Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात बिबट्याची सफारी सुरु होणार,आशिष शेलार यांची घोषणा

बोरिवलीच्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात बिबट्याची सफारी सुरु होणार असून आज राज्याचे माहिती तंत्रज्ञान तथा सांस्कृतिक कार्य मंत्री आणि मुंबई उपनगर पालकमंत्री ॲड. आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी याबाबत घोषणा केली.

  • By श्वेता झगडे
Updated On: Jan 31, 2025 | 05:50 PM
कराडच्या कांबिरवाडीत बिबट्याचा धुमाकूळ; दोन शेळ्या केल्या फस्त

कराडच्या कांबिरवाडीत बिबट्याचा धुमाकूळ; दोन शेळ्या केल्या फस्त

Follow Us
Close
Follow Us:

Sanjay Gandhi National Park News In Marathi: बोरिवलीच्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात बिबट्याची सफारी सुरु होणार असून आज राज्याचे माहिती तंत्रज्ञान तथा सांस्कृतिक कार्य मंत्री आणि मुंबई उपनगर पालकमंत्री ॲड.आशिष शेलार यांनी याबाबत घोषणा केली. तसेच या उद्यानातील दोन सिंह वर्षभरासाठी त्यांनी दत्तक घेतले आहेत.

मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री ॲड.शेलार यांनी आज बोरिवली येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचा पाहणी दौरा केला. यावेळी उपनगराचे जिल्हाधिकारी राजेंद्र क्षीरसागर, मुख्य वनरक्षक श्रीजी मल्लिकार्जुन, उपसंचालक रेवती कुलकर्णी, सहाय्यक वनरक्षक सुधीर सोनवणे, मुख्य सुरक्षा अधिकारी योगेश महाजन आणि संबंधित अधिकारी यावेळी उपस्थित होते.

Devendra Fadnavis News: आठवड्यातून तीन दिवस मुंबईत थांबा…फडणवीसांचे मंत्र्यांना आदेश, काय आहे कारण?

संजय गांधी राष्ट्रीय उद्यानामध्ये सध्या वाघ आणि सिंहाच्या दोन सफारी उपलब्ध आहेत. महाराष्ट्राच्या विविध भागात बिबट्यांचे सापडलेले बछडे याच उद्यानात संरक्षित करण्यात आलेले आहेत. त्यांचे पालन करण्यात येत आहे. मात्र पर्यटकांना पाहण्यासाठी त्यांची सफारी उपलब्ध नाही. त्यासाठी सुमारे तीस हेक्टर जागा लागणार असून ही जागा या क्षेत्रात उपलब्ध आहे. तर सफारीसाठी प्रकल्प उभारण्यासाठी सुमारे 5 कोटी खर्च अपेक्षित आहे, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. या राष्ट्रीय उद्यानाला वर्षभरात 20 लाख पर्यटक भेट देतात. जर बिबट्याची सफारी उपलब्ध झाली तर पर्यटकांची संख्या वाढेल व त्यातून वनक्षेत्राचे उत्पन्न वाढेल, अशी माहिती देऊन मुख्य वनरक्षक श्रीजी मल्लिकार्जुन यांनी मंत्री ॲड.शेलार यांच्यासमोर सादरीकरण केले.

दरम्यान, याबाबत आढावा घेतल्यानंतर मंत्री आशिष शेलार यांनी या क्षेत्रात नवी बिबट्याची सफारी सुरू करा, त्यासाठी लागणारा निधी वन खात्याकडून आणि जिल्हा नियोजन समितीमधून आम्ही देऊ, असे त्यांनी सांगितले. याबाबत तातडीने प्रस्ताव सादर करण्याचे निर्देशही त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले.

“भारत, भारती”ला पालकमंत्र्यांनी घेतले दत्तक!

या उद्यानात “भारत आणि भारती” हे तीन वर्षाचे दोन सिंह नुकतेच 26 जानेवारीला गुजरात मधून आणण्यात आले आहेत. त्यांना वर्षभरासाठी मंत्री ॲड.शेलार यांनी दत्तक घेतले असून त्यांच्या पालनपोषणासाठी होणारा खर्च मंत्री ॲड.शेलार वैयक्तिकरित्या करणार आहेत.

411 जणांना सुरक्षा कवच

संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात 400 वन मजूर असून ते उन, वारा , पाऊस याची तमा न बाळगता तसेच वन्य प्राण्यांचा अधिवास असलेल्या क्षेत्रात स्वतःचा जीव धोक्यात घालून सतत गस्तीचे काम करतात. यातील बहूसंख्य हे आदिवासी बांधव आहेत.

तर मानवी वस्तीमध्ये वन्य प्राणी घुसल्यानंतर त्यांना पकडण्यासाठी जाणारी 11 जणांची टीम असून या सगळ्यांचा प्राण्यांशी थेट संपर्क येतो. मात्र या सगळ्यांचा सुरक्षा विमा उतरवण्यात आलेला नाही, ही बाब मंत्री ॲड.शेलार यांच्या निदर्शनास आली. त्यामुळे त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने याबाबत निर्देश दिले व या सगळ्यांचा सुरक्षा विमा उतरवण्यास सांगितले. त्यासाठी लागणारा निधी उपलब्ध करुन देऊ अशी ग्वाही ही त्यांनी दिली.

Operation Tiger news Update : महायुतीचं ‘ऑपरेशन टायगर’; ठाकरे गटाला सुरूंग, पण नेमकं अडलंय कुठं?

Web Title: Ashish shelar on leopard safari to start in sanjay gandhi national park

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 31, 2025 | 05:50 PM

Topics:  

  • Ashish Shelar
  • Mumbai
  • Sanjay Gandhi National Park

संबंधित बातम्या

चित्रपटप्रेमींसाठी खास भेट! ९ जानेवारीपासून मुंबईत चित्रपट महोत्सवाची मेजवानी, ५० पेक्षा जास्त देशांच्या चित्रपटांचा समावेश
1

चित्रपटप्रेमींसाठी खास भेट! ९ जानेवारीपासून मुंबईत चित्रपट महोत्सवाची मेजवानी, ५० पेक्षा जास्त देशांच्या चित्रपटांचा समावेश

मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी देव पाण्यात! तिर्थक्षेत्र गाठून देवाला साकडे, उमेवारांनी जिंकण्यासाठी केली जोरदार मोर्चेबांधणी 
2

मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी देव पाण्यात! तिर्थक्षेत्र गाठून देवाला साकडे, उमेवारांनी जिंकण्यासाठी केली जोरदार मोर्चेबांधणी 

हुडहुडी कमी होणार! पण तापमानातील ‘हा’ खेळ कसा असणार? ज्येष्ठ हवामानतज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी दिली महत्त्वाची माहिती
3

हुडहुडी कमी होणार! पण तापमानातील ‘हा’ खेळ कसा असणार? ज्येष्ठ हवामानतज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी दिली महत्त्वाची माहिती

Mumbai Crime: कायदा रक्षकही सुरक्षित नाहीत! अंधेरी पोलीस ठाण्यातच गर्भवती महिला शिपायाला पतीकडून मारहाण; सासरच्यांकडून छळ आणि..
4

Mumbai Crime: कायदा रक्षकही सुरक्षित नाहीत! अंधेरी पोलीस ठाण्यातच गर्भवती महिला शिपायाला पतीकडून मारहाण; सासरच्यांकडून छळ आणि..

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.