दिवाळीपूर्वी केरळमध्ये भीषण अपघात, मंदिर उत्सवात फटाक्यांचा स्फोटात 150 जखमी (फोटो सौजन्य-X)
केरळमध्ये दिवाळीपूर्वीच एक भीषण अपघात झाला आहे. 28 ऑक्टोबरच्या मध्यरात्री झालेल्या या भीषण अपघातात 150 हून अधिक जण जखमी झाल्याची माहिती आहे. या अपघाताबाबत कासरगोड पोलिसांनी सांगितले की, आठ जणांची प्रकृती चिंताजनक असून, त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कासारगोडच्या नीलेश्वरममध्ये फटाक्यांची आतषबाजी करून सण साजरा केला जात होता. दरम्यान, मध्यरात्रीच्या सुमारास अपघात झाला असून, त्यात दीडशेहून अधिक जण जखमी झाले आहेत. या दूर्घटनेतील जखमींन तातडीने कासारगोड, कन्नूर आणि मंगळुरु येथील विविध रुग्णालयता उपचारासाठी पाठवण्यात आले. हा अपघात सोमवारी (28 ऑक्टोबर) रात्री उशिरा नीलेश्वरम येथील वीरकावू मंदिराजवळ घडला. फटाके फोडण्याच्या तयारीदरम्यान फटाक्यांचा साठा असलेल्या परिसरात आग लागली.
VIDEO | Kerala: Over 150 people were injured, including eight seriously, in a fireworks accident during a temple festival near Neeleswaram, #Kasargod, late on Monday. The injured have been taken to various hospitals in Kasargod, Kannur, and Mangaluru.#KeralaNews #Kerala… pic.twitter.com/jGcrSxi31i
— Press Trust of India (@PTI_News) October 29, 2024
मिळालेल्या माहितीनुसार, मंदिराजवळ ठेवलेल्या फटाक्यांना अचानक आग लागल्याने हा अपघात झाला.
हे सुद्धा वाचा: असाच एक हार वडिलांच्या मृत्यूनंतर मला…; प्रियांका गांधींनी दिला जुन्या आठवणींना उजाळा
मध्यरात्रीच्या सुमारास हा स्फोट झाल्याने तेथे उपस्थित असलेल्या अनेकांना त्याचा फटका बसला. स्थानिक प्रशासन आणि पोलिसांच्या सूचनेनुसार या घटनेमागील कारणांचा शोध घेण्यात येत आहे.
प्रशासन आणि स्थानिक जनतेच्या मदतीने जिल्हा दंडाधिकारी आणि जिल्हा पोलीस प्रमुखांसह जिल्हा प्रशासनाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी पोहोचून परिस्थितीचा आढावा घेतला. यासोबतच स्थानिक लोकही पीडित आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या मदतीसाठी पुढे येत आहेत. हा अपघात अत्यंत दु:खद असून त्यामागील कारणांचा शोध घेतला जात आहे जेणेकरून भविष्यात अशा घटना टाळता येतील.
तर दुसरीकडे याचदरम्यान हरियाणातील कर्नालमध्ये दिवाळीपूर्वीत घरातील दिवे विझले. येथे दोन सख्ख्या भावांचा अपघाती मृत्यू झाला. एक भाऊ साकेत 17 वर्षांचा तर दुसरा भाऊ प्रशांत 21 वर्षांचा होता. या अपघातात दोघांचा मृत्यू झाला. कच्छवा रोडवरील पौंड्रक कालव्याच्या पुलाजवळ हा अपघात झाला. दोन्ही भाऊ काकांना भेटायला गेले होते.
हे सुद्धा वाचा: भारताच्या ‘या’ राज्यात मुली हवी तितकी लग्न करू शकतात; एकाच वेळी राहू शकतात अनेक पतींसोबत
मिळालेल्या माहितीनुसार, प्रशांत आणि साकेत हे सोनीपतच्या बजाना कलान गावचे रहिवासी होते आणि दोन्ही भाऊ कर्नालमध्ये वडील आणि काकांना भेटण्यासाठी आले होते. दोघांचे वडील खासगी शाळेत नोकरी करतात. त्याचवेळी काकाही कर्नालमध्ये काम करतात. ताऊच्या मुलाने कर्नालमध्ये स्पोर्ट्स अकादमी उघडली होती आणि प्रशांत आणि साकेत तिथे गेले होते. यादरम्यान अपघात होऊन त्यांची कार दुभाजकावर आदळली. दोन्ही मृतदेहांचे पोस्टमार्टम करून कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आले आहे.कच्छवा रोडवरील पौंड्रक कालव्यावरील पुलावर झालेल्या या अपघातात दोन्ही दुचाकीस्वार प्रथम जखमी झाले, मात्र नंतर रुग्णालयात दोघांचाही मृत्यू झाला.