दिवाळीचा आता अवघ्या काही दिवसांवर आला आहे. अनेक लोक आपल्या कामानिमित्त घरापासून दूर वेगळ्या शहरात राहत असतात. अशात सणानिमित्त लोक आपल्या सुट्टी घेऊन आपल्या कुटुंबाला भेटण्यासाठी आपल्या घरी जाण्याचा निर्णय घेतात. आता घरी जायचे म्हटले की, लोक अधिकतर रेल्वेचा प्रवास निवडतात. कारण हा सर्वात स्वस्त आणि वेगवान पर्याय आहे. मात्र दिवाळीत रेल्वे तिकिटांसाठी प्रचंड स्पर्धा पाहायला मिळते.
प्रत्येकाला या खास प्रसंगी कुटुंबातील सदस्यांसोबत राहायचे असते, परंतु घरी जाणाऱ्यांची संख्या इतकी जास्त असते की तिकीट काढणेही कठीण होते. तथापि, काही पद्धती आहेत ज्यांच्या मदतीने कन्फर्म ट्रेन तिकिटाची व्यवस्था केली जाऊ शकते.या प्रसंगी तुम्ही तत्काळ तिकीट बुक करू शकता. तात्काळ तिकिटांची संख्या मर्यादित असली तरी काही मूलभूत गोष्टींची काळजी घेतल्यास दिवाळी सारख्या प्रसंगी तिकीट मिळण्याची शक्यता वाढेल. तात्काळ तिकिटासाठी ही पद्धत वापरून पहा.
हेदेखील वाचा – Diwali 2024: यंदाच्या दिवाळीला आई-वडिलांना गिफ्ट करा 10 हजाराहून कमी किमतीचा दमदार स्मार्टफोन
टीप: तात्काळ बुकिंग AC वर्गांसाठी सकाळी 10 वाजता आणि नॉन-AC वर्गांसाठी सकाळी 11 वाजता, ट्रेन सुटण्याच्या एक दिवस आधी उघडते. म्हणून, आपण काही वेळ अगोदर वेबसाइटवर लॉग इन करण्याचा प्रयत्न केला पाहिजे.
हेदेखील वाचा – Jio-Airtel-Vi-BSNL युजर्ससाठी महत्त्वाची बातमी! 1 नोव्हेंबरपासून बदलणार आहेत नियम
ॲपद्वारे तत्काळ तिकीट कसे बुक करावे
चांगले इंटरनेट कनेक्शन
स्लो इंटरनेटमुळे तुम्हाला तिकीट बुक करताना अडचणी येऊ शकतात. त्यामुळे इंटरनेट कनेक्शन उत्तम असणे अत्यंत आवश्यक आहे
पर्यायी IRCTC ॲप
जर तुम्ही मुख्य साइट किंवा ॲपद्वारे तिकीट बुक करू शकत नसाल तर तुम्ही लाईट ॲप किंवा वेबसाइट वापरू शकता