Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 3 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Ashadhi Ekadashi |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Mumbai News : अकार्यक्षम प्रशासनामुळे भांडुपकरचा जीव धोक्यात, बस अपघातांवरून उबाठा गटाचे तीव्र आंदोलन

भांडुप स्टेशन परिसरात वारंवार होणाऱ्या बस अपघातांमुळे नागरिकांमध्ये संताप उसळला आहे. प्रशासनाच्या निष्क्रियतेविरोधात शिवसेना (उबाठा)ने खासदार संजय दिना पाटील यांच्या नेतृत्वाखाली तीव्र आंदोलन करण्यात आले.

  • By श्वेता झगडे
Updated On: Apr 20, 2026 | 05:35 PM
अकार्यक्षम प्रशासनामुळे भांडुपकरचा जीव धोक्यात, बस अपघातांवरून उबाठा गटाचे तीव्र आंदोलन

अकार्यक्षम प्रशासनामुळे भांडुपकरचा जीव धोक्यात, बस अपघातांवरून उबाठा गटाचे तीव्र आंदोलन

Follow Us
Follow Us:
  • भांडुपकरांचा संताप
  • शिवसेनेचे जोरदार आंदोलन
  • रविवारी भांडुप स्टेशन परिसरात बस अपघाताच्या पार्श्वभूमीवर सोमवारी नागरिकांचे तीव्र आंदोलन
नीता परब, मुंबई: भांडुप स्टेशन परिसरात स्थानिक बसेसचे होत असलेल्या वारंवार अपघातांच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाची बेफिकीरी आणि निष्क्रियता आता संतापजनक ठरू लागली आहे. नागरिकांच्या सुरक्षेपेक्षा महसूल आणि अनधिकृत स्टॉलांना प्राधान्य देणाऱ्या प्रशासनाविरोधात शिवसेना (उबाठा) पक्षाने सोमवारी जोरदार आंदोलन छेडत तीव्र टीका केली आहे.

गतवर्षी झालेल्या भीषण बस अपघातात चार निष्पाप नागरिकांचा बळी गेला होता. त्या घटनेनंतर काही दिवस प्रशासनाने दिखाऊ कारवाई करत भांडुप स्टेशन परिसर मोकळा केला. मात्र रविवारी दुपारच्या सुमारास पुन्हा एकदा बस अपघातामुळे एका महिलेला किरकोळ दुखापत झाली या घटनेच्या पार्श्वभूमीवर भांडुपकर नागरिकांमध्ये रोष पसरला आहे. सतत त्याच त्याच चुका होत आहेत. तरीही प्रशासनाने या घटनांकडे काना डोळा करत असल्याचा आरोप नागरिक करत आहेत. या घटनांच्या पार्श्वभूमीवर निषेध करत शिवसेनेने ( उबाठा) भांडुप स्टेशन परिसरात सोमवारी तीव्र आंदोलन केले, ज्यामुळे वातावरण काही काळ तणावपूर्ण प झाले होते. खासदार संजय दिना पाटील यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात विभाग प्रमुख रमेश कोरगावकर व मोठ्या प्रमाणावर कार्यकर्ते, नागरिक उपस्थित होते.
आंदोलन दरम्यान वरिष्ठ अधिकाऱ्यांचा पाहणी दौरा यावेळी पालिकेच्या एस वॉर्डच्या सहाय्यक आयुक्त समरीन सय्यद तसेच विक्रोळी बेस्ट आगाराचे व्यवस्थापक अर्जुन मांजरेकर यांनी देखील या भागाची पाहणी केली.

BMC News: मुंबई महानगरपालिकेतील बदली प्रक्रियेवर गंभीर आरोप; वशिलेबाजी, नियमभंग आणि गैरव्यवहारामुळे प्रशासनावर प्रश्नचिन्ह

रेल्वे प्रशासन स्टेशन परिसरात स्टॉलला परवानगी देत असल्याचा नागरिकांचा आरोप

विशेष म्हणजे, प्रवाशांच्या हालअपेष्टा कमी करण्याऐवजी रेल्वे प्रशासन नवीन स्टॉलांना परवानग्या देत परिस्थिती अधिकच बिकट करत आहे. किराणा दुकान, फोटो शॉप आणि मोठ्या महानंद स्टॉलसारख्या व्यावसायिक उपक्रमांना दिलेल्या परवानग्यांमुळे प्रवाशांना चालण्यासही जागा उरलेली नाही. यामुळे अपघाताचा धोका वाढत आहे असून नागरिकांच्या जीवाशी खेळ सुरू असल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात येते आहे.

बस डेपो स्थलांतर करण्याची जोरदार मागणी

ईशान्य मुंबईचे खासदार संजय दिना पाटील यांनी वारंवार या परिसरातील अतिक्रमणे हटवून बस डेपो स्थलांतरित करण्याची मागणी केली आहे. संबंधित अधिकाऱ्यांसोबत पाहणी दौरेही झाले, पत्रव्यवहारही करण्यात आला, मात्र प्रशासनाने केवळ बैठका आणि आश्वासने देण्यापलीकडे कोणतीही ठोस कारवाई केलेली नाही. यावरून प्रशासनाची उदासीनता आणि निष्क्रियता स्पष्ट होत असल्याची टीका करण्यात येत आहे.

प्रवाशांच्या जीव महत्त्वाचा की स्टॉल धारकांचा व्यवसाय? – नागरिकांचा संतप्त सवाल

शिवसेना पदाधिकाऱ्यांनी आणि स्थानिक नागरिकांनी केलेल्या आंदोलनात “प्रवाशांचा जीव महत्त्वाचा की स्टॉलधारकांचा व्यवसाय?” असा थेट सवाल प्रशासनाला विचारण्यात आला. तसेच, तात्काळ सर्व स्टॉलचे परवाने रद्द करावे आणि हा परिसर मोकळा करावा, अन्यथा आंदोलन तीव्र करण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला.एकीकडे अपघातांची मालिका सुरू असताना दुसरीकडे प्रशासन मात्र डोळेझाक करत असल्याचे चित्र असून, ही निष्क्रियता भविष्यात आणखी मोठ्या दुर्घटनेला आमंत्रण देऊ शकते, अशी भीती नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.

मुंबईचा पाणीसाठा ३२ टक्क्यांवर! मुंबईकरांवर पाणी कपातीची टांगती तलवार, ऑगस्टपर्यंत पाणी पुरवण्याचे आदेश

Web Title: Bhandup bus accidents protest shiv sena ubt news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 20, 2026 | 05:22 PM

Topics:  

  • Bhandup
  • shivsena
  • UBT

संबंधित बातम्या

Moshi Garbage Disaster: मोशी दुर्घटनेची केंद्र सरकारकडून चौकशी करा! श्रीरंग बारणेंची पंतप्रधान मोदींकडे मागणी
1

Moshi Garbage Disaster: मोशी दुर्घटनेची केंद्र सरकारकडून चौकशी करा! श्रीरंग बारणेंची पंतप्रधान मोदींकडे मागणी

Jawali News: जावळीच्या सुपुत्रावर मोठी जबाबदारी! अंकुश कदम यांची शिवसेना प्रवक्तेपदी नियुक्ती
2

Jawali News: जावळीच्या सुपुत्रावर मोठी जबाबदारी! अंकुश कदम यांची शिवसेना प्रवक्तेपदी नियुक्ती

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.