मुंबईचा पाणीसाठा ३२ टक्क्यांवर! मुंबईकरांवर पाणी कपातीची टांगती तलवार, ऑगस्टपर्यंत पाणी पुरवण्याचे आदेश
मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या सात धरणातील पाणीसाठा ३२ टक्क्यांवर आला मुंबईकरांना पाणी कपातीला सामोरे जावे लागू नये म्हणून मुंबई महापालिकेने राखीव साठ्याची मागणी करण्याचे ठरवले आहे. मात्र राज्य सरकाने यंदा पाणीसाठा ऑगस्टपर्यंत पुरवण्याचे आदेश सर्व महापालिकांना दिले आहेत. त्यामुळे राखीव साठा न मिळाल्यास मुंबईकरांना यंदा पाणी कपातीला सामोरे जावे लागू शकते. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या उर्ध्व वैतरणा, मोडकसागर, तानसा, मध्य वैतरणा, भातसा, विहार आणि तुळशी सातही धरणातील पाणीसाठा कमी होत असून सध्या सातही धरणात मिळून ४ लाख ६३ हजार ९६८ दशलक्षलीटर हायजे ६३ हजार ९६६के देशलीलाटर शिल्लक आहे. हा पाणीसाठा गेल्या दोन वर्षाच्या तुलनेत जास्त आहे.(फोटो सौजन्य – istock)
मात्र मुंबईची पाण्याची मागणी दिवसेंदिवस वाढत आहे. मुंबईला सध्या दररोज ४००० दशलक्षलीटर पाणी पुरवठा केला जातो. बाष्पीभवन आणि पाणी पुरवठा याचा विचार केल्यास धरणातील पाणीसाठा जेमतेम जुलैच्या पहिल्या पंधरवड्यापर्यंत पुरणार आहे. मुंबई महापालिका दरवर्षी जुलै अखेरीसपर्यंत पाणीसाठा पुरेल या दृष्टीने पाण्याचे नियोजन करीत असते. मात्र धरणातील पाणीसाठा पुरेसा नसल्यामुळे दरवर्षी प्रमाणे यंदाही मुंबई महापालिकेने राज्य सरकारकडे राखीव सातवाची मागणी करण्याचे ठरवले आहे.
मुंबई महापालिकेने आधीच राज्य सरकारला पत्र लिहून उर्ध्वं वैतरणा धरणातून ९० हजार दशलक्ष घनमीटर तर भातसा धरणातून १ लाख ४० हजार दशलक्ष घनमीटर (एमसीएम) राखीव साठ्याच्या पाण्याची मागणी करण्याचे ठरवले आहे. त्याबाबतचा प्रस्तावही तयार करण्यात आला असून पालिका आयुक्त अश्विनी भिडे यांच्याकडे मंजूरीसाठी पाठवण्यात आला असल्याची माहिती पालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिली.
मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या सातही धरणांची पाणी साठवण्याची क्षमता १४लाख ४७ हजार दशलक्ष लीटर इतकी आहे. मात्र सध्या सातही धरणात मिळून ४ लाख ६३ हजार ९६८ दशलक्षलीटर (३२.०६ टक्के) पाणीसाठा आहे. तर गेल्यावर्षी हाच पाणीसाठा ४ लाख १६ हजार ४४३ दशलक्षलीटर (२८.७७ टक्के) इतका होता. तर त्याच्या आधीच्यावर्षी पाणीसाठा ३ लाख ३२ हजार ७१५ (२२.९९ टक्के) इतका होता.
ऑगस्टपर्यंत पाणी पुरवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. दरम्यान, यावर्षी एल निनोच्या प्रभावामुळे पावसाचे प्रमाण कमी असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. त्यामुळे यंदा पाणीसाठा ऑगस्टपर्यंत पुरेल अशा पद्धतीने नियोजन करण्याचे आदेश राज्य सरकारच्या जलसंपदा विभागाने दिले आहेत. त्यामुळे राज्य सरकारने मुबई महापालिकेला राखीव साठा वापरण्यास मंजूरी दिली नाही तर यंदा पाणी कपात करण्याची वेळ येऊ शकते.






