन रौप्य पदके लष्कराच्या खेळाडूंनी मिळविली. त्यामुळे १९३४ मध्ये इंग्लंडने केलेल्या सहा सुवर्णपदकांच्या विक्रमालाही भारताने मागे टाकले.

२००५ मध्ये सुरू झालेल्या पुण्यातील आर्मी स्पोर्ट्स इन्स्टिट्यूटमध्ये क्रीडा विज्ञान, बायोमेकॅनिक्स, पोषण, मानसशास्त्र, फिजिओथेरपी, पुनर्वसन आणि कामगिरी विश्लेषण यांसह अत्याधुनिक सुविधा उपलब्ध आहेत. त्यामुळे देशभरातील गुणवंत खेळाडूंना आंतरराष्ट्रीय दर्जाचे प्रशिक्षण मिळत असून अनेक जागतिक दर्जाचे खेळाडू या संस्थेतून घडले आहेत.

CWG च्या कामगिरीनंतर Neeraj Chopra ची नजर ‘सुवर्ण’वेधावर; 21 ऑगस्टला ‘या’ स्पर्धेत होणार सहभागी

यंदाच्या स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी अनेक ऐतिहासिक विक्रमही नोंदविले. ज्युदोमध्ये भारताचे पहिले सुवर्ण, उंच उडीत पहिले रौप्य, राष्ट्रकुल ॲथलेटिक्समध्ये एका भारतीयाकडून प्रथमच दोन पदके, वेटलिफ्टिंगमध्ये ‘गेम्स रेकॉर्ड’ तसेच ४०० मीटर अडथळा शर्यतीच्या अंतिम फेरीत प्रथमच दोन भारतीय खेळाडूंनी प्रवेश करण्याची कामगिरी लष्कराच्या खेळाडूंनी केली. त्यामुळे पुण्यातील आर्मी स्पोर्ट्स इन्स्टिट्यूटने भारतीय क्रीडा क्षेत्रातील सर्वोत्तम प्रतिभा घडविणारे केंद्र म्हणून पुन्हा एकदा आपली छाप उमटविली.

भारतीय लष्कराचे राष्ट्रकुल पदकविजेते

 सुवर्ण (८)

हवालदार हर्ष – ज्युदो (६० किलो)

नायब सुभेदार प्रीती – बॉक्सिंग (५४ किलो)

नायब सुभेदार जास्मिन – बॉक्सिंग (५७ किलो)

हवालदार साक्षी – बॉक्सिंग (५१ किलो)

हवालदार अरुंधती – बॉक्सिंग (७० किलो)

हवालदार सचिन – बॉक्सिंग (६० किलो)

हवालदार अंकुश – बॉक्सिंग (८० किलो)

सुभेदार सोमन राणा – पॅरा शॉटपुट

लेफ्टनंट कर्नल (मानद) नीरज चोप्रा – भालाफेक

Commonwealth Games: 20 वर्षानंतर भारताला मिळणार यजमानपद, कॉमनवेल्थ गेम्स 2030 होणार अहमदाबादमध्ये

नायब सुभेदार सर्वेश कुशारे – उंच उडी

नायब सुभेदार गुलवीर सिंग – १०,००० मीटर धावणे

हवालदार अजय बाबू – वेटलिफ्टिंग (७९ किलो)

हवालदार जादुमणी – बॉक्सिंग

सुभेदार नरेंद्र – बॉक्सिंग (+९० किलो)

लान्स नायक शुभम जुयाल – पॅरा शॉटपुट

कांस्य (१)

नायब सुभेदार गुलवीर सिंग – ५,००० मीटर धावणे

एकूण : १६ पदके (८ सुवर्ण, ७ रौप्य, १ कांस्य)

 

Web Title: Pune army sports institutions indian amry players 16 medal in commonwealth games 2026 in scotland

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 07, 2026 | 06:10 PM

Topics:  

  • commonwealth games 2026
  • gold medal
  • indian army
  • Sports News

संबंधित बातम्या

कारंजा तालुकास्तरीय स्पर्धेत विद्यार्थ्यांनी मैदान गाजवलं! धावेकर विद्यालयाच्या पाच खेळाडूंची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड
1

कारंजा तालुकास्तरीय स्पर्धेत विद्यार्थ्यांनी मैदान गाजवलं! धावेकर विद्यालयाच्या पाच खेळाडूंची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड

Wrestling: जुन्नरमध्ये कुस्तीचा थरार! समर्थ क्रीडा संकुलातील ११ मल्लांची पुणे जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड
2

Wrestling: जुन्नरमध्ये कुस्तीचा थरार! समर्थ क्रीडा संकुलातील ११ मल्लांची पुणे जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड

शालेय खेळाडू मैदानात घालणार धुमाकूळ! PCMC मध्ये Basketball स्पर्धेचे दिमाखदार उद्घाटन
3

शालेय खेळाडू मैदानात घालणार धुमाकूळ! PCMC मध्ये Basketball स्पर्धेचे दिमाखदार उद्घाटन

Asian Games 2026: कोण आहे Suchika Tariyal? 700 ग्रॅमने हुकलं फायनल पण इतिहास रचला; भारताला MMA मध्ये पहिलं ऐतिहासिक पदक
4

Asian Games 2026: कोण आहे Suchika Tariyal? 700 ग्रॅमने हुकलं फायनल पण इतिहास रचला; भारताला MMA मध्ये पहिलं ऐतिहासिक पदक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.