मुबंई: विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपला मोठा धक्का बसला आहे. मुंबईत भाजपच्या पहिल्या फळीतील मानले जाणारे नेते गोपाल शेट्टी यांनी बंडखोरीचा मार्ग निवडला आहे. मुबंईचे भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला पण ते निवडणूक लढवण्यावर ठाम आहेत. आज शक्तीप्रदर्शन करत ते आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याची माहिती समोर आली आहे.
महायुतीच्या जागावाटपात भाजपला 150 जागा मिळाल्या आहेत. त्यातही अनेक ठिकाणी बंडखोरीमुळे भाजपचे टेन्शन वाढले आहे. भाजपकडून बंडखोरी रोखण्यासाठी प्रयत्न केल जात आहेत. पण काही ठिकाणी बंडखोरी रोखण्यात भाजपला अपयश येत असल्याचेही दिसत आहे.
हेही वाचा: ‘मी जीवाला जीव देणारा माणूस, लोकसभेत सुनेत्रा पवार यांना…’; अजित पवार यांचं मोठं विधान
धक्कादायक म्हणजे मुंबईतून भाजपला जोर का धक्का धीरे असा बसणार आहे. म्हणजेच एकीकडे बोरीवली मतदारसंघातून गोपाल शेट्टी यांनी बंडखोरी केली आहे. तर दुसरीकडे मुंबादेवी मतदारसंघातून शिंदे गटाच्या शायना एनसी यांना तिकीट मिळाल्याने अतूल शाह यांनीही बंडखोरच्या मार्गावर आहेत. त्यामुळे गोपाल शेट्टी बोरिवली आणि अतूल शाह मुंबादेवी मतदारसंघातून अपक्ष निवडणुकीचा अर्ज भरणार आहेत. या दोघांच्याही बंडखोरीमुळे देवेंद्र फडणवीसांचं टेन्शन वाढणार आहे.
भाजपच्या प्रवक्त्या शायना एन. सी. काही दिवसांपूर्वी शिंदे गटात सामील झाल्या. शिंदे गटाकडून त्यांना उमदेवारीही जाहीर झाली. त्यामुळे अतूल शाह चांगलेच नाराज होत्. या जागेवरून आपल्याला तिकीट मिळेल, अशी त्यांची अपेक्षा होती. पण शायना एनसी यांना शिंदे गटाने उमेदवारी दिल्यामुळे अतूनल शाह यांनी बंडखोरीचा मार्ग पत्करला.
हेही वाचा: मोठी बातमी! दिवाळीपूर्वी केरळमध्ये भीषण अपघात, मंदिर उत्सवात फटाक्यांचा स्फोटात 150 जखमी
एकीकडे आज गोपाल शेट्टी बोरिवलीतून अपक्ष म्हणून अर्ज भरणार आहेत, तर दुसरीकडे मुंबादेवी मतदारसंघातून अतुल शाह हेदेखील उमेदवारी दाखल करणार आहेत. महायुतीमध्ये मुंबादेवीची जागा शिवसेनेच्या खात्यात गेली असून, येथून शिवसेनेने शायना एनसी यांना उमेदवारी दिली आहे. अतुल शाह हे भाजपचे प्रवक्ते आहेत, त्यांना लसीकरण पुरुष म्हणून ओळखले जाते.
लोकसभा निवडणुकीत भाजपने गोपाल शेट्टी यांचे तिकीट रद्द करून त्यांच्या जागी पीयूष गोयल यांना उत्तर मुंबईतून उभे केले होते आणि ते विजयी झाले होते. आता बोरिवली विधानसभा मतदारसंघातूनही भाजपने संजय उपाध्याय यांना उमेदवारी देण्याचा निर्णय घेतल्याने गोपाळ शेट्टी चांगलेच नाराज झाले असून त्यांनी बंडखोरी केली आहे.
हेही वाचा: Tatkal Ticket: यंदा दिवाळीला मिळेल कन्फर्म तिकीट, फक्त या ट्रिकचा वापर करा