हिंदी भाषा सक्तीबाबत खोटे विधान; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना कायदेशीर नोटीस
मुंबई: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महायुती सरकार स्थापन झाल्यानंतर झपाट्याने काम सुरू केले आहे. खातेवाटपानंतर त्यांनी मंत्र्यांना कार्यान्वित करण्यात सुरुवात केली आहे आणि आता आठवड्याला मंत्र्यांच्या कामाचा आढावा घेणं सुरू केलं आहे. त्याचप्रमाणे, आज फडणवीसांनी मंत्र्यांची बैठक घेतली आणि मंत्र्यांच्या कामासाठी आठवड्याचं वेळापत्रक ठरवलं. भाजप मंत्र्यांचे काम दर 15 दिवसांनी तपासलं जाणार असल्याची माहिती समोर आली आहे.
आज मुंबईत फडणवीस यांनी भाजप मंत्र्यांसोबत बैठक घेतली आणि काही महत्वाचे निर्णय घेतले. मंत्री सोमवार ते बुधवार मुंबईत राहतील, तर गुरुवार आणि शुक्रवारला राज्यभरात विभागाच्या कामांचा आढावा घेतील. शनिवारी आणि रविवारी मंत्र्यांना आपल्या मतदारसंघातील समस्या सोडवाव्या लागणार आहे. याचवेळी फडणवीस यांनी मंत्र्यांना वेगवेगळ्या सुचनाही दिल्या आहेत. आपापल्या विभागातील सुनावणी लांबवू न देता त्या तातडीने पूर्ण करा, त्यासाठी अधिक वेळ लागला, तर तोही द्या, अशा सूचना फडणवीसांनी आपापल्या मंत्र्यांना दिल्या आहे.
Varanasi Boat Accident Video: वाराणसीमध्ये प्रवाशांनी भरलेली बोट बुडाली; रेस्क्यू ऑपरेशन सुरू,
सरकार आणि संघटनामध्ये समन्वय साधण्यासाठी भाजप प्रदेशाध्यक्ष आणि मंत्र्यांची दर पंधरवाड्याला बैठक होईल. मंत्र्यांना संघटनेमार्फत आलेल्या लोकोपयोगी कामांचा आढावा घेतला जाईल. तीन महिन्यांनी मुख्यमंत्र्यासोबत भाजप मंत्री आणि पदाधिकाऱ्यांची बैठक होईल. भाजप कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी सांगितले की, मुंबईत पक्षाची सदस्यता नोंदणी चांगली झाली आहे, पण काही भागात ती होणं बाकी आहे. 19 तारखेपर्यंत सदस्यता पूर्ण करण्याचा उद्देश आहे. पीएम मोदी, पक्षाध्यक्ष जेपी नड्डा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून सदस्यता नोंदणीसाठी प्रोत्साहन दिलं जात आहे. महाराष्ट्रात 1.5 कोटी सदस्य नोंदणीचा लक्ष्य आहे.
दरम्यान, बीड सरपंच हत्या प्रकरणावरून टीका होत असलेल्या धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याच्या मागणीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे एक विधान समोर आले आहे. धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याबाबत कोणताही अधिकृत निर्णय अजित पवारच घेतील, असे म्हणत त्यांनी धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याचा चेंडू अजित पवारांच्याच कोर्टात टाकला आहे.
हा कसला नवा ट्रेंड! ‘या’ देशातील लोक 10 लाख रुपये देऊन अचानक बदलत आहेत डोळ्यांचा रंग
दिल्लीत पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, “धनंजय मुंडे हे माझ्या मंत्रिमंडळात मंत्री आहेत. त्यांच्या राजीनाम्याच्या मागणीबाबत अजित पवार यांनी आधीच त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे. हा निर्णय अजित पवारांनी घेतला आहे.” अधिकृत असेल. मंगळवारी धनंजय मुंडे यांनी मंत्रिमंडळ बैठक अर्ध्यावरच सोडली आणि बीडमधील मसजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर त्यांच्या राजीनाम्याच्या वाढत्या मागणीवर भाष्य करण्यास नकार दिला. दरम्यान, या प्रकरणात मुंडे यांचे निकटवर्तीय वाल्मिक कराड यांना अटक करण्यात आली आहे आणि त्यांच्याविरुद्ध महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्याअंतर्गत (मकोका) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.